Pankaja Munde: 'माझ्यासोबत राजकारणात दगाफटका झाला', पंकजा मुंडेंनी व्यक्त केली खदखद

मुंबई तक

ADVERTISEMENT

'राजकारणात माझ्यासोबत दगाफटका झाला, माझा वनवास झाला, पण हा वनवास तुमचं माझ्यावरील प्रेम कळण्यासाठी झाल्याचे' विधान भाजप नेत्या पंकजा मुंडे (pankaja munde) यांनी केले आहे.
pankaja munde big statement rajysabha election beed news maharashtra politics
social share
google news

बातम्या हायलाइट

point

राजकारणात आले आणि संघर्षाला सुरुवात झाली

point

साहेब या उपाधीला कधीही बट्टा लागणार नाही

point

पुढील संघर्षात देखील तुम्ही माझ्यासोबत राहा

Pankaja Munde: योगेश काशीद, बीड : 'राजकारणात माझ्यासोबत दगाफटका झाला, माझा वनवास झाला, पण हा वनवास तुमचं माझ्यावरील प्रेम कळण्यासाठी झाल्याचे' विधान भाजप नेत्या पंकजा मुंडे (pankaja munde) यांनी केले आहे. पंकजा मुंडेंच्या या विधानाची राजकीय वर्तुळाची चर्चा रंगली आहे.  (pankaja munde big statement  rajysabha election beed news maharashtra politics) 
 
 भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या माध्यमातून बीड जिल्ह्यात गाव चलो अभियान राबविले जात आहे. याच अभियानांतर्गत पंकजा मुंडेंनी बीड तालुक्यातील नारायण गड येथे नगद नारायणाचे दर्शन घेऊन अभियानाची सुरुवात केली. त्यानंतर पौंडूळ गावात पंकजा मुंडेंनी रात्रीचा मुक्काम केला. यावेळी मोठ्या उत्साहात ग्रामस्थांनी त्यांचं स्वागत केलं. 

ADVERTISEMENT

हे ही वाचा : Abhishek Ghosalkar: विनोद घोसाळकरांनी केली कळकळीची विनंती, 'माझ्या मुलाची विश्वासघाताने हत्या...'

यावेळी गावकऱ्यांशी बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या की, 'वनवासाशिवाय तुम्ही लोकांच्या स्मरणात राहत नाही. हा वनवास सन्मानजनक केल्याशिवाय तुम्ही लोकांच्या हृदयात राहत नाही, वनवास झाला राजकारणात, दगाफटका झाला,पण तो कशासाठी झाला? एवढं प्रेम तुम्ही माझ्यावर करता हे कळण्यासाठी झाला.मग मला तोटा झाला की फायदा झाला. आधी जितके लोक प्रेम करायचे त्यापेक्षा दहापट जास्त लोक प्रेम करायला लागली. हा महत्वाचा झालेला बदल आहे', असे पंकजा मुंडे सांगतात. 
 
 दरम्यान माध्यमांशी बोलताना पंकजा मुंडेंनी राज्यसभेच्या उमेदवारी बाबत आपली भूमिका स्पष्ट केली. राज्यसभा आणि विधान परिषदेच्या निवडणुकीत माझं नाव चर्चेत होतं. यात नाविन्य असं काही नाही. लोकांना मला कुठे पाहायला आवडेल हा महत्त्वाचा विषय आहे. त्यांना जिथे पाहिजे तिथे मी दिसली तर फार मोठी गोष्ट आहे, असे पंकजा मुंडे म्हणाल्या.

हे वाचलं का?

हे ही वाचा : पवारांनी योगी आदित्यनाथांना इतिहासच सांगितला, 'शिवाजी महाराजांचं कष्ट,कर्तृत्व अन् जिजाऊंचं...'

गोपीनाथ मुंडे यांची काढली आठवण

ADVERTISEMENT

2014 ची निवडणूक दुर्दैवाने आपल्यासाठी चांगली ठरली नाही. मुंडे साहेब निवडून आल्यानंतर केवळ काही दिवसात ते आपल्यातून गेले. मी 2009 मध्ये राजकारणात आले आणि संघर्षाला सुरुवात झाली. मुंडे साहेब निवडून आल्यानंतर मला रजा द्या असे म्हणाले...बाबा यमराजा पुढे अपयशी ठरले. मुंडे साहेबांनी जाती पातीचा राजकारण करायचे नाही असे सांगितले. आपली जात केवळ वंचित आहे. त्यांच्यासाठी काम करायचे आहे, असे पंकजा मुंडे म्हणाल्या.  

ADVERTISEMENT

ताईच काय? म्हणून मला सर्व लोक विचारतात... मुंडे साहेब गेल्यानंतर मला लोक ताईसाहेब म्हणतात... माझ्यात लोक मुंडे साहेबांना बघतात म्हणून राज्यभर मला ताईसाहेब म्हणतात.साहेब या उपाधीला कधीही बट्टा लागणार नाही असे मला काम करायचे आहे. माझ्या संघर्षात नेहमी सोबत आहात म्हणून माझा संघर्ष सोन्यासारखा झाला आहे... पुढील संघर्षात देखील तुम्ही माझ्यासोबत राहा, असे आवाहन पंकजा मुंडेंनी कार्यकर्त्यांना केली. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आम्हाला गावात जायला सांगितले. माझ्यावर केलेलं तुम्ही प्रेम आणि मोदी यांनी सांगितलेलं काम...याची मला आज जोड मिळाली. आता काम सुरू झाले असतील मात्र अनेक विकास कामे माझ्या काळात मंजूर झाले आहे, असे देखील पंकजा मुंडे यांनी सांगितले. 

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT