Walmik Karad: 'लाकडं पाठवून द्यावी, तसंही कराड सुटल्यावर...', कराडवरून संजय राऊतांचा करडा सवाल
वाल्मिक कराड यांचा सर्व सत्ताधारी नेत्यांसोबतचा फोटो शेअर करून शिवसेना (UBT) नेते संजय राऊत यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे.
ADVERTISEMENT

मुंबई: मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावरून महाराष्ट्रातील फडणवीस सरकारवर सध्या विरोधक जोरदार टीका करत आहेत. या सगळ्या प्रकरणावरून सर्वपक्षीय नेते हे मंत्री धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. त्यातच आता एक फोटो सोशल मीडियावर शेअर करून शिवसेना (UBT) नेते संजय राऊत यांनी सरकारला करडा सवाल विचारला आहे.
संजय राऊतांनी पोस्ट केला तो फोटो अन्...
संजय राऊत यांनी एक फोटो आपल्या X अकाउंटवर शेअर केला आहे. ज्यामध्ये तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यासोबत धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड हे दिसून येत आहेत.
हे ही वाचा>> Beed: हवेत गोळीबार करणाऱ्यांचा टप्प्यात कार्यक्रम, सरकारची मोठी कारवाई
धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांचा दबाव
दरम्यान, धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांनी आता अधिक जोर धरला आहे. मात्र, तरीही अजित पवार यांनी ठाम भूमिका घेतली आहे की, धनंजय मुंडेंविरोधात चौकशीत जोपर्यंत पुरावे मिळणार नाही तोपर्यंत ते धनंजय मुंडेंचा राजीनामा घेणार नाही.
हे ही वाचा>> Santosh Deshmukh Case : देवेंद्र फडणवीस यांना भेटण्यापूर्वी देशमुख कुटुंबाचा मोठा निर्णय, वाचा सविस्तर
दुसरीकडे भाजप आमदार सुरेश धस यांनी मात्र हे प्रकरण लावून धरलं आहे. धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय असलेले वाल्मिक कराड हे 302 च्या प्रकरणात सहभागी असल्याने आणि अवादा कंपनीकडून धनंजय मुंडेंनी 3 कोटींची मागणी केल्याने त्यांनी स्वत:हून राजीनामा द्यायला हवं असं धस यांनी म्हटलं आहे.
'धनंजय मुंडेंच्या बंगल्यावर बैठक, 3 कोटींची खंडणी मागितलेली..', धसांचा गंभीर आरोप
'सातपुडा या शासकीय बंगल्यावर बैठक झाली. इथे अफताब तांबोळी, शर्मा, नितीन बिक्कड, वाल्मिक आण्णा आणि धनंजय मुंडे हे होते. धनंजय मुंडे होते त्यांनी 3 सांगितले.'
'सातपुड्याला काय ते संत तुकारामांच्या ग्रंथाचं विमोचन करायला आले होते का? की ज्ञानेश्वरीचं प्रकाशन होतं का? धनंजय मुंडे तिथे होते त्यांनी 3 सांगितले.. कर्मचारी बाहेर गेला त्याने फोन केला.. समोरून सांगितलं 3 कोटी नाही देणार.. त्या कंपनीचे लोक बोलले असतील ना आणि हे सीडीआरमध्ये येईल ना.'
'हे बघा.. गृहखात्याला काही तपासायचं असेल तर ते तपासतील. कोण काय बोललंय हे सगळं येईल. 3 कोटी मागितलेले आणि त्याची 2 कोटीवर डील ठरली, डील ठरल्यावर सगळी मंडळी तिथून निघून गेली.'
'मी जी 19 तारीख म्हणतो जूनची.. त्याचे सगळे सीडीआर सापडतील ना.. धनंजय मुंडे वैगरे यांचे मोबाइल तिथेच होते. धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत ही बैठक झाली. वाल्मिक आण्णाचीच बैठक असती तर ओबेरॉय, ट्रायडेंटवर झाली असती.'
'थेट खंडणीचा आरोप नाही.. मी जबाबदारीने बोलतो.. मला ही माहिती आता मिळाली नुकतीच.. आगे देखो होता है क्या..' असा गंभीर आरोप सुरेश धस यांनी केला होता.