Sambhaji Bhide: बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीनांनी भारतात आश्रय का घेतला? संभाजी भिडेंनी उलगडला 'तो' इतिहास

मुंबई तक

ADVERTISEMENT

Sambhaji Bhide On Sheikh Hasina
Sambhaji Bhide On Sheikh Hasina
social share
google news

बातम्या हायलाइट

point

"नागाच्या फण्याच्या आश्रयाखाली बेडूक येत नाही"

point

संभाजी भिडे नेमकं काय म्हणाले?

point

श्री शिवप्रतिष्ठानकडून २५ ऑगस्टला बंद

Sambhaji Bhide Press Conference : बांगलादेशमध्ये हिंसाचार उसळल्यानंतर पंतप्रधान शेख हसीना यांनी राजीनामा देत भारताकडे कूच केली होती. हसीना भारतात दाखल झाल्यानंतर बांगलादेशात राहणाऱ्या हिंदूंवर अमानुषपणे अत्याच्यार करण्यात आला. या घटनेच्या पार्श्वभूमीवर संभाजी भिडे यांनी शेख हसीना यांचा समाचार घेतला आहे. पत्रकार परिषदेत भिडे म्हणाले, "पाकिस्तान स्वातंत्र्य झाल्यानंतर पाकिस्तानचा अविभाज्य भाग म्हणून बांगलादेशचा जन्म झाला. बांगलादेश एक राष्ट म्हणून नव्हतं.

ADVERTISEMENT

पण उज्ज्वल रेहमान या स्वाभिमानी बांगलादेशीय समाजसेवकाने पाकिस्तानच्या आक्राळ विक्राळ वागणुकीचा निषेध केला. त्यानंतर बांगलादेश नावाचा स्वतंत्र राष्ट्र जन्माला आला. त्या राष्ट्राच्या पंतप्रधान (शेख हसीना) या बेबनावाममुळं हिंदूस्थानात आश्रयाला आल्या, असं मोठं विधान संभाजी भिडे यांनी केलं आहे. बांगलादेशात हिंदूवर सुरु असलेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ श्री शिवप्रतिष्ठान सांगली जिल्ह्यात २५ ऑगस्टला बंद पाळला जाणार आहे. (After the violence broke out in Bangladesh, Prime Minister Sheikh Hasina resigned and marched to India. After Hasina entered India, Hindus living in Bangladesh were brutally oppressed. In the background of this incident, Sambhaji Bhide has taken notice of Sheikh Hasina)

"नागाच्या फण्याच्या आश्रयाखाली बेडूक येत नाही"

संभाजी भिडे हसीना शेख यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका करत म्हणाले,फणा काढलेल्या नागाच्या आश्रयाला फण्याच्या सावली चांगली पडते म्हणून एखादं बेडूक येत नाही. त्याला कळतं की या नागाच्या फण्याच्या सावलीत आपण यायला नको. त्या दुसरीकडे कुठे गेल्या नाहीत. त्या इथेच आल्या. म्हणजे हिंदूस्थानाच्या आश्रयालाच आल्या. हिंदूंस्थानची संस्कृती ही जगाच्या कल्याणा संतांच्या विभुती, देह कष्टवीती उपकारी, अशी वृत्ती असलेला हिंदू समाज असल्यामुळं त्या आल्या आणि त्यांनी आश्रय घेतला. त्या इकडे आल्यानंतर बांगलादेशात प्रतिक्रिया उमटल्या.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हे ही वाचा >> Maharashtra Weather: कुठे उकाडा तर कुठे मुसळधार! आज तुमच्या शहरात पावसाचा अंदाज काय?

तिथले सैन्य आणि हसीन हे दोन्ही मुसलमान आहेत. पण हिंदूंवर अत्याचार केल्याचा संतापजनक प्रकार घडला, त्याचा निषेध व्हावा तसा हिंदूस्थानात होताना दिसत नाही. निषेध तत्काळ नको. ते थांबले पाहिजे. अशी भूमिका राष्ट्राच्या धोरणाने घेणं आवश्यक आहे. ती घेतलेली भूमिका समाजाला कळली पाहिजे. मोदी अथिशय चाणाक्ष, कडवा देशभक्त आहेत. पण समाजाची अपेक्षा आहे की, भारताने काही घवघवीत पाऊल उचलावं आणि सुरु असलेला प्रकार थांबवावा.

हे ही वचा >> Maharashtra Breaking News : खासदार भास्कर भगरेंना राखी बांधत सुप्रिया सुळेंनी साजरा केला रक्षाबंधनाचा सण

महाराष्ट्राचा जीवनगाडा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हाकत आहेत. लोकहितासाठी अखंड जागरुक असलेला महाराष्ट्र शासनाचा संसार ते चालवत आहेत. राष्ट्र म्हटल्यावर दररोज समस्यांची पालवी समाजाच्या जीवनमोक्षाला फुटत असते. त्या समस्यांवर रामबाण उपाय योजना शासनकर्ते चांगल्या प्रकारे पार पाडत आहेत. राष्ट्रापुढे कायम नवनवीन समस्या येत असतात, असंही भिडे म्हणाले.

ADVERTISEMENT

मराठा आरक्षणाबाबत संभाजी भिडेंनी घेतला यू टर्न

मराठा म्हणजे वाघ आणि सिंह, आरक्षण कुठे घेऊन बसलात? असं संभाजी भिडे म्हणाले आहेत. मराठ्यांना उभा देश चालवायचा आहे. आरक्षण कुठून काढलंय? असा सवाल भिडेंनी उपस्थित केला आहे. मराठा आरक्षणावरून संभाजी भिडे यांनी भूमिका बदलली आहे. कारण यापूर्वी भिडेंनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेत मराठा आरक्षणाच्या मागणीला जोर लावला होता. परंतु, आता संभाजी भिडे यांनी त्यांच्या भूमिकेतून यू टर्न घेतल्याचं समोर आलं आहे. मनोज जरांगे यांच्या उपोषणाला १०० टक्के यश येणार असल्याचं भिडेंनी म्हटलं होतं.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT