Pankaja Munde : ''मी कुणालाही घाबरत नाही, आपला डाव खेळणार...'', पंकजा मुंडेंच्या निशाण्यावर जरांगे?

मुंबई तक

ADVERTISEMENT

pankaja munde dasara melava speech bhagwan bhaki gadh dhananjay munde manoj jarange patil obc reservation vs maratha reservation
बापाने मरताना तुमची जबाबदारी माझ्या झोळीत टाकलेली आहे.
social share
google news

बातम्या हायलाइट

point

बापाने मरताना तुमची जबाबदारी माझ्या झोळीत टाकलेली

point

माझा पराभव झाल्यानंतरही तुम्ही मला इज्जतच दिली

point

राजकारणाला चिटकून बसणारी नाही.

Pankaja Munde Dasara Melava Bhagwan Bhakti Gadh : 'मैं गोपिनाथ मुंडे की बेटी हू',अशी हिंदीतून कविता म्हणत भाजप खासदार पंकजा मुंडे यांनी भाषणाला सूरूवात केली आहे. या भाषणातुन पंकजा मुंडे यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचे नाव न घेता त्यांच्यावर जोरदार निशाणा साधलाय. 'मी कुणालाही घाबरत नाही', असे विधान पंकजा मुंडेंनी थेट जरांगेंना उद्देशून केले आहे. तसेच 'आपल्याला आपला डाव टाकायचाय', असे म्हणत पंकजाताईंनी जरांगेचा डाव उधळून टाकण्याचा इशारा दिला आहे. (pankaja munde dasara melava speech bhagwan bhaki gadh dhananjay munde manoj jarange patil obc reservation vs maratha reservation) 

पंकजा मुंडे भगवान गडावरून दसरा मेळाव्याच्या भाषणात बोलत होत्या. यावेळी पंकजा मुंडे यांनी कार्यकर्त्यांना भावनिक साद घालण्याचा प्रयत्न केला होता. ''बापाने मरताना तुमची जबाबदारी माझ्या झोळीत टाकलेली आहे. माझ्या निवडणुकीचा निकाल लागला तेव्हा माझ्या लेकरांनी जीव दिला. तुम्ही मला जिंकून मला इज्जतच दिली. पण माझा पराभव झाल्यानंतरही त्याहूनही मला इज्जतच दिली. आता तुम्हाला इज्जत देण्यासाठी मी गावागावात दौऱ्याला येणार आहे. आपल्याला आपला डाव खेळायचा?'' असे आवाहन पंकजाताईंनी यावेळी केले आहे.

हे ही वाचा : Manoj Jarange : "माझ्या समाजाची लेकरं संपवू नका, नाहीतर...", मनोज जरांगेंचा सरकारला मोठा इशारा


जात बघून देणाऱ्यांची औलाद गोपिनाथ मुंडेंची नाही. आम्हाला काम करणाऱ्या लाोकांच्या पाठीशी उभं राहायचंय. जातीवर स्वार होणाऱ्यांच्या पाठीशी उभं राहायचं नाही, असे विधान करत पंकजा मुंडे यांनी नाव न घेता जरांगेंना टोला लगावला आहे. 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

''राजकारणाला चिटकून बसणारी नाही. माझ्यासाठी 5 लेकरांनी जीव दिला, मला त्या आमदारकीचं काय मोल. ज्याची पत नाही आणि ऐपत नाही त्यांच्यासाठी मी राजकारणात आहे. गाड्या घेण्यासाठी नाही, टेबला खालून पैसे खाण्यासाठी नाही. तुम्ही म्हणता म्हणून मी हेलिकॉप्टरने येते. तुम्ही म्हटला तर बैलगाडीनेही येईल,'' असे पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत.

पुढे त्या म्हणाल्या, ''पंकजा मुंडे अंधारात एक उजेडात एक वागते का? अंधारात जाऊन कुणाला भेटते का? मी कुणाला घाबरत नाही, माझ्या समोर ज्या दिवशी लोक नसतील त्या दिवसाला मी घाबरते. मी न मागता रस्ते दिले. न मागता विकास दिला, या बीड जिल्ह्यासाठी ऐतिहासिक विमा दिला. गावात मायनस बुथ असलं तरी तेवढाच निधी दिला आहे, असे देखील पंकजा मुंडे यांनी सांगितले. 

ADVERTISEMENT

हे ही वाचा : Bharat Gogawle: 'चु% बनवणारी बहीण पाहिजे?', भरत गोगावलेंचं महिलेबाबत आक्षेपार्ह विधान

''ताई पडल्यामुळे शांत झाल्या, असं तुम्हांला वाटतं असेल तर तसं नाही. परळीतून आम्ही धनु भाऊला निवडून देणारच आहोत. मग आता घोडा मैदान लांब नाही. पण आता सगळीकडे मी येणार आहे. मी पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ सगळीकडे येणार आहे. चांगले दिवस आणण्यासाठी मी येणार आहे. आणि आमच्या लोकांना त्रास दिल्यास त्याचा हिसाब घेतल्याशिवाय राहणार नाही'', असा इशाराही पंकजा मुंडे यांनी नाव न घेता जरागेंना दिला आहे. 

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT