Sanjay Raut : सांगलीवर बोलत असाल तर आम्हीही कोल्हापूर, रामटेकचं... राऊतांचा थेट काँग्रेसला इशारा?

मुंबई तक

ADVERTISEMENT

संजय राऊत यांचा काँग्रेसला गर्भित इशारा?
संजय राऊत यांचा काँग्रेसला गर्भित इशारा?
social share
google news

बातम्या हायलाइट

point

जागावाटपावरुन मविआत तिढा कायम

point

काँग्रेस आणि शिवसेनेत एकमत होईना

point

मविआची यादी कधी जाहीर होणार

Sanjay Raut on MVA Seat Sharing मुंबई : विधानसभेच्या पार्श्वभूमीवर सध्या युती आणि आघाडीचा जागावाटपासाठी बैठकांचा सपाटा सुरू आहे. एकीकडे काल भाजपने आपली 99 जणांची यादी जाहीर करून दंड थोपटले आहेत. तर एकनाथ शिंदे यांची यादीही तयार असल्याचं त्यांच्याकडून सांगितलं जातंय. मात्र दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये अजूनही काही जागांवरुन तिढा कायम असल्याचं दिसतंय. नुकत्याच झालेल्या मविआच्या बैठकांनंतर संजय राऊत यांनी दिलेल्या प्रतिक्रियेवरुन जागा वाटपावरून शिवसेना आणि काँग्रेसमधील अंतर वाढल्याचं चित्र दिसतंय. काही जागांवर अजूनही एकमत झालं नसून, त्यामुळे जागा वाटप प्रलंबित असल्याचं राऊतांनी मान्य केलंय. यावेळी संजय राऊत यांनी काँग्रेसला गर्भित इशारा दिला आहे. तसंच आघाडीत अशा गोष्टी होत असतात, त्यामुले याकडे दुर्लक्ष करा, आमची यादी आज संध्याकाळीही येऊ शकते असं राऊत म्हणाले. (Sanjay raut reaction on congress amid assembly elections 2024 seat sharing formula)

हे ही वाचा >>नाराजांना कसं समजावणार? तिकीट मिळताच दादांचा गेम प्लॅन

"...तर कोल्हापूर, रामटेकचा उल्लेख झाल्यास वाईट वाटायला नको"

 


भाजपने दुपारी भाजपने आपल्या 99 उमेदवारांची यादी जाहीर केली. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अवघे आठ दिवस बाकी आहेत. मात्र महाविकास आघाडीमध्ये अजूनही काही जागांवरुन एकमत होत नाहीये असं दिसतंय. संजय राऊत आणि नाना पटोले यांच्यातला विसंवाद तर भर पत्रकार परिषदेतही दिसून आले. त्यानंतर त्यांनी आपल्यात मैत्रीपूर्ण संबंध असल्याचं दाखवलं, मात्र अजूनही महाविकास आघाडीची यादीचं काम अंतिम टप्प्यात आली नसल्याचं दिसून येतंय. यावेळी संजय राऊत म्हणाले की, "मी कुठल्या पक्षाचं नाव घेत नाही, मात्र कुणी सांगलीचं नाव सांगत असतील तर आम्हीही कोल्हापूर, रामटेकसारख्या प्रेमाने काही जागा सोडल्या तर त्याच प्रेमाने आम्हाला काही जागा मिळाव्या असं म्हटलं तर कुणाला वाईट वाटू नये" असं म्हणत संजय राऊत यांनी इशारा दिला. 

विदर्भातील काही जागांवर मविआमध्ये अजूनही एकमत होत नसल्याचं चित्र आहे. तसंच काही ठराविक जागा शिवसेनेला सोडायच्याच नाही असा सूर राज्यातल्या काँग्रेस नेत्यांनी दिल्लीतील हायकमांडकडे लावल्याचं म्हटलं जातंय. त्यावर राऊत म्हणाले की, 'असे सूर लागत नाही, त्यामुळे सगळ्यांचे सूर बिघडतात'असा गर्भित इशाराही संजय राऊत यांनी दिला आहे. तसंच एकत्र निवडणुका लढत असताना प्रत्येकाला एक पाऊल मागे-पुढे घ्यावं लागतं असं राऊत म्हणाले. 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

भाजपने यादी जाहीर करुन तीर नाही मारला : राऊत 

भाजपने काल 99 उमेदवारांची यादी जाहीर केली. यावर बोलताना राऊत म्हणाले की, भाजपने जवळपास सगळ्या विद्यमान आमदारांनाच तिकीट दिलं, त्यात काही तीर मारला नाही असं संजय राऊत म्हणाले. 

भाजपच्या 99 उमेदवारांची यादी 

हे ही वाचा >>Ladki Bahin Yojana: महिलांनो! लाडकी बहीण योजना बंद होणार? निवडणुकीआधी समोर आली सर्वात मोठी अपडेट

 


