Walmik Karad MCOCA Case: वाल्मिक कराडवर आजच कसा लागला मकोका? महिनाभर खुनाचा गुन्हाही नव्हता!
Walmik Karad MCOCA: वाल्मिक कराड याच्यावर महिनाभर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता. मात्र आज (14 जानेवारी) अचानक त्याच्यावर मकोका विरोधात कारवाई करण्यात आली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

वाल्मिक कराडवर कसा लागला मकोका?

महिनाभर वाल्मिक कराडवर खुनाचा गुन्हाही नव्हता दाखल

SIT आता वाल्मिक कराडच्या कोठडीसाठी पुन्हा करणार कोर्टाकडे मागणी
बीड: मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी वाल्मिक कराड याच्यावर आज अचानक मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. मागील 14 दिवस तो खंडणी प्रकरणी पोलीस कोठडीत होता. पण आज अचानक मकोका त्याच्यावर लावण्यात आल्याने आता त्याचा ताबा हा SIT कडे गेला आहे. पण अटकेच्या 14-15 दिवसानंतरच वाल्मिकवर मकोका कसा लागला हे आपण सविस्तरपणे समजून घेऊया. (santosh deshmukh murder case not even a murder case was filed for a month but how did mcoca suddenly come against walmik karad today)
वाल्मिक कराड याच्यावर सुरुवातीला खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. ज्यानंतर तो काही दिवसांनी पुण्यात पोलिसांना शरण आला होता. त्यानंतर त्याची बीडला रवानगी करण्यात आली. ज्या दिवशी कराड हा शरण आला त्याच रात्री त्याला कोर्टात हजर करण्यात आलं. जिथे कोर्टाने त्याला 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. जी आज (14 जानेवारी) संपली.
हे ही वाचा>> Walmik Karad Mcoca: वाल्मिक कराडवर संक्रात, 'आका'वर लावला 'मकोका', कोर्टात नेमकं काय घडलं?
त्यानंतर याच प्रकरणी आणखी 10 दिवसांची कोठडी मिळावी अशी मागणी सीआयडीच्या वतीने करण्यात आली. पण कोर्टाने त्यांची ही मागणी फेटाळून लावली आणि खंडणी प्रकरणी त्याला 14 दिवसांची कोठडी सुनावली.
दरम्यान, कोर्टाचा हा निर्णय येऊन अवघे काही क्षण होत नाही तोच वाल्मिकवर SIT ने मकोका अंतर्गत गुन्हा दाखल केला असून त्याच्या कोठडीसाठी कोर्टाकडे अर्ज केल्याचं समोर आलं. या बातमीमुळे वाल्मिक कराड याला मोठा धक्का बसला आहे.
कारण आतापर्यंत त्याच्यावर केवळ खंडणी प्रकरणी कारवाई सुरू होती. मात्र आता थेट हत्येप्रकरणी त्याच्यावर मकोका लावण्यात आल्याने त्याच्या अडचणी मोठी भर पडली आहे.
वाल्मिक कराडवर मकोका कसा लागला?
वाल्मिक कराड याला खंडणी प्रकरणी न्यायालयीन कोठडी मिळू शकते असा एसआयटीला अंदाज होता. पण त्याचा ताबा जाऊ नये यासाठी एसआयटी या प्रकरणी आधीपासून योग्य तयारी केली होती.
एसआयटीने संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी आता वाल्मिक कराडला आरोपी बनवलेलं आहे. मकोका अंतर्गत वाल्मिकला आरोपी बनविल्यानंतर कोर्टात एसआयटीने अर्ज दाखल केला होता. ज्यामध्ये त्याचा ताबा मिळावा अशी मागणी करण्यात आली होती. आतापर्यंतचा सगळ्या गोष्टी लक्षात घेता मकोका कोर्टाने एसआयटीला वाल्मिक कराडचा ताबा देण्यास परवानगी दिली.
खंडणी प्रकरणात न्यायालयीन कोठडी झालेली असल्याने वाल्मिकला सुरुवातीला तुरुंगात नेलं जाईल आणि त्यानंतर मकोका कोर्टाने जे प्रोडक्शन वॉरंट दिलं आहे ते तुरुंग प्रशासनाला दाखवून पुन्हा एकदा हत्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी SIT वाल्मिकला आपल्या ताब्यात घेईल. ज्यानंतर उद्या पुन्हा एकदा मकोका कोर्टात वाल्मिकला हजर करून कोठडीची मागणी एसआयटीकडून केली जाईल.
हे ही वाचा>> Walmik Karad SIT Custody : संतोष देशमुख यांच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप, SIT ला मिळाला वाल्मिकचा ताबा
SIT ने वाल्मिक कराड याच्यावर हत्येचा आणि मकोकाचा गुन्हा दाखल केला आहे. उद्या कराडला कोर्टात हजर केल्यानंतर हत्या प्रकरणात वाल्मिक कराडचा नेमका संबंध काय? आणि कोणते पुरावे मिळाल्याने त्याला आरोपी बनवलंय हे स्पष्ट होईल.
जवळपास महिन्याभराच्या तपासानंतर सुद्धा वाल्मिक कराडला हत्येच्या गुन्ह्यात आरोपी बनविण्यात आलं नव्हतं. मात्र, आज खंडणीच्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडी झाल्यानंतर एसआयटीने खुनाच्या गुन्ह्यात वाल्मिकला आरोपी बनवलं आणि मकोका लावल्याचं स्पष्ट केलं.
खरं तर गुन्ह्याला मकोका लागतो. त्यामुळे वाल्मिक कराड याला हत्या प्रकरणात आरोपी बनविण्यात आल्यानंतर मकोकाचं जे कलम आहे ते नैसर्गिकपणे त्याच्यावर देखील लागलं आहे. मात्र मकोकाचा गुन्हा दाखल करताना कोणत्या बाबी विचारात घेण्यात आल्या आहेत हे आता लवकरच स्पष्ट होईल.
सुदर्शन घुले, विष्णू चाटे, जयराम चाटे, प्रतिक घुले, महेश केदार हे सगळे हत्येच्या गुन्ह्यातील आरोपी आहेत. पण त्यांचा नेमका या प्रकरणात कसा सहभाग होता हे जवळजवळ स्पष्ट झालेलं होतं. पण वाल्मिक कराडची यामध्ये नेमकी काय भूमिका होती? या सगळ्या आरोपींच्या संपर्कात वाल्मिक कराड होता का? संतोष देशमुख यांची हत्याच करायची आहे? हे नेमकं कोणी ठरवलं.. कशा पद्धतीने त्याची अंमलबाजवणी झाली.. या सगळ्या गोष्टी उद्या मकोका कोर्टात स्पष्ट होऊ शकतात.