2000 notes ban : … तर ही वेळ आली नसती, राज ठाकरे मोदी सरकारवर संतापले

मुंबई तक

ADVERTISEMENT

MNS president Raj Thackeray has criticized the Modi government after the decision to withdraw 2000 notes from circulation. Raj Thackeray presented his position in the words that the country cannot afford such decisions.
MNS president Raj Thackeray has criticized the Modi government after the decision to withdraw 2000 notes from circulation. Raj Thackeray presented his position in the words that the country cannot afford such decisions.
social share
google news

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने व्यवहारातून 2000 रुपयांची नोट काढून घेण्याचा निर्णय घेतला. आरबीआयच्या या निर्णयामुळे नोटबंदीच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत. दुसरीकडे विरोधकांनी यावरून मोदी सरकारला घेरलं आहे. यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मोदी सरकारला लक्ष्य करताना ‘हे असं सरकार चालतं का?’, असा सवाल केला आहे.

ADVERTISEMENT

आरबीआयने 2000 च्या नोटा काढून घेण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर राजकारण तापलं आहे. मोदी सरकार विरोधकांच्या टीकेचं धनी ठरत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही यानिर्णयावरून ठाकरे शैलीत सुनावले.

हेही वाचा >> त्र्यंबकेश्वर वाद : ‘हे कोत्या वृत्तीची लोक’, राज ठाकरे फडणवीसांवर बरसले

नाशिक येथे झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना राज ठाकरे म्हणाले, “तुम्हाला आठवत असेल, तर मी त्याच वेळी यावर एक भाषण केलं होतं. याच्यामध्ये हा जो धरसोडपणा आहे. जर तज्ज्ञांना विचारून जर गोष्टी झाल्या असत्या, तर ही वेळ आली नसती. कधी गोष्ट आणायची, कधी बंद करायची. त्यावेळी या नोटा आणल्या, त्यावेळी त्या एटीएम मशीनमध्येही जात नव्हत्या. म्हणजे एटीएम मशीनमध्ये जाताहेत की, नाही हेही पाहिलं नव्हतं.”

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हे असं सरकार चालत का?

“हे असले निर्णय देशाला परवडणारे नसतात. आता लोकांनी परत बँकांमध्ये पैसे टाकायचे, परत उद्या तुम्ही काहीतरी नवीन नोट आणणार. हे असं सरकार चालतं का? असे प्रयोग थोडे असतात”, अशा शब्दात राज ठाकरेंनी सरकारला खडेबोल सुनावले.

नोटबंदी फसली असं तुम्हाला म्हणायचं आहे का? असा प्रश्न या मुद्द्याला धरून विचारण्यात आला. त्यावर राज यांनी सांगितलं की, “मी तेव्हाच या गोष्टी बोललो होतो. तुम्ही मला जे प्रश्न विचारता ना, ते सरकारमधील लोक येतात. त्यावेळी तुमच्या तोंडाला चैन लावलेली असते का? की तुम्हाला कुणीतरी पाठवलं की हे प्रश्न विचारा.”

ADVERTISEMENT

30 सप्टेंबरपर्यंत परत करता येणार 2000 च्या नोटा

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 2000 च्या नोटा काढून घेण्याचा निर्णय जाहीर करताना 23 मे ते 30 सप्टेंबरपर्यंत बँकेत जाऊन 2000 च्या नोटा बदलता येतील, अशी माहिती दिली. त्याचबरोबर एकावेळी 2000 हजाराच्या 10 नोटाचं बदलून मिळतील अशी मर्यादाही घातली.

ADVERTISEMENT

Video >> ‘पक्षाची दारं खुली, पण कुणी आला की तिकीट मिळणार नाही’, फडणवीसांनी झापलं

रिझर्व्ह बँकेने एक निवेदन प्रसिद्ध करून बँकांनाही याबद्दल सूचना केली आहे. ग्राहकांना 2000 च्या नोटा न देण्याचा सल्ला दिला आहे. तुमच्याकडेही 2000 च्या नोटा असतील तर तुम्ही त्या तुमच्या खात्यात जमा करू शकता किंवा बँकेच्या शाखेत जाऊन बदलू शकता.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT