Sachin Pilot-Sara Love Story : घरच्यांचा विरोध तरीही…; पायलटांची ‘सैराट’ लव्ह स्टोरी

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

sachin pilot sara abdullah divorce farooq abdullah daughter read full love story
sachin pilot sara abdullah divorce farooq abdullah daughter read full love story
social share
google news

Sachin Pilot-Sara Pilot Love Story : राजस्थानमध्ये विधानसभा निवडणूकांचे बिगूल वाजले आहे. येत्या 25 नोव्हेंबर 2023 ला राजस्थानमध्ये विधानसभा निवडणूका होणार आहेत. या निवडणूकीत काँग्रेस नेते आणि माजी उप मुख्यमंत्री सचिन पायलट (Sachin Pilot) यांनी काँग्रेसकडून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. या उमेदवारी अर्जात सचिन पायलटने स्वत:ला घटस्फोटीत असा उल्लखे केला आहे. उमेदवारी अर्जातील या उल्लेखानंतर आता राजकिय वर्तुळात सचिन पायलट आणि सारा पायलटच्या (Sara Pilot) लव्हस्टोरीची चर्चा रंगली आहे. (sachin pilot sara abdullah divorce farooq abdullah daughter read full love story)

ADVERTISEMENT

सचिन पायलट (Sachin Pilot) आणि सारा अब्दुल्लाचं (Sara Pilot) कुटुंबिय राजकारणात सक्रिय राहिले आहे. सचिन पायलट दिवंगत काँग्रेस नेते राजेश पायलट यांचे मुलगे आहेत. तर सारा अब्दुल्ला ही जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूक अब्दुल्ला यांची मुलगी आहे आणि उमर अब्दुलाची बहिण आहे. साराचे आजोबा शेख अब्दुला एक लोकप्रिय नेते आहेत. सचिन हिंदु आणि सारा मुस्लिम असल्याने त्यांच्या लग्नातला सर्वात मोठा अडथळा होता. पण अखेर त्यांनी विरोध डावलून लग्न केलेच.

हे ही वाचा : Kanpur: दररोज यायची घरी… ट्यूशन टीचरने विद्यार्थ्यालाच कसं संपवलं? Inside Story

लंडनमध्ये झाली दोघांची भेट

सचिन पायलटचा जन्म युपीच्या सहारनपुरमध्ये झाला होता. सेंट स्टीफन कॉलेजमधून त्यांनी त्यांचे शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण पुर्ण केले होते. यानंतर युनिवर्सिटी ऑफ पेन्निसल्वानियामध्ये वार्टन स्कूल ऑफ बिझनेसमध्ये एमबीए करण्यासाठी सचिन पायलट विदेशात गेले.

हे वाचलं का?

तर सारा 1990 पर्यंत काश्मिरात आपल्या कुटुंबासोबत होती. यानंतर काश्मिर खोऱ्यात सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर सारा आणि तिच्या आईला लंडनमध्ये पाठवण्यात आले होते. आणि लंडनमध्य़े सारा आणि सचिनची पहिली भेट झाली होती. यावेळी एमबीए करत असताना सचिनची मैत्री सारा सोबत झाली. ही मैत्री पुढे आणखीणच घट्ट झाली आणि प्रेमात रूपांतरीत झाली. लंडनमध्ये सारा आणि सचिनला एकमेकांसोबत जास्त वेळ घालवता आला नाही. कारण कोर्स संपल्यानंतर सचिन भारतात परतला होता. तर सारा लंडनमध्येच होती. त्यानंतर सारा आणि सचिन ई-मेल्स आणि कॉल्सच्या माध्यमातून एकमेकांच्या संपर्कात होते.

ADVERTISEMENT

कुटुंबियांचा लग्नाला बहिष्कार

सचिन हा गुर्जर कुटुंबियातून येतो, तर साराही रूढीवादी मुस्मिल कुटुंबियातून येते. दोघांना लग्नात अडथळे येणार असल्याची पूरेपूर कल्पना होती. सचिन त्यांच्या आईला साराबद्दल सांगितले होते. मात्र सचिनच्या आईने या नात्याला स्विकारण्यास नकार दिला. सचिनचे संपूर्ण कुटुंबिय या लग्नाच्या विरोधात होते. तसेच साराच्या वडिलांनी देखील हे नाते स्विकारण्यास नकार दिला. सचिन आणि साराचे नाते सार्वजनिक झाल्यानंतर काश्मिर खोऱ्यात देखील अब्दुला विरोधात आंदोलने करण्यात आली. त्यांच्या पक्षाचे आमदारही त्यांच्या विरोधात गेले.

ADVERTISEMENT

हे ही वाचा : पत्नीने केले आयब्रो अन् मोडला संसार! नवरा बायकोत नेमकं काय बिनसलं?

2004 साली लग्नबंधनात अडकले

सचिन-साराने अनेक महिने आणि वर्ष वाद शमण्याची वाट बघितली, पण त्यांना कळुन चुकलेले हा वाद शमणार नव्हता. त्यानंतर अनेक महिने आणि वर्षाच्या प्रतिक्षेनंतर अखेर सचिन पायलट आणि साराने जानेवारी 2004 साली साध्या पद्धतीने लग्न केले होते. या लग्नाचे मोजक्याच नातेवाईकांना आमंत्रण देण्यात आले होते. या लग्नाचा साराचे कुटुंबिय म्हणजेच अब्दुला कुटुंबियांनी बहिष्कार टाकला होता.

सारा अब्दुला लग्नानंतर सारा पायलट बनली. काळाच्या ओघात फारूख अब्दुलाची नाराजी दुर झाली आणि भूतकाळातल्या कटू आठवणी विसरून बाप-लेक एकत्र आले. त्यानंतर सचिन पायलट लग्नाच्या काही महिन्यानंतर राजकारणात सक्रिय झाले होते.
,सचिन आणि साराला या लग्नापासून दोन मुले आहेत. एका मुलाचे आरान आहे, तर दुसऱ्याचे नाव वेहान आहे. यानंतर आता त्यांच्यात घटस्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे.

 

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT