Pankaja Munde: 'प्रीतम ताईंना विस्थापित करणार नाही', पंकजा मुंडेंनी दिला शब्द

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

pankaja munde reaction on beed lok sabha constituncy pritam munde dhananjay munde maharashtra politics
मी जाहिररीत्या सांगितलंय, प्रीतम मुंडेंना मी विस्थापित करणार नाही, हा शब्द कायम आहे.
social share
google news

Pankaja Munde Reaction on Beed Lok Sabha :आगामी लोकसभा निवडणुकीसाठी बुधवारी भाजपने महाराष्ट्रातील 20 उमेदवारांची यादी जाहीर केली होती. या यादीत भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना बीड लोकसभा मतदार संघातून तिकीट देण्यात आले आहे. विशेष म्हणजे याच मतदार संघात प्रीतम मुंडे खासदार आहेत.पण यावेळेस त्यांचे तिकीट कापून पंकजा मुंडेंना देण्यात आले आहे. यानंतर आज पंकजा मुंडे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या की, मी जाहिररीत्या सांगितलंय, प्रीतम मुंडेंना मी विस्थापित करणार नाही, हा शब्द कायम आहे.  (pankaja munde reaction on beed lok sabha constituncy pritam munde dhananjay munde maharashtra politics) 

ADVERTISEMENT

पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे पत्रकार परिषदेत बोलत होत्या. यावेळी बोलताना पंकजा मुडें म्हणाल्या की, यादीत नाव न येण्याची भीती नव्हती. दोघांपैकी एक नावं येणे अपेक्षित होतं, असे पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत. तसेच पक्षाने मला जबाबदारी दिली आहे. आणि जबाबदारीला सन्मान समजण्याचे संस्कार माझ्यावर आहेत. या जबाबदारीचा मी सन्मान म्हणून स्विकार करते, असे देखील पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे. 

धनंजय मुंडेंचा राष्ट्रवादी पक्ष आणि भाजप यांची राज्यात युती आहे. त्यामुळे राज्यात आम्ही एकाच आघाडीत आहोत. या युतीनंतर माझ्या मतदार संघावर जे प्रश्नचिन्ह निर्माण झालं. त्याच्यानंतर मला लोकसभा मिळाली. पण धनंजय मुंडेंच्या येण्याने जितक्या मतांनी प्रीतम ताई निवडून आल्या होत्या, आता त्यापेक्षा अधिक मतांनी मला निवडून येण्यासाठी नक्कीच योगदान मिळेल, असा विश्वास पंकजा मुंडे यांनी व्यक्त केला. 
 
धनंजय मुंडे आल्याने अशी अपेक्षा आहे जास्त ताकद वाढेल, कारण आम्ही जिल्ह्याची जेव्हा निवडणूक लढलो, तेव्हा परिस्थिती वेगळी आहे. विधानसभेत एकमेकांसमोर लढलो, तिथली परिस्थिती वेगळी आहे. नक्कीच धनंजय मुडेंच्या येण्यानंतर परळी विधानसभेत आम्हाला जास्तीचा त्रास होणार नाही, असे देखील पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत. 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

पंकजा मुंडे पुढे म्हणाल्या की, 'आमच्या दोघींचे कॉंबिनेशन खूप छान होतं. ज्या गोष्टी मी करू शतक नव्हते, त्या त्या करत होत्या. प्रीतम ताई खासदार असताना मी 5 वर्ष घरी बसले. आम्हाला तोही अनुभव आहे. आता मला असं वाटतं तेवढ्यावेळ त्यांना वाट बघावी लागणार नाही. मी जो शब्द जाहिररित्या सांगितल्या, प्रीतम मुंडेंना मी विस्थापित करणार नाही, हा शब्द कायम आहे, असे देखील पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत. 
 

    follow whatsapp

    ADVERTISEMENT