Yugendra Pawar: 'आता वेळ आली...', युगेंद्र पवारांनी घातला थेट बारामतीकरांच्या काळजालाच हात!

मुंबई तक

ADVERTISEMENT

युगेंद्र पवारांचं बारामतीकरांना भावनिक आवाहन
युगेंद्र पवारांचं बारामतीकरांना भावनिक आवाहन
social share
google news

बातम्या हायलाइट

point

अजित पवारांविरोधात युगेंद्र पवार

point

युगेंद्र पवारांचं बारामतीकरांना भावनिक आवाहन

point

युगेंद्र पवार सुप्रिया सुळेंच्या प्रचारात आघाडीवर

Yugendra Pawar Baramati: वसंत मोरे, बारामती: उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुतणे युगेंद्र पवार हे सध्या बारामतीत तळ ठोकून आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळेंच्या प्रचारासाठी त्यांनी कंबर कसली असून अजित पवारांच्या भूमिकाला तीव्र विरोध त्यांनी केला आहे. तर दुसरीकडे त्यांनी शरद पवारांना साथ द्यावी असं भावनिक आवाहन देखील बारामतीकरांना दिलं आहे. त्यामुळे बारामतीत लोकसभा निवडणूक जाहीर होण्याआधीच प्रचंड रंगत आली आहे. (sharad pawar is a god for baramati  time has come we have to do something for saheb yugendra pawar appeal to baramatikar)

ADVERTISEMENT

'शरद पवार हे बारामतीसाठी दैवत आहेत. त्यांनी आपल्या बारामतीच्या  विकासासाठी खूप काही केले आहे. आता वेळ आली आहे, आपण पण साहेबांसाठी काहीतरी करून दाखवण्याची.' असं आवाहन युगेंद्र पवार यांनी केलं आहे. ते बारामती येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट पक्ष कार्यालयात  बोलत होते.

हे ही वाचा>>Yugendra Pawar: शरद पवारांचा नवा डाव.. सख्खा पुतण्याच करणार अजितदादांची कोंडी, कोण आहेत युगेंद्र पवार?

नेमकं काय म्हणाले युगेंद्र पवार

'जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे दोन पक्ष झाले तेव्हापासून आम्ही पुन्हा पक्ष बांधणीला सुरुवात केली. सुरुवातीला इथे कोणीही पुढे येत नव्हतं, मात्र, आता कार्यकर्त्यांची गर्दी बघून मला चिंता वाटत नाही. कमी वेळात आपल्या पक्षाबरोबर जास्त कार्यकर्ते जोडले गेले.. आपल्यावर अशी परिस्थिती आली होती की, कार्यकर्त्यांच्या मागे लागावे लागत होते.. की आमच्या पक्षात या, तुम्हाला हे पद देतो, ते पद देतो.. मात्र, आता परिस्थिती बदलली आहे.' 

हे वाचलं का?

'अनेक कार्यकर्ते आपल्या पक्षात येऊ लागले आहे. शरद पवार हे बारामतीसाठी दैवत आहेत. त्यांनी आपल्या बारामतीच्या  विकासासाठी खूप काही केले आहे. आता वेळ आली आहे, आपण पण साहेबांसाठी काहीतरी करून दाखवण्याची.' असं विधान युगेंद्र पवार यांनी केलं आहे.

हे ही वाचा>> Yogendra Pawar : ''आम्ही शरद पवारांनाच साथ देणार'', अजित पवारांविरोधात सख्ख्या पुतण्याने थोपटले दंड

युगेंद्र पवारांचं थेट अजितदादांना चॅलेंज? 

दरम्यान, दोनच दिवसांपूर्वी अजित पवार यांना युगेंद्र पवार यांनी आव्हान दिलं होतं. शरद पवार गटासोबत जोडल्या जाणाऱ्या कार्यकर्त्यांना धमकावले जात असल्याच्या काही तक्रारी या युगेंद्र पवार यांच्यासमोर मांडण्यात आल्या होत्या. त्यावर जाहीरपण बोलताना योगेंद्र पवार असं म्हटलं होतं की, 'बारामतीत वेगळ्या प्रकारचं राजकारण होत आहे. बारामतीकरांनी असे दहशतीचं राजकारण कधी बघितलं नाही. कोणी तुम्हाला फोन करून धमकावच असेल तर थेट माझ्याशी संपर्क करा, पुढचं मी बघतो', असं आव्हानच युगेंद्र पवारांनी दिलं होतं.
 

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT