Santosh Deshmukh Case : देवेंद्र फडणवीस यांना भेटण्यापूर्वी देशमुख कुटुंबाचा मोठा निर्णय, वाचा सविस्तर
संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणातील आरोपींना कठोर शासन व्हावं या हेतूने धनंजय देशमुख यांनी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिक दाखल केली होती. वाल्मिक कराड यांच्यावर हत्येता गुन्हा दाखल करावा आमि मोक्का लावण्याची मागणी या याचिकेत करण्यात आली होती.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

संतोष देशमुख यांचे कुटुंबीय मुख्यमंत्र्यांच्या भेटीला

संतोष देशमुख यांच्या कुटुंबाचा मोठा निर्णय
Santosh Deshmukh Case Updates : गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात आतापर्यंत अनेक खळबळजनक गोष्टी समोर आल्या आहेत. सीआयडी आणि एसआयटीकडून वेगवेगळ्या आघाड्यांवर कारवाई करत कृष्णा आंधळे वगळता सर्व आरोपींना ताब्यात घेतलं आहे. कृष्णा आंधळेंचा शोध सध्या पोलीस घेत आहेत, तर सापडलेल्या आरोपींची पोलिसांकडून चौकशी होते आहे. या सर्व घडामोडी सुरू असतानाच दुसरीकडे आता मृत संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख हे देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला मुंबईमध्ये आले आहेत. मात्र, ते मुंबईत येण्यापूर्वी त्यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे.
हे ही वाचा >>'धनंजय मुंडेंनी 3 कोटींची खंडणी मागितली', सुरेश धसांनी उडवून दिली खळबळ
संतोष देशमुख यांची हत्या ही अत्यंत निघृणपणे करण्यात आल्याचं समोर आलं आहे. या घटनेनंतर पोलीस यंत्रणेकडून कारवाई करण्यात येत आहे, मात्र दुसरीकडे या प्रकरणातील आरोपींना कठोर शासन व्हावं या हेतूने धनंजय देशमुख यांनी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिक दाखल केली होती. वाल्मिक कराड यांच्यावर हत्येता गुन्हा दाखल करावा आमि मोक्का लावण्याची मागणी या याचिकेत करण्यात आली होती. मात्र, त्यानंतर आज समोर आलेल्या माहितीनुसार धनंजय देशमुख यांनी आता ही याचिका मागे घेतली असून, आपण पोलिसांकडून होणाऱ्या कारवाईवर संतूष्ट असल्याचं म्हटलं आहे. आपले वकील शोमित साळुंखे यांच्या माध्यमातून ही याचिका मागे दाखल करण्यात आली होती, मात्र ती आपण आता वकिलांमार्फतच मागे घेत असल्याचं म्हटलं आहे.
हे ही वाचा >>Beed: हवेत गोळीबार करणाऱ्यांचा टप्प्यात कार्यक्रम, सरकारची मोठी कारवाई
संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाला आता जवळपास महिना उलटला आहे. राज्यभरात या प्रकरणाची चर्चा झाली. वेगवेगळ्या विरोधीपक्षांच्या नेत्यांसोबतच भाजप आमदार सुरेश धस यांनी हा विषय उचलून धरला होता. त्यानंतर आता सुरेश धस यांनीच देशमुख कुटुंबीयांची आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घडवून आणली आहे. या घटनेनंतर आता देशमुख कुटुंब आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात काय चर्चा होणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे.