Sanjay Raut: "महाराष्ट्रात सावत्र कुणीच नाही, दिल्लीत मोदी-शाह...", संजय राऊत नेमकं काय म्हणाले?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Sanjay Raut asks PM Modi to visit Manipur
Sanjay Raut asks PM Modi to visit Manipur
social share
google news

बातम्या हायलाइट

point

लाडकी बहीण योजनेवरून संजय राऊतांचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल

point

पत्रकार परिषदेत संजय राऊतांचं मोठं विधान

point

संजय राऊतांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांवर डागली तोफ

Sanjay Raut Press Conference:  मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरु झाल्यापासून महायुती सरकार आणि महाविकास आघाडीत आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. निवडणुकीत मदत केली नाही, तर महिलांकडून १५०० रुपये परत घेतले जातील,असं वादग्रस्त विधान आमदार रवी राणा यांनी केलं होतं. याच पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापलं असून खासदार संजय राऊत यांनीही या योजनेवरून सत्ताधाऱ्यांना धारेवर धरलं आहे. "या महाराष्ट्रात सावत्र कुणीच नाही. आमचं सावत्र कुणी असेल, तर दिल्लीत मोदी आणि शहा आहेत. हे महाराष्ट्राला सावत्रपणाची वागणूक देत आहेत. महाराष्ट्राचा सावत्र भाऊ नाय, भाऊच नाही आहेत ते. देवेंद्र फडणवीस, मोदी आणि अमित शाह यांनी महाराष्ट्राचं जेव्हढं नुकसान केलं आहे, तेव्हढं गेल्या १०० वर्षात कुणी केलं नसेल, असं म्हणत राऊत यांनी अप्रत्यक्षपणे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह महायुती सरकारवर हल्लाबोल केला. (sanjay raut indirectly targets devendra fadnavis and eknath shinde on ladaki bahin yojana criticises pm narendra modi and amit shah too)

ADVERTISEMENT

राऊतांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवरही साधला निशाणा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करताना राऊत म्हणाले, मुख्यमंत्री हे लोचक मजनू आहेत. इतका लोचक मुख्यमंत्री हा दिल्लीच्या दारातला आहे. देशात दिल्लीपुढे झुकणारे खूप मुख्यमंत्री पाहिले पण इतका लोचक मुख्यमंत्री आम्ही इतिहासात पाहिला नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राला वेदना होईल, अशाप्रकारचं वर्तन मुख्यमंत्री करत आहेत.  दिल्लीचे पोपट म्हणून ते बोलत आहेत. ज्या दिवशी यांची सत्ता जाईल, त्या दिवशी यांना दिल्ली पायाशी उभं करणार नाही. त्यांच्या बोलण्याकडे महाराष्ट्र गांभीर्याने पाहत नाही. महाराष्ट्राला बदल हवा आहे. हे घटनाबाह्य सरकार घालवण्यासाठी आम्ही कंबर कसत आहोत. 

हे ही वाचा>> Devendra Fadnavis: "अरे वेड्यांनो...", देवेंद्र फडणवीस महायुतीतील वाचाळ नेत्यांवर संतापले

राऊत माध्यमांशी बोलताना पुढे म्हणाले, सर्वच पक्ष विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना म्हणजेच महाविकास आघाडी आणि समोरचे लोक सुद्धा तयारीला लागले आहेत. मोदी-शहांच्या, फडणवीसांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्रातील भाजपचा दारुण पराभव केला. आमच्या काही जागा फार थोड्याल फरकाने गेल्या. त्यात अकोल्याच्या जागेचाही समावेश आहे. यावेळी अकोल्याची जागा आम्ही जिंकू अशी आम्हाला खात्री होती. विदर्भात, मराठवाडा, मुंबईत चांगलं यश मिळालं. आता तयारी विधानसभेची आहे. आम्ही सर्व नेते बऱ्याच काळापासून मुंबईच्या बाहेरच आहोत. या राज्यातील वातावरण असं आहे की, कोणत्याही परिस्थितीत सत्ताबदल होईल. सरकारी तिजोरीतून पैशांची किती उधळपट्टी केली? लाडक्या बहिणींना पैसे मिळालेच पाहिजेत. पण १५०० रुपयांच्या आकड्यात आमचं सरकार आल्यावर भरघोस वाढ होईल. लोकसभा निवडणूक हरल्यावर लाडक्या बहिणींची आठवण आली. तोपर्यंत फक्त फुटलेले लाडके आमदार, फुटलेले लाडके खासदार, यांच्या पलीकडे यांचं लाडकं कुणीच नव्हतं.

हे वाचलं का?

"पैसा आणि सत्तेपुढं महाराष्ट्र झुकला नाही आणि विकला जाणार नाही"

एका एका आमदाराला ५० कोटी मिळाले. खासदारांना १०० कोटी मिळाले. आता शिवसेनेचे नगरसेवक पदाधिकारी असतील, त्यांना फोडण्यासाठी कोट्यावधी रुपये खर्च होतात. पण लाडक्या बहिणींसाठी १५०० रुपये. प्रचारात चर्चा होईलच. निवडणुका वेळेत घ्याव्याच लागतील. नोव्हेंबरमध्ये या राज्यात तुम्हाला सत्तांतर झालेलं दिसेल. त्यासाठी महाविकास आघाडी मजबुतीनं काम करत आहे. तिन्ही पक्ष एकत्र आहेत. जागावाटप सुरळीत पार पडेल. महायुतीला त्यांच्या पद्धतीने खोटे प्रचार करुद्या. पैसा आणि सत्तेपुढं महाराष्ट्र झुकला नाही आणि विकला जाणार नाही. हे लोकसभेत आम्ही दाखवून दिलं.

हे ही वाचा>> Baramati Vidhan Sabha: अजित पवारांविरोधात शरद पवारांचा उमेदवार ठरला!

महाराष्ट्रातलं वातावरण महाविकास आघाडीसाठी अत्यंत अनुकूल आहे. पोलीस यंत्रणेचा वापर करुन आमच्या कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना त्रास द्यायचा. या भागातले आमचे आमदार नितीन देशमुख यांना सातत्याने त्रास दिला जातो. कारण ते मोदी-शहांच्या तुरुंगातील भिंती फोडून पळून आले. त्यांनी बेईमानी केली नाही. सुरतमधून ते पळून आले. ते ५० खोक्यांना विकले गेले नाहीत. जस जशा निवडणुका जवळ येत आहेत, तसा त्यांनाल त्रास दिला जातोय. कोणाची बेहिशोबी मालमत्ता आहे? तुमचं काय चाललंय? तुमचा हिशोब द्या. आमच्या चौकशा तुम्ही करत आहात. जेव्हा आम्ही तुमची चौकशी करु, तेव्हा तुम्ही सुटणार नाहीत, असंही राऊत म्हणाले.
 

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT