Prakash Ambedkar : "कुणबी मराठ्यांपासून सावध रहा, कारण..."; आंबेडकरांचा ओबीसींना इशारा

मुंबई तक

ADVERTISEMENT

वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर.
कुणबी मराठा हे ओबीसी नाहीत, असे विधान प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे.
social share
google news

बातम्या हायलाइट

point

प्रकाश आंबेडकर यांचे कुणबी मराठ्यांबद्दल भाष्य

point

ओबीसी आरक्षणाला स्थगिती दिली जाईल -आंबेडकर

point

आरक्षणाच्या मुद्द्यावर आंबेडकर काय बोलले?

 Prakash Ambedkar News : 'कुणबी मराठा हे खरे ओबीसी नाहीत. त्यांच्यापासून सावध रहा. विधानसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर ओबीसी आरक्षण स्थगित केले जाईल', असे मोठे विधान वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे. ओबीसी आरक्षण बचाओ यात्रा यवतमावळ जिल्ह्यातील पुसदमध्ये पोहोचली. यावेळी झालेल्या सभेत प्रकाश आंबेडकर यांनी ओबीसी आरक्षणाला धोका असल्याचे विधान केले. (Prakash Ambedkar has claimed that OBC reservation will be adjournment after the assembly election results)

मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी होत आहे. या मागणीला प्रकाश आंबेडकर यांनी विरोध केला आहे. पुसद येथे झालेल्या सभेत प्रकाश आंबेडकर यांनी कुणबी मराठा हे खरे ओबीसी नसल्याचे विधान केले. 

कुणबी आमदार मराठ्यांबरोबर -प्रकाश आंबेडकर

"कुणबी मराठ्यापासून सावध रहा, याचं कारण आताचं जे सभागृह आहे; यामध्ये १९० कुणबी मराठा समाजाचे आमदार आहेत. फक्त ११ ओबीसींचे आमदार आहेत. कुणबी स्वतःला ओबीसी जरी म्हणत असला, तरी सभागृहात तो म्हणतो की मी मराठ्यांबरोबर आहे", असे प्रकाश आंबेडकर सभेला संबोधित करताना म्हणाले.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हेही वाचा >> विधानसभेआधीच महाविकास आघाडीत बिघाडी? ठाकरेंच्या नेत्याच्या विधानाने खळबळ

"तो धनगरांबरोबर नाही, तो माळ्यांबरोबर नाही. तो वंजाऱ्यांबरोबर नाही. तो लिंगायतांबरोबर नाही. तो बंजाऱ्यांबरोबर नाही. तो तेली, तांबोळी, कुणबी, लोहार, सोनार, धनगर यांच्याबरोबर तर अजिबातच नाही. सावध रहा. यांच्यापासून सावध रहा", असा इशारा प्रकाश आंबेडकर यांनी ओबीसी प्रवर्गातील समाजघटकांना दिला. 

"जात जनगणना झाली पाहिजे"

"ओबीसींच्या आरक्षणाला धोका आहे का, तर शंभर टक्के धोका आहे. निवडणुकीच्या आधी नाही, पण निवडणुकीच्या नंतर आहे. माझ्या आधीच्या एका वक्त्याने ओबीसींची जातगणना झाली पाहिजे याबद्दल भाष्य केलं. ती झाली पाहिजे", अशी मागणी आंबेडकर यांनी केली.

ADVERTISEMENT

हेही वाचा >> अमोल मिटकरींची गाडी फोडणाऱ्या मनसे कार्यकर्त्याचा मृत्यू!  

ओबीसी आरक्षणाला स्थगिती दिली जाईल -आंबेडकर

"नवीन विधानसभा जेव्हा अस्तित्वात येईल. दोन तीन महिन्यात निवडणूका होतील. त्या नवीन विधानसभेत ओबीसींची ही जी मागणी आहे की, जात जनगणना केली पाहिजे, ती ताबडतोब मान्य होईल. सर्व ओबीसींना वाटेल आपली मागणी मान्य केली. पण, त्याच्याच बरोबर एक अजून ठराव मंजूर केला जाईल, तो म्हणजे जोपर्यंत ओबीसी प्रत्यक्षात किती टक्के आहे ही आकडेवारी येत नाही, तोपर्यंत ओबीसींच्या आरक्षणाला स्थगिती देण्यात आली", असे विधान आंबेडकर यांनी केले आहे.   

ADVERTISEMENT

 

    follow whatsapp

    ADVERTISEMENT