Bangladesh Violence: आरक्षणाच्या वादामुळे पंतप्रधानपद गेलं, बांग्लादेशात तुफान हिंसाचार.. शेख हसीना भारतात!
Bangladesh Violence and PM Sheikh Hasina: ढाका ट्रिब्यूनच्या वृत्तानुसार बांगलादेशातील हिंसाचारामुळे शेख हसीना या आपला देश सोडून भारतात दाखल झाल्या आहेत. आता सगळ्याचे परिणाम नेमके काय होतात हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे.
ADVERTISEMENT
Bangladesh Violence and PM Sheikh Hasina: ढाका: आरक्षणच्या मुद्द्यावरून शेजारी देश बांगलादेश हिंसाचाराच्या आगीत जळत आहे. एवढंच नव्हे तर यामुळे उसळलेली हिंसा यामुळे बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांना पदाचा राजीनामा देऊन थेट भारतात आश्रयासाठी यावं लागलं आहे. दरम्यान, या सगळ्या घडामोडी होत असताना दुसरीकडे बांगलादेशमध्ये मोठ्या संख्येने आंदोलक पंतप्रधानांच्या निवासस्थानात घुसून धुडगूस घालत आहेत.
ADVERTISEMENT
ढाका ट्रिब्यूनने दिलेल्या वृत्तानुसार शेख हसीना या भारतासाठी रवाना झाल्या आहेत. शेख हसीना यांची बहीणही त्यांच्यासोबत असल्याचे बोलले जात आहे. शेख हसीना यांच्या मुलाने देशाच्या सुरक्षा दलांना सत्तापालटाचे संभाव्य प्रयत्न यशस्वी होऊ देऊ नयेत असे आवाहन केले आहे. दरम्यान, राजधानी ढाकासह देशभरात लष्कर तैनात करण्यात आले आहे. तसेच कर्फ्यूही लागू करण्यात आला आहे. याआधी सत्ताधारी अवामी लीग आणि प्रमुख विरोधी पक्ष बीएनपी यांच्यात लष्कराच्या मुख्यालयात महत्त्वाची बैठक पार पडत आहे.
हे वाचलं का?
सविस्तर वृत्त थोड्याच वेळात
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT