Sanjay Raut : 'वाल्किम कराडचा बॉस धनंजय मुंडे...', धस-मुंडे भेटीनंतर संजय राऊत नेमकं काय म्हणाले?

मुंबई तक

Sanjay Raut On Suresh Dhas : "'मी कोणावर व्यक्तीगत आरोप करत नाही. पण राजकारणात किमान नैतिकतेचं पालन तरी व्हावं. सुरेश धस भाजपचे आमदार आहेत. त्यांनी बीडमध्ये आंदोलन चालू केलं. एका खुनाला वाचा फोडली".

ADVERTISEMENT

Sanjay Raut On Suresh Dhas
Sanjay Raut On Suresh Dhas
social share
google news

बातम्या हायलाइट

point

सुरेश धस-धनंजय मुंडे यांच्या भेटीबाबत संजय राऊतांचं मोठं विधान!

point

"संतोष देशमुख कुटुंबियांच्या अश्रूंचा बाजार..."

point

संजय राऊत पत्रकार परिषदेत नेमकं काय म्हणाले?

Sanjay Raut On Suresh Dhas : "'मी कोणावर व्यक्तीगत आरोप करत नाही. पण राजकारणात किमान नैतिकतेचं पालन तरी व्हावं. सुरेश धस भाजपचे आमदार आहेत. त्यांनी बीडमध्ये आंदोलन चालू केलं. एका खुनाला वाचा फोडली आणि खरे आरोपी आका, आकाचे आका हे शब्द भाजपने आणले आहेत. आमचा काही संबंध नाही. बावनकुळे आणि फडणवीसांनी सांगावं धस यांच्याशी आमचा काही संबंध नाही. धस यांनी जेव्हा पहिली बोंब मारली तेव्हाच त्यांना थांबवायला पाहिजे होतं. पण धसला बोंबाबोंब करून दिली. बीडमध्ये एक वातावरण निर्मिती केली. धस यांनी संतोष देशमुखच्या खून प्रकरणात एक आंदोलन उभं केलं. त्याला मी जनआंदोलन म्हणतो. संतोष देशमुख यांचा मुलगा, मुलगी, भाऊ, यांना सोबत घेऊन त्यांनी बीडमध्ये स्वत:चं नेतृत्व उभं करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या अश्रूंचा बाजार केला", असं खळबळजन विधान शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलं आहे.

पत्रकार परिषदेत संजय राऊत म्हणाले, "वाल्किम कराड असेल किंवा वाल्किम कराडचा बॉस धनंजय मुंडे यांसदर्भात महाराष्ट्राच्या जनतेला माहिती कुणी दिली. आम्हाला हे माहित नव्हतं. बीडमध्ये काय चाललंय आणि बिहार टाईप माफियांचं नेतृत्व कोण करतोय? हे सुरेश धस यांनी महाराष्ट्राला आणि देशाला सांगावं. धनंजय मुंडे यांच्यासंदर्भात त्यांची एक भूमिका होती आणि ती अत्यंत परखड भूमिका होती. त्यांच्या दृष्टीने ते गुन्हेगार आरोपी आणि बीडमधले मुख्य सूत्रधार आहेत बीड मधल्या माफिया टोळ्यांचे..हे मी म्हणत नाही. सुरेश धस म्हणत आहेत आणि त्या मुंडेंना तुम्ही अचानक रात्री भेटायला जाता".

हे ही वाचा >> सुरेश धसांचा नवा लेटर बॉम्ब... 'त्या' भेटीनंतर धनंजय मुंडे पुन्हा टार्गेटवर?

"चार तास बसता, जेवण करता. लोकांच्या मनास संशय निर्माण होतो. फडणवीस म्हणतात भेटलं तर काय झालं? काहीच हरकत नाही भेटायला..पण ज्यांच्यावर तुम्ही आरोप करताय? ज्यांना तुम्ही मुख्य खुनाचे सूत्रधार मानताय? ज्यांना तुम्ही बीडमधल्या मिर्झापूरचं डॉन मानताय. त्यांना तुम्ही रात्री गुपचूप भेटता आणि फडणवीस त्याचे समर्थन करतात. म्हणजे तुमचं मिलिभगत आहे की काय? याच सुरेश धस किंवा धनंजय मुंडेंची नाचक्की झाली नसून बावनकुळे आणि फडणवीस यांच्या नैतिकतेचा बुरखा फाटला हे स्पष्टपणे मला सांगायचंय. धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्यायचा की नाही, त्यापेक्षा तो कुणी घ्यायचा हे ठरायला पाहिजे. तो अजित पवारांनी घ्यायचाय की देवेंद्र फडणवीसांनी घ्यायचाय? कोणाला वाचवताय?", असा सवालही संजय राऊत यांनी उपस्थित केलाय.

हे ही वाचा >> चेहऱ्यावर लावा केशर, त्वचा होईल एकदम क्लिअर...

हे वाचलं का?

    follow whatsapp