Baba Siddique: 'हत्येच्या दिवशी वडिलांनी डायरीत BJP नेत्याचे नाव लिहिलेलं...', झिशान सिद्दीकींचा पोलिसात जबाब

विद्या

Zeeshan Siddiqui statement to Mumbai police: हत्येच्या दिवशी माझे वडील भाजप नेत्याच्या संपर्कात होते आणि त्याचे नाव देखील त्यांनी आपल्या डायरीत लिहले होते. असा जबाब बाबा सिद्दीकीचे पुत्र झिशान सिद्दीकी यांनी मुंबई पोलिसांना दिलं आहे.

ADVERTISEMENT

'हत्येच्या दिवशी वडिलांनी डायरीत BJP नेत्याचे नाव लिहिलेलं...' (फाइल फोटो)
'हत्येच्या दिवशी वडिलांनी डायरीत BJP नेत्याचे नाव लिहिलेलं...' (फाइल फोटो)
social share
google news

मुंबई: दिवंगत आमदार बाबा सिद्दीकी यांचे पुत्र आणि माजी आमदार  झिशान सिद्दीकी यांनी मुंबई पोलिसांना दिलेल्या जबाबात एक मोठा खुलासा केला आहे. त्यांचे वडील आणि माजी काँग्रेस आमदार बाबा सिद्दीकी यांना महाराष्ट्र विधान परिषदेवर उमेदवारी देण्यात येणार होती. पण त्याआधीच, 12 ऑक्टोबर रोजी त्यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आणि त्यांच्या हत्येच्या काही दिवसांनी, 15 ऑक्टोबर 2024 रोजी, विधान परिषदेसाठी नामांकित नेत्यांना शपथ देण्यात आली. पोलिसांना दिलेल्या जबाबात झिशान यांनी त्यांच्या वडिलांचा डायरीचा आणि त्यात असलेल्या नेत्यांच्या नावाचाही उल्लेख केला आहे.

झिशान यांनी दावा केला की, त्यांनी वडिलांच्या डायरीत भाजप नेते मोहित कंबोज यांचे नाव लिहिलेले पाहिले. तथापि, मुंबई पोलिसांचे संपूर्ण प्रकरण बिश्नोईच्या अँगलने आहे आणि बाबा सिद्दीकीची अभिनेता सलमान खानशी असलेल्या जवळीकतेमुळे त्यांची हत्या करण्यात आली असा कयास आहे. पण झिशान सिद्दीकीनी पोलिसांना जो जबाब दिला आहे त्यात या अँगलचा कुठेही उल्लेख केलेला नाही.

हे ही वाचा>> Baba Siddique Case : बाबा सिद्दीकी यांच्या हत्येसाठी 17 लाखांची सुपारी, आरोपींनी वापरला पेपर स्रे; चार्जशीटमध्ये खळबळजनक खुलासे

'डायरीमध्ये मोहित कंबोजचे नाव लिहिले आहे'

झिशान सिद्दीकी यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात सांगितले की, त्याचे वडील अनेक लोकांच्या संपर्कात होते, ज्यात भाजप नेते मोहित कंबोज यांच्यासह अनेक मोठ्या नेत्यांचा समावेश होता. जे वांद्रे पूर्वेतील झोपडपट्टीच्या पुनर्विकासाबाबत चर्चा करत होते. झिशान यांनी असेही नमूद केले की, त्याच्या वडिलांना त्यांचे दैनंदिन व्यवहार डायरीत लिहिण्याची सवय होती आणि हत्येच्या दिवशी, म्हणजे 12 ऑक्टोबर 2024 रोजी, त्यांनी मोहित कंबोजचे नाव त्याच्या डायरीत लिहिले होते.

झिशान सिद्दीकी यांनी त्यांच्या जबाबात म्हटले आहे की, 'कंबोज माझ्या वडिलांच्या नियमित संपर्कात होते. माझ्या वडिलांना त्यांच्या दैनंदिन कामांबद्दल नियमितपणे डायरी लिहिण्याची सवय होती. माझ्या वडिलांच्या हत्येच्या दिवशी, 12/10/2024 रोजी, डायरीमध्ये मोहित कंबोजचे नाव होते आणि मला कळले की मोहित कंबोजशी माझ्या वडिलांचे फोनवर संध्याकाळी 5.30 ते 6.00 च्या दरम्यान व्हाट्सअॅपद्वारे संपर्क साधण्यात आला होता.