1.    नागपूर दक्षिण पश्चिम - देवेंद्र फडणवीस
2.    कामठी - चंद्रशेखर बावनकुळे 
3.    शहादा - राजेश पाडवी
4.    नंदुरबार - विजयकुमार कृष्णराव गावित
5.    धुळे -    अनुप अग्रवाल 
6.    सिंदखेडा - जयकुमार जितेंद्रसिंग रावल
7.    शिरपूर - काशीराम वेचन पावरा
8.    रावेर - अमोल जावले
9.    भुसावळ - संजय वामन सावकारे 
10.    जळगाव - सुरेश दामू भोले
11.    चाळीसगाव - मंगेश रमेश चव्हाण 
12.    जामनेर - गिरीश दत्तात्रेय महाजन
13.    चिखली - श्वेता विद्याधर महाले
14.    खामगाव - आकाश पांडुरंग फुंडकर 
15.    जळगाव (जामोद) - डॉ. संजय श्रीराम कुटे
16.    अकोला पूर्व - रणधीर प्रल्हादराव सावरकर
17.    धामगाव रेल्वे - प्रताप जनार्दन अडसद
18.    अचलपूर - प्रविण तायडे
19.    देवली - राजेश बकाने 
20.    हिंगणघाट - समीर त्र्यंबकराव कुणावर
21.    वर्धा - पंकज राजेश भोयर
22.    हिंगणा - समीर दत्तात्रेय मेघे
23.     नागपूर दक्षिण - मोहन गोपालराव माते
24.    नागपूर पूर्व - कृष्ण पंचम खोपडे
25.    तिरोरा - विजय भरतलाल रहांगडाले 
26.    गोंदिया - विनोद अग्रवाल
27.    अमगाव - संजय हनवंतराव पुरम
28.    आमोरी - कृष्णा दामाजी गजबे
29.    बल्लारपूर - सुधीर मुनगंटीवार
30.    चिमूर - बंटी भांगडिया
31.    वानी - संजीव रेड्डी बापुराव बोडकुरवार
32.    रालेगाव - अशोक रामाजी उईके
33.    यळतमाळ - मदन येरवर 
34.    किनवट - भीमराव रामजी केरम
35.    भोकर - सुश्री श्रीजया अशोक चव्हाण
36.    नायगाव - राजेश संभाजी पवार
37.    मुखेड - श्री तुषार राठोड
38.    हिंगोली - तानाजी मुटकुले 
39.    जिंतूर - मेघना बोर्डिकर
40.    परतूर - बबनराव लोणीकर 
41.    बदनापूर - नारायण कुचे 
42.    भोकरदन - संतोष रावसाहेब दानवे
43.    फुलंब्री - अनुराधाताई अतुल चव्हाण
44.    औरंगाबाद पूर्व - अतुल सावे
45.    गंगापूर - प्रशांत बंब
46.    बगलान -  दिलीप बोरसे 
47.    चंदवड - राहुल दौलतराव अहेर
48.    नाशिक पूर्व - राहुल उत्तमराव ढिकाले
49.    नाशिक पश्चिम - सीमा हिरे
50.    नालासोपारा - राजन नाईक
51.    भिवंडी पश्चिम - महेश प्रभाकर चौघुले
52.    मुरबाड - किसन कथोरे 
53.    कल्याण पूर्व- सुलभा कालू गायकवाड कालू गायकवाड
54.    डोंबिवली - रवींद्र चव्हाण
55.    ठाणे - संजय केळकर
56.    ऐरोली  - गणेश नाईक
57.    बेलापूर - मंदा म्हात्रे
58.    दहिसर - मनीषा चौधरी 
59.    मुलुंड - मिहिर कोटेचा
60.    कांदिवली पूर्व - अतुल भातखळकर
61.    चारकोप - योगेश सागर
62.    मालाड पश्चिम - विनोद शेलार
63.    गोरेगाव - विद्या ठाकुर
64.    अंधेरी पश्चिम - अमीत साटम 
65.    विले पार्ले - पराग अलवणी 
66.    घाटकोपर पश्चिम - राम कदम 
67.    वांद्रे पश्चिम - आशिष शेलार 
68.    सायन कोळीवाडा - कॅप्टन आर. तमिल सेल्वन
69.    वडाळा - कालिदास कोळंबकर
70.    मलबार हिल - मंगल प्रभात लोढा 
71.    कुलाबा - राहुल नार्वेकर
72.    पनवेल - प्रशांत ठाकुर
73.    उरान - महेश बाल्दी 
74.    दौंड - राहुल सुभाषराव कुल
75.    चिंचवड - शंकर जगताप 
76.    भोसरी - महेश लांडगे 
77.    शिवाजीनगर - सिद्धार्थ शिरोळे
78.    कोथरूड - चंद्रकांत पाटील 
79.    पर्वती - माधुरी मिसाळ
80.    शिर्डी - राधाकृष्ण विखे
81.    शेवगाव - मोनिका राजळे 
82.    राहुरी - शिवाजीराव भानुदास कर्डिले 
83.    श्रीगोंदा - प्रतिभा पाचपुते 
84.    कर्जत जामखेड - राम शिंदे 
85.    केज - नमिता मुंदडा 
86.    निलंगा - संभाजीपाटील निलंगेकर
87.    औसा - अभिमन्यू पवार 
88.    तुळजापूर - राणाजगजितसिंह पाटील
89.    सोलापूर शहर उत्तर - विजयकुमार देशमुख
90.    अक्कलकोट - सचिन कल्याणशेट्टी 
91.    सोलापूर दक्षिण - सुभाष देशमुख
92.    मान - जयकुमार गोरे 
93.    कराड दक्षिण - अतुल भोसले 
94.    सातारा - शिवेंद्रराजे भोसले 
95.    कणकवली - नितेश राणे 
96.    कोल्हापूर दक्षिण - अमल महाडिक 
97.    ईचलकरंजी - राहुल आवाडे 
98.    मिरज - सुरेश खाडे 
99.    सांगली - सुधीर गाडगिळ

 

ADVERTISEMENT

 

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT