Chhatrapati Shivaji Maharaj: 'तेव्हाच PM मोदींना सांगितलेलं, महाराजांचा पुतळा...', संभाजीराजेंचं कोणी नव्हतं ऐकलं?

मुंबई तक

ADVERTISEMENT

sambhaji raje chhatrapati reaction on chhatrapati shivaji maharaj statue collapsed malvan rajkot fort pm narendra modi
पुतळा कोसळल्याच्या घटनेवर संभाजीराजे संतापले!
social share
google news

बातम्या हायलाइट

point

पुतळा कोसळल्याच्या घटनेवरून संभाजीराजे संतापले

point

पुतळा बदलण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे केली होती.

point

पुन:श्च महाराजांचे उचित स्मारक उभारणे गरजेचे आहे.

Chhatrapati Shivaji Maharaj Statue : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील समुद्र किनारपट्टीवर छत्रपती शिवाजी महाराज यांचा उभारण्यात आलेला पुतळा कोसळल्याची दुदैवी घटना दुपारी घडली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी गेल्या डिसेंबर महिन्यात या पुतळ्याचे लोकार्पण केले होते. त्यामुळे अवघ्या 8 महिन्यात हा पुतळा कोसळल्याने शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या घटनेवरून राजकारण प्रचंड तापलं असून विविध प्रतिक्रिया समोर येत आहेत. त्यात आता संभाजीराजे छत्रपती (Sambhaji raje Chhatrapati) यांनी या घटनेवर सतंप्त प्रतिक्रिया दिली आहे. (sambhaji raje chhatrapati reaction on chhatrapati shivaji maharaj statue collapsed malvan rajkot fort pm narendra modi) 

ADVERTISEMENT

गेल्या वर्षी  4 डिसेंबर 2023 ला नौदल दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मालवणमधील राजकोट किल्यावर येऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या या पुतळ्याचे अनावरण केले होते. या अनावरणाला आता 8 महिने उलटले आहेत. पण अवघ्या 8 महिन्यात शिवाजी महाराजांचा हा पुतळा कोसळल्याची घटना घडली आहे. त्यामुळे पुतळ्याच्या कामकाजाच्या निकृष्टतेवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. 

हे ही वाचा : Chhatrapati Shivaji Maharaj: शिवरायांचा पुतळा कोसळला अन् ठाकरेंचा आमदार संतापला, 'ते' ऑफिसच फोडलं!

संभाजीराजे छत्रपती यांनी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून या घटनेवर संताप व्यक्त केला आहे. तसेच संभाजी राजे यांनी पंतप्रधान मोदींना देखील खडा सवाल केला आहे. आता शिवरायांच्या पुतळा कोसळल्याच्या घटनेवर संभाजीराजे काय म्हणाले आहेत? हे जाणून घेऊयात. 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

संभाजीराजेंचे ट्विट जसंच्या तसं 

पंतप्रधानांनी उद्घाटन करण्यासाठी घाई गडबडीत उभारलेला पुतळा कोसळला ! मुळातच आकारहीन व शिल्पशास्त्रास अनुसरून नसलेला व घाईगडबडीत उभारलेला हा पुतळा बदलावा म्हणून तेव्हाच आम्ही पंतप्रधानांकडे पत्र लिहून मागणी केली होती. या महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक वर्षभरात कोसळते यासारखी दुर्दैवी बाब कोणती नाही. अशा परिस्थितीत महाराजांच्या किल्ल्यांवर आपण कोणत्या अधिकाराने बोलणार ! 

आता त्याठिकाणी पुन:श्च महाराजांचे उचित स्मारक उभारणे गरजेचेच आहे. पण निवडणुकीच्या आधी ते उभारण्याच्या इर्ष्येत परत काही गडबड करू नये. उशीर होऊदे पण शास्त्रोक्त पद्धतीने या स्मारकाची पुनर्बांधणी झाली पाहिजे.

ADVERTISEMENT

हे ही वाचा : Kangana Ranaut: 'यापुढे 'त्यावर' अजिबात बोलायचं नाही' भाजपने कंगनाला सगळ्यांसमोर का सुनावलं?

संबंधितांवर गुन्हा दाखल करणार 

शिवरायांचा पुतळा नौदलाच्या अखत्यारीत येतो. त्यांनीच या पुतळ्याची उभारणी केली होती. यासंदर्भात मेसर्स आर्टीस्ट्री नावाच्या कंत्राटीला काम देण्यात आले होते. जयदीप आपटे कंपनीचे प्रोप्रायटर आहेत तर चेतन पाटील स्ट्रक्चरल कन्सल्टंट म्हणून काम पाहत होते. समुद्र किनारी असलेल्या शिवरायांच्या पुतळ्याच्या नटबोल्टला गंज लागत असल्याचेही निदर्शनास आले होते. त्यानंतर 20 आगस्ट रोजी सार्वजनिक बांधकाम विभागानं पत्र लिहून नौदलाच्या निदर्शनास आणून दिले होते. 

ADVERTISEMENT

या प्रकरणी संबंधितांवर गुन्हा दाखल व्हावा यासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण मालवण पोलीस ठाण्यात दाखल झाले आहेत. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. दोषींवर कडक कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली आहे. 
 

    follow whatsapp

    ADVERTISEMENT