हे ही वाचा>>  Baba Siddique Case : आरोपींच्या मोबाईलमध्ये सापडला बाबा सिद्दींकीच्या मुलाचा फोटो, स्नॅपचॅटवरुन...

त्यांनी सांगितले की, मोहित कंबोज यांना वांद्रे पूर्व परिसरात सुरू होणाऱ्या मुंद्रा बिल्डर्सच्या प्रकल्पाबाबत माझ्या वडिलांना भेटायचे होते. मला बिल्डरचा एक व्हिडिओ सापडला ज्यामध्ये तो झोपडपट्टीत राहणाऱ्या लोकांशी बोलताना माझ्या वडिलांबद्दल अपशब्द वापरत होता.

अनिल परब यांचाही उल्लेख

झिशान सिद्दीकी यांनी त्यांच्या जबाबात झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पांवर काम करणाऱ्या अनेक बांधकाम व्यावसायिकांची नावे आणि बांधकाम व्यावसायिकांशी करार करण्यापूर्वी झोपडपट्टीवासीयांना या प्रकल्पांची बारकाईने तपासणी करण्यास सांगितले जात होते, असा उल्लेख केला आहे. त्यांच्यावर खोटा गुन्हाही दाखल करण्यात आला होता. चार पानांच्या जबाबात, झिशान यांनी शिवसेना (यूबीटी) आमदार अनिल परब यांचाही उल्लेख केला हे, ज्यांनी लोकांना प्रकल्पासाठी एक चांगला बिल्डर किंवा डेव्हलपर आणण्याचे आश्वासन देण्यात सहभाग असल्याचे म्हटले जाते.

'कार्यकर्त्याने दिली घटनेची माहिती'

घटनेच्या दिवसाबद्दल बोलताना, झिशान सिद्दीकी म्हणाले की, ते संध्याकाळी 6 वाजताच्या सुमारास ऑफिसमध्ये पोहोचलो होतो, तर त्यांचे वडील संध्याकाळी 7 वाजताच्या सुमारास आले होते. रात्री 9 वाजल्यानंतर झिशानला भूक लागली आणि त्याने त्याच्या वडिलांना सांगितले की तो 10-15 मिनिटांत परत येईल. जेव्हा झिशान सिद्दीकी वांद्रे पूर्व परिसरातील जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील एका रेस्टॉरंटमध्ये होते, तेव्हा त्यांच्या एका पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्यांना सांगितले की, त्यांच्या वडिलांवर गोळीबार करण्यात आला आहे आणि त्यांना लीलावती रुग्णालयात नेण्यात आले आहे. वाटेत, आई आणि बहिणीला कळवल्यानंतर झिशान सिद्दीकीही तिथे पोहोचले. 

झीशान सिद्दीकी आणि त्यांचे कुटुंबीय रुग्णालयात पोहोचताच त्यांना सांगण्यात आले की बाबा सिद्दीकी यांना आयसीयूमध्ये नेण्यात आले आहे, परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे

झिशान सिद्दीकी म्हणाले की, त्यांनी सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलिसाला विचारले होते की, गोळीबार झाला तेव्हा ते काय करत होते. तर ते म्हणाले की, 'हे कसे घडले हे त्याला माहित नाही.' जबाबाच्या शेवटी, "माझ्या वडिलांच्या हत्येच्या चौकशीत, मी वर उल्लेख केलेल्या सर्व (झोपडपट्टी पुनर्वसन) बाबींची सविस्तर चौकशी केली पाहिजे." असं म्हटलं आहे.

12 ऑक्टोबर 2024 रोजी मुंबईतील वांद्रे परिसरात काँग्रेसचे माजी आमदार बाबा सिद्दीकी यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. 24 ऑक्टोबर 2024 रोजी मुंबई पोलिसांनी बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात झिशान सिद्दीकी यांचा जबाब नोंदवला. नंतर 25 ऑक्टोबर 2024 रोजी, महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे नेते म्हणून झिशान यांना वांद्रे पूर्व येथून निवडणूक लढवण्यासाठी तिकीट देण्यात आले होते. पण, त्यांना शिवसेना यूबीटी नेते वरुण सरदेसाई यांच्याकडून गमवावी लागली.

हे वाचलं का?

    follow whatsapp