NCP : अजित पवार गटाचा शरद पवारांच्या मनधरणीचा प्रयत्न पुन्हा अयशस्वी

मुंबई तक

ADVERTISEMENT

Sharad pawar tells NCP youth workers , that his Path is clearly thought of as he can't support BJP
Sharad pawar tells NCP youth workers , that his Path is clearly thought of as he can't support BJP
social share
google news

Sharad Pawar vs Ajit Pawar : भाजपसोबत सरकारमध्ये जाण्यासाठी अजित पवार यांच्या गटाकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मनधरणीचे प्रयत्न सातत्याने सुरू आहेत. पक्षात फूट पडण्यापूर्वीपासून सुरू असलेल्या या मन वळण्याच्या प्रयत्नात रविवारी (16 जुलै) आणखी एकाची भर पडली. पण, हा प्रयत्नही अपयशी ठरला आहे. त्यामुळे अजित पवार आणि त्यांच्या गटातील नेत्यांना रिकाम्या हातीच परतावे लागले.

अजित पवार यांनी प्रफुल पटेल, सुनिल तटकरे, छगन भुजबळ, धनंजय मुंडे, हसन मुश्रीफ यांच्यासह सर्व मंत्र्यांसह रविवारी (16 जुलै) मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये भेट घेतली. बंडांबद्दल आणि 5 जुलै रोजी झालेल्या बैठकीत केलेल्या टीकेबद्दल शरद पवारांची माफी मागितली. त्याचबरोबर पक्ष पुन्हा एकत्र आणण्यासाठी भाजपसोबत जाण्याची भूमिका घेण्याबद्दल विनंती केली. पण, शरद पवारांनी अजित पवार गटाच्या नेत्यांना कोणतंही उत्तर दिलं नाही.

शरद पवार भूमिकेवर ठाम

अजित पवार गटाच्या नेत्यांना शरद पवार यांनी कोणतंही उत्तर दिलं नाही. पण, नंतर कार्यकर्त्यांशी बोलताना मात्र त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

वाचा >> उदयनराजेंना सर्वोच्च न्यायालयाचा दणका, ‘ते’ प्रकरण आलं अंगलट

यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये अजित पवार गटाच्या नेत्यांनी भेट घेतल्यानंतर शरद पवार नाशिक जिल्ह्यातील राष्ट्रवादी युवक काँग्रेस पदाधिकाऱ्यांशी बोलले. यावेळी त्यांनी त्यांची भूमिका सांगितली आणि अप्रत्यक्षपणे आपण भाजपसोबत जाणार नाही, असंही स्पष्ट केले.

वाचा >> पाय धरले अन्… शरद पवार-अजित पवार भेटीत नेमकं काय झालं? त्या 20 मिनिटांची Inside Story

पवार म्हणाले, “धर्मनिरपेक्षता, लोकशाही, समानता आणि सर्वसमावेशकता या आधारावर आपल्याला वाटचाल करायची आहे. भाजपचं राजकारण द्वेषाचं आहे”, असं पवारांनी कार्यकर्त्यांना सांगत पुढच्या काळात भाजपसोबत जाणार नाही, असंही त्यांनी स्पष्ट केले.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

वर्षभरापासून सुरू आहेत प्रयत्न…

एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर 2022 मध्ये राष्ट्रवादीतील 54 आमदारांच्या स्वाक्षऱ्यांसह एक पत्र शरद पवार यांना पाठवण्यात आले होते. पण, त्यावर पवारांनी काहीही विचार केला नाही. त्यानंतरही शरद पवारांची काही आमदारांनी भेट घेतली होती. मात्र, पवारांनी नकार दिला. बंडखोरी करण्यापूर्वीही राष्ट्रवादीतील काही नेत्यांकडून पवारांच्या मनधरणीचे प्रयत्न झाले. पण, सुप्रिया सुळे यांना कार्याध्यक्ष करण्यात आल्यानंतर अजित पवारांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीतील आमदारांचा गट सत्तेत सहभागी झाला.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT