Rajan Salvi : उद्धव ठाकरेंची साथ सोडणार, राजन साळवी 'या' पक्षात प्रवेश करणार, कोकणात मशालीच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह?

मुंबई तक

राजन साळवी हे पुढच्या दोन दिवसात पत्रकार परिषदेतून आपली भूमिका स्पष्ट करतील अशी माहिती असली तरी, ते पक्ष सोडणार हे आता जवळपास निश्चित झालं आहे.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

राजन साळवी ठाकरेंची साध सोडणार?

point

उद्धव ठाकरे यांना कोकणात मोठी धक्का

Rajan Salvi : उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मिळणाऱ्या धक्क्यांची मालिका अजूनही सुरूच आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत काही नेते आणि पदाधिकारी महायुतीकडे गेल्यानंतर आता कोकणातला आणखी एक नेता ठाकरेंची साथ सोडणार असल्याचं समोर आलं आहे. लांजा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार राजन साळवी हे आता लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे. पुढच्या 48 तासाच राजन साळवी हे आपली भूमिका मांडतील अशी शक्यता आहे. मात्र, एकूणच यामुळे ठाकरेंना पुन्हा एकदा कोकणात धक्का बसणार असून, शिवसेनेचं अस्तित्व कमी होणार आहे. 

हे ही वाचा >> Mumbai Tak Chavdi: "शंभर टक्के वाल्मिक कराडचं नाव 302 मध्ये येईल...", सुरेश धस यांनी दिली खळबळजनक माहिती

राजन साळवी हे पुढच्या दोन दिवसात पत्रकार परिषदेतून आपली भूमिका स्पष्ट करतील अशी माहिती असली तरी, ते पक्ष सोडणार हे आता जवळपास निश्चित झालं आहे. कार्यकर्ते, पदाधिकारी आणि मतदारसंघातील लोकांशी संवाद साधल्यानंतर ते हा निर्णय घेतील अशी माहिती असली, तरी ठाकरेंकडून त्यांना फोन करण्यात आल्याचंही समोर आलं आहे. त्यामुळे ठाकरे त्यांची मनधरणी करणार का? मनधरणी झाली, तरी साळवी ऐकणार का असे अनेक प्रश्न सध्या या मतदारसंघातील आणि एकूणच कोकणातील राजकीय वर्तुळात रंगली आहे.

हे ही वाचा >> Nagpur Crime News : आधी आईचा गळा दाबला, नंतर बापावर सपासप वार करून संपवलं; नागपुरात इंजिनीअरींगचा विद्यार्थी हैवान का बनला? 

राजन साळवी यांच्यावर काही दिवसांपूर्वी यंत्रणांकडून मोठी चौकशी करण्यात आली होती. एका प्रकरणात अधिकाऱ्यांनी त्यांच्या घरात येऊन मोजणी करत घरातल्या वस्तूंच्या किंमती जाणून घेण्यापर्यंत विषय गेला, तेव्हा साळवी कुटुंब नाराज होऊन ढसाढसा रडलं होतं. यावेळी आपली हेतूपुरस्करपणे चौकशी केली जात असल्याचा आरोप राजन साळवी यांनी केला होता.

हे वाचलं का?

    follow whatsapp