NCP : शरद पवार राष्ट्रवादीचे सदस्यच नाहीत, अध्यक्ष कसे?; अजित पवार गटाची अखेरची खेळी

भागवत हिरेकर

ADVERTISEMENT

Sharad Pawar is not a member of NCP, so how can he become president?
Sharad Pawar is not a member of NCP, so how can he become president?
social share
google news

NCP Mla Disqualification : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर अजित पवार गटाच्या वकिलांनी केलेल्या युक्तिवादाने अनेकांच्या भुवया उंचवल्या गेल्या आहेत. पक्षाच्या घटनेनुसार शरद पवार हे सदस्य नाहीत, मग अध्यक्ष कसे होऊ शकतात, असा मुद्दा अजित पवारांच्या वकिलांनी मांडला.

ADVERTISEMENT

राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर झाली. शरद पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्यच नाहीयेत, त्यामुळे ते पक्षाचे अध्यक्ष कसे होऊ शकतात, या युक्तिवादानेच अजित पवार गटाने युक्तिवाद संपवला. पण, या मुद्द्याची चांगलीच चर्चा होत आहे.

आमदार अपात्रता प्रकरण : अजित पवार गटाचं म्हणणं काय?

अजित पवार गटाने शरद पवार यांच्या अध्यक्ष असण्यावरच प्रश्न उपस्थित केले. अजित पवार गटाच्या वकिलांनी युक्तिवाद करताना वेगळा मुद्दा मांडला.

हे वाचलं का?

‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकारिणी सदस्यांची निवड घटनेनुसार झाली नाही. शरद पवारांसह प्रफुल पटेल, सुनील तटकरे यांची नेमणूक पक्षांतर्गत निवडणूक न घेता झाली’, असे अजित पवार गटाच्या वकिलांनी सांगितले.

हेही वाचा >> भाजप 400 जागा जिंकू शकतं का? प्रशांत किशोरांची मोठी भविष्यवाणी

‘घटनेनुसार शरद पवार हे पक्षाचे सदस्यच नाहीत, मग ते अध्यक्ष कसे होऊ शकतात’, असा मुद्दा अजित पवार गटाच्या वकिलांनी मांडत शरद पवार यांच्या अध्यक्ष असण्यावरच प्रश्न चिन्ह उपस्थित केला.

ADVERTISEMENT

शरद पवारांना आव्हान

‘सरकारमध्ये पंतप्रधान आणि मुख्यमंत्री यांनाही निर्णयासाठी मंत्रिमंडळासमोर जावे लागते. एक व्यक्ती मी अध्यक्ष आहे, मीच निर्णय घेऊ शकतो, असे म्हणू शकत नाही’, असे सांगत अजित पवार गटाने पक्षाध्यक्ष म्हणून शरद पवारांच्या अधिकारांनाच आव्हान दिले.

ADVERTISEMENT

‘पक्षामध्ये मतभेद आहे. कोणत्या गटाला किती पाठिंबा आहे आणि कोणता गट खरी राष्ट्रवादी आहे, याचा वाद आहे. प्रदेशाध्यक्ष कोण हा मुद्दा नाही, पण जी व्यक्ती बोलते की मी प्रदेशाध्यक्ष, खनिजदार आहे. ते पक्षाच्या संविधानानुसार सह्या करू शकते का? पक्षाच्या या समित्या फक्त पेपरवर आहेत’, असेही अजित पवारांच्या वकिलांनी सांगितलं.

15 फेब्रुवारी रोजी येणार निकाल

राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी पूर्ण झाली आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दोन्ही गटांनाच २ फेब्रुवारीपर्यंत लेखी म्हणणे मांडण्याचेही आदेश दिले आहेत.

हेही वाचा >> ठाकरेंना मुंबईतील’या’ दोन जागा सोडाव्या लागणार?

राष्ट्रवादीची संघटनात्मक रचना, त्यात बहुमत कुणाला आहे, या दोन मुद्द्यांवर भूमिका मांडण्यास नार्वेकरांनी सांगितले आहे. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार नार्वेकर १५ फेब्रुवारी रोजी हा निकाल देण्याची शक्यता आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT