Shiv Sena : राऊतांची CM शिंदेंवर जोरदार टीका, 'लोकसभा निवडणुकीत तुमची लंकाच...'
Sanjay Raut Reply Eknath Shinde : मुख्यमंत्री शिंदेंच्या त्या विधानावर संजय राऊत (Sanjay Raut) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. 'लंका त्यांचीच आहे आम्ही सर्व हनुमान आहोत, अशा शब्दात राऊतांनी मुख्यमंत्री शिंदेंना प्रत्युत्तर दिले आहे.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
दिल्लीची लंका जळत आहे
बाळासाहेबांचे विचार असे चोरून मिळत नाही
सत्ताधारी घाबरलेत, अस्वस्थ आहेत, त्यांना झोप येत नाही
Sanjay Raut Reply Eknath Shinde : 'माझ्या नादाला लागू नका. मला आडवे आलात तर मी कोणाला सोडत नाही. या दाढीने जर काही काडी फिरवली, तर तुमची उरली सुरली लंकासुद्धा जळुन खाक होईल' असे विधान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी ठाकरेंच्या टीकेला उत्तर देताना केले होते. आता मुख्यमंत्री शिंदेंच्या त्या विधानावर संजय राऊत (Sanjay Raut) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. 'लंका त्यांचीच आहे आम्ही सर्व हनुमान आहोत, अशा शब्दात राऊतांनी मुख्यमंत्री शिंदेंना प्रत्युत्तर दिले आहे. (sanjay raut reply eknath shinde statement beard statement uddhav thackeray criticize)
संजय राऊत प्रसिद्धी माध्यमांशी बोलत होते. यावेळी राऊतांनी मुख्यमंत्री शिंदेंच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे. 'लंका त्यांचीच आहे, आम्ही सर्व हनुमान आहोत, लंका ही रावणाची जळते त्यांना माहित नाही, आणि रामाला दाढी नव्हती, दाढी रावणाला होती. त्यांना रामायण आणि महाभारत वाचावा लागेल', असा टोला राऊतांनी मुख्यमंत्री शिंदेंना लगावला.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : Pankaja Munde: 'माझ्यासोबत राजकारणात दगाफटका झाला, माझा वनवास...', पंकजा मुंडे काय म्हणाल्या?
''महाराष्ट्राला सुसंस्कृत मुख्यमंत्री कायम मिळालेले आहेत. यशवंतराव चव्हाण पासून परंपरा पाहिली. उद्धव ठाकरे पर्यंत हे सर्व तेवढे संस्कारी आणि सुसंस्कृत मंत्री होते, ते साहित्य कला काव्य यामध्ये रमायचे. त्यामुळे कोणाचं काय जळत आहे हे लवकरच कळेल. मुळात दिल्लीची लंका जळत आहे, लोकसभा निवडणुकीमध्ये तुम्ही ज्या लकेत गेला आहात ती लंकाच आम्ही जाळत आहोत तर तुमचं काय होणार', अशी टीकाही राऊतांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर केली.
हे वाचलं का?
'बाळासाहेबांचे विचार असे चोरून मिळत नाही, चोरटे भामटे यांचे राज्य आता या राज्यावर सुरू आहे आणि आता लवकरच आम्ही ते नष्ट करू असे डायलॉग बाजी आम्हाला सांगू नका, आम्ही बाळासाहेब ठाकरे यांच्या तालमीत तयार झाले आहोत आम्हाला अधिक चांगले डायलॉग करता येतात', अशी टीकाही राऊतांनी मुख्यमंत्र्यावर केली.
हे ही वाचा : प्रकाश आंबेडकर 'मविआ'ला देणार धक्का? भुजबळांना दिली ऑफर
ADVERTISEMENT
'आज मी मुद्दामून म्हणून त्यांच्या गुंडांबरोबरचा फोटो टाकला नाही, त्यांना विश्रांती दिली आहे, जरा घाबरले आहेत, अस्वस्थ आहे, त्यांना झोप येत नाही आहे, कारण लवकरच असे काही फोटो माझ्याकडून येणार आहेत की अमित शहा यांना देखील विचार करावा लागेल हे काय माणूस नेमला आहे', असे संजय राऊत म्हणाले.
ADVERTISEMENT
गणपत गायकवाड गोळीबार प्रकरणावर संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिली. पोलिसांची काम आहेत. पोलिसांना करू द्या, पोलिसांना कधी कधी अशीही काम करायला संधी भेटली पाहिजे. पोलीस सध्या दाडीवाले आणि काडीवाले यांच्या गुंडांच्या मागे राहून देखील कंटाळले आहेत कधीतरी त्यांना तांत्रिक काम देखील करू द्या, असा टोला देखील त्यांनी लगावला.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT