Sandhy Sonawane : Walmik Karad यांच्याशी काय संबंध? CID चौकशी का झाली? संध्या सोनवणे यांनी स्पष्ट सांगितलं

मुंबई तक

राष्ट्रवादीच्या युवती प्रदेशाध्यक्ष संध्या सोनवणे यांना CID ने बीड प्रकरणात चौकशीसाठी बोलावलं होतं का? संध्या सोनवणे यांची बराचवेळ पोलिसांनी चौकशी केली. 

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

"वाल्मिक कराड यांच्याशी सगळेच संपर्कात असतात"

point

"निवडणूक काळात आम्ही संपर्कात होता"

point

"चौकशीला आलेल्या सर्वांच्याच वाल्मिक कराड संपर्का होते"

बीडमध्ये झालेल्या मस्साजोग गावच्या सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणी आणि फरार वाल्मिक कराड प्रकरणी काल अजित  पवार यांच्या राष्ट्रवादीच्या युवती अध्यक्ष संध्या सोनवणे यांची चौकशी झाली. याप्रकरणात दररोज एक नवं नाव समोर येत असतानाच संध्या सोनवणे यांचा प्रकरणाशी नेमका काय संबंध हे जाणून घेण्यासाठी मुंबई तकने संध्या सोनवणे यांच्याशी संवाद साधला. 29 आणि 30 डिसेंबररोजी संध्या सोनवणे यांची चौकशी करण्यात आली आहे. CID कडून चौकशी झाल्यानंतर संध्या सोनवणे म्हणाल्या की, पक्षातील अनेकांना चौकशीसाठी बोलावण्यात आलं होतं. त्यामध्ये जिल्हाध्यक्ष आणि इतर पदाधिकारी यांचीही चौकशी करण्यात आली आहे. 

हे ही वाचा >> Beed: 'धनंजय मुंडेंना मंत्रिपदावरून काढून टाका...', कोणी केली थेट हायकोर्टात याचिका?


संध्या सोनवणे म्हणाल्या, बीड जिल्हा हा जामखेडच्या जवळच आहे. जामखेडच्या सर्वच पदाधिकाऱ्यांचा बीड जिल्ह्याशी संपर्क येत असतो, म्हणून मला या प्रक्रियेत बोलावलं होतं असं संध्या सोनवणे यांनी सांगितलं. रविवारी माझी 2 तास चौकशी झाली, त्यामध्ये पक्षाशी संबंधीत आणि निवडणुकीच्या काळात आमचा संपर्क झाला असल्यानं माझी चौकशी झाली. मात्र, बीडमध्ये घडलेल्या घटनेपूर्वी 2 महिने माझा कुणाशीही संपर्क झाला नाही असं संध्या सोनवणे म्हणाले. वाल्मिक कराड यांच्याशी झालेल्या संपर्काबद्दल मला सवाल करण्यात आला. त्यांनी विचारलेल्या प्रश्नांना मी समाधानकारक उत्तरं दिली, त्यामुळेच हे प्रकरण थांबलं असं संध्या म्हणाल्या. मी रविवारी तिथे गेली असताना 40 लोक तिथे होते, नंतरही भरपूर लोक होते. त्यामुळे जवळपास 200 च्या वर चौकशी झालेल्या लोकांचा आकडा आहे असं संध्या सोनवणे म्हणाल्या. 

कोण आहेत संध्या सोनवणे? 

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची नऊ डिसेंबर रोजी हत्या करण्यात आली होती. आरोपींनी त्यांचं अपहरण करुन त्यांना बेदम मारहाण करुन त्यांचा खून केला. या सगळ्या प्रकरणानंतर राज्यातील राजकारण चांगलंच ढवळून निघालं. विरोधकांकडून हा मुद्दा चांगलाच लावून धरण्यात आला. बीडमध्ये सर्वपक्षीय मोर्चा काढत वाल्मिक कराडवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. आता या प्रकरणात एसआयटी स्थापन करण्यात आली असून सीआयडी मार्फत देखील तपास करण्यात येत आहे. यात राष्ट्रवादीच्या युवती प्रदेशाध्यक्षा संध्या सोनवणे यांना देखील चौकशीला बोलावण्यात आलं. संध्या सोनवणे यांची बराचवेळ पोलिसांनी चौकशी केली. 

संध्या सोनवणे या महाविद्यालयीन जीवनापासून सामाजिक कार्यात सक्रीय आहेत. पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयातून त्यांनी शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच विद्यार्थी चळवळीत त्यांनी सहभाग घेतला. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे प्रश्न असोत की पुणे विद्यापीठातील विद्यार्थ्यांचे प्रश्न असोत संध्या सोनवणे यांनी ते लावून धरले. महाविद्यालयीन काळातच त्यांनी विद्यार्थ्यांना मदत करणाऱ्या सामाजिक संघटनेसोबत देखील काम केलं आहे. याच काळात त्यांनी अनेक विद्यार्थी आंदोलनात देखील सहभाग घेतला. 
पुढे त्यांनी सक्रीय राजकारणात जाण्याचा निर्णय घेतला. संध्या सोनवणे या कर्जत जामखेडच्या रहिवाशी आहेत. राष्ट्रवादीत फूट पडण्याआधी त्यांनी रोहित पवारांसोबत काम केलं आहे. रोहित पवार कर्जत जामखेडमध्ये उमेदवार म्हणून उभे राहिले तेव्हा संध्या सोनवणे यांनी त्यांचा जोरदार प्रचार केला होता. रोहित पवारांसाठी त्यांनी कर्जत जामखेडमध्ये खिंड लढवली होती. 

हे ही वाचा >> Walmik Karad : पोलिसांच्या 'या' दोन अ‍ॅक्शन, वाल्मिक कराड शरण येणार? संतोष देशमुख प्रकरणात मोठी अपडेट

सक्रीय राजकारणात येण्यासाठी संध्या यांनी जामखेड तालुक्यातील नायगाव ग्रामपंचायतीची निवडणूक लढवली. त्यात त्या सदस्य म्हणून देखील निवडूण आल्या. राष्ट्रवादीत फूड पडली नव्हती त्यावेळी त्यांना पुण्याची विद्यार्थी संघटनेची जबाबदारी देखील देण्यात आली होती. पुढे राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर संध्या यांनी अजित पवारांसोबत जाण्याचा निर्णय घेतला. अजित पवारांच्या पक्षासोबत त्यांनी पुढे काम सुरु केलं. याच दरम्यान संध्या यांना राष्ट्रवादीचं युवती प्रदेशाध्यक्ष पद देखील देण्यात आलं. महायुतीत अजित पवार देखील सहभागी असल्याने या निवडणुकीत संध्या यांनी कर्जत जामखेडमध्ये राम शिंदे यांचं काम केलं. या निवडणुकीत त्यांनी राम शिंदे यांच्यासाठी देखील सभा घेतल्याचं दिसून आलं. 

हे वाचलं का?

    follow whatsapp