Sada Sarvankar : "मुलाला पुढे आणण्यासाठी ठाकरेंना घरात कोंडून ठेवलं", खळबळजनक विधान
Sada Sarvankar Rashmi Thackeray : आमदार सदा सरवणकर यांनी रश्मी ठाकरेंबद्दल गंभीर विधान केले आहे.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
सदा सरवणकर यांचे खळबळजनक विधान
रश्मी ठाकरेंबद्दल शिंदेंच्या आमदाराचे विधान
आदित्य ठाकरेंना बनवायचं होतं मुख्यमंत्री -सरवणकर
Sada Sarvankar, Rashmi Thackeray, Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे यांनी इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या मुलाखतीत असा दावा केला की, देवेंद्र फडणवीस आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री करणार होते. ते दिल्लीत जाणार होते. ठाकरेंच्या या विधानाची चर्चा थांबत नाही, तोच आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार सदा सरवणकर यांनी रश्मी ठाकरेंना कपटी म्हणत मोठा गौप्यस्फोट केला. (Sada Saravankar claimed that Rashmi Thackeray wanted Aditya Thackeray to be the Chief Minister)
ADVERTISEMENT
उद्धव ठाकरे यांनी केलेल्या विधानामुळे आदित्य ठाकरे यांचे नाव दोन दिवसांपासून चर्चेत आहेत. आदित्य ठाकरेंना पुढचे मुख्यमंत्री म्हणून तयार करू, असे फडणवीस यांनी सांगितले होते, असा दावा उद्धव ठाकरेंनी केल्यानंतर त्यावर भाजपकडूनही प्रतिक्रिया आल्या. आता यात शिंदेंच्या शिवसेनेच्या नेत्याने उडी घेतली आहे.
रश्मी ठाकरे अतिशय कपटी
मुंबईतील एका कार्यक्रमात बोलताना आमदार आणि श्री सिद्धीविनायक गणपती मंदिर न्यासचे अध्यक्ष सदा सरवणकर यांनी थेट उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरेंवरच हल्ला चढवला. सरवणकर यांनी रश्मी ठाकरेंचा नामोल्लेख न करता खळबळ उडवून देणारा दावा केला.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
हेही वाचा >> "इथून पुढे मी शिवाजी महाराजांची भूमिका करणार नाही" मराठी अभिनेत्याचा मोठा निर्णय
ते म्हणाले की, "एक अतिशय विचित्र व्यक्तिमत्व (रश्मी ठाकरे), जे दिसतंय खुळं; पण अतिशय कपटी. मुलाला पुढे आणण्यासाठी मातोश्रींनी केलेला अट्टाहास म्हणजे उद्धव ठाकरेंना अडीच वर्ष घरात कोंडून ठेवणं."
हेही वाचा >> "मोदी देशाचे पंतप्रधान नाही, तर...", शरद पवारांनी डिवचले
पुढे त्यांनी म्हटलं आहे की, "त्यांना (उद्धव ठाकरे) घरात कोंडून ठेवायचं, मुलाला थोडं पुढे आणायचं आणि मग त्याला मुख्यमंत्री करायचं, हे त्यांच्यातल्या (रश्मी ठाकरे) आईचं प्लॅनिंग होतं", असं विधान सदा सरवणकर यांनी केलं. त्यांच्या या विधानाची जोरदार चर्चा होत आहे.
ADVERTISEMENT
"आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री पदासाठी तयार करणार"
उद्धव ठाकरे यांनी मुलाखतीत अमित शाहांसोबत झालेली चर्चा आणि देवेंद्र फडणवीस काय म्हणाले, याबद्दल सांगितलं आहे.
ADVERTISEMENT
हेही वाचा >> "...त्यावेळी उभं करू नका; सांगा अजित पवार चले जाव"
त्यांनी सांगितलं की, 'अमित शाह यांनी मला आश्वासन दिले होते की, भाजप आणि शिवसेनेकडे प्रत्येकी अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्रीपद असेल.' पुढे ठाकरेंनी असा दावा केला की, 'नंतर मला देवेंद्र फडणवीस असं म्हणाले की, उद्धवजी, मी आदित्यला 2.5 वर्षांसाठी तयार करेन. आपण त्याला अडीच वर्षानंतर मुख्यमंत्री बनवू शकतो. मी त्यांना (फडणवीस) म्हणालो की, त्याने आता राजकीय करिअर सुरू केलं आहे, त्याच्या मनात काही टाकू नका.'
ADVERTISEMENT