Pipani Symbol Freeze : शरद पवारांना मोठा दिलासा, निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय

मुंबई तक

ADVERTISEMENT

 sharad pawar ncp big relief pipani symbol frozen by el
निवडणूक आयोगाचा शरद पवारांना मोठा दिलासा
social share
google news

बातम्या हायलाइट

point

निवडणूक आयोगाचा शरद पवारांना मोठा दिलासा

point

निवडणूक आयोगाने पिपाणी चिन्ह गोठवले

point

विधानसभा निवडणुकीपूर्वी शरद पवारांना दिलासा

Pipani Symbol Frozen By Election Commission : विधानसभा निवडणुकीपूर्वी शरद पवारांना (Sharad Pawar) मोठा दिलासा मिळाला आहे. लोकसभा निवडणुकीत पिपाणी चिन्हामुळे (Pipani Symbol)  शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा फटका बसला होता. त्यामुळे शरद पवारांनी पिपाणी चिन्ह रद्द करावे, अशी मागणी निवडणूक आयोगाकडे केली होती. अखेर ही मागणी निवडणूक आयोगाने (Election Commission) मान्य करत पिपाणी चिन्ह गोठवले आहे. त्यामुळे शरद पवारांना मोठा दिलासा मिळाला आहे.  (sharad pawar ncp big relief pipani symbol frozen by election commission)

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फुट पडल्यानंतर निवडणूक आयोगाने शरद पवारांच्या गटाला तुतारी हे पक्षचिन्ह दिलं होतं. याच चिन्हावर शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या गटाने लोकसभा निवडणूक लढवली होती. तर याच निवडणुकीत अपक्ष उमेदवारांना पिपाणी हे चिन्ह दिले गेले होते.यावेळी शरद पवारांच्या राष्ट्रवादीने लोकसभेच्या 10 जागा लढवल्या होत्या. नाशिकसह सर्वच जागांवर 4 लाखांहून अधिक मतदान पिपाणीला पडले होते. विशेषतः सातारा लोकसभेत या चिन्हामुळे त्यांच्या उमेदवाराला पराभवाचेही तोंड पहावे लागले होते.

हे ही वाचा : Microsoft Cloud Outage: वाट लागली... Microsoft चे सर्व्हर ठप्प, बँका ते फ्लाइट सारंच विस्कळीत

त्यामुळे पिपाणी हे चिन्ह तुतारी सारखेच दिसत असल्यामुळे शरद पवार गटाला लोकसभा निवडणुकीत मोठा फटका बसल्याची भावना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाने व्यक्त केली होती. त्यामुळे पिपाणी चिन्ह रद्द करण्यात यावे अशी मागणी शरद पवारांच्या गटाने निवडणूक आयोगाकडे केली होती. त्यांच्या या मागणीची दखल निवडणूक आयोगाने घेत पिपाणी चिन्ह गोठवले आहे. त्यामुळे शरद पवारांना मोठा दिलासा मिळाला आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

अखेर सत्याचाच विजय...

निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर शरद पवार गटाने एक्सवर प्रतिक्रिया दिली आहे.अखेर सत्याचाच विजय झाला ! निवडणूक आयोगाने 'तुतारी' आणि 'बिगुल' ही मुक्तचिन्ह गोठवली. 'पिपाणी', 'बिगुल' ह्या चिन्हाचा 'तुतारी' असा वापर करून मतदारांची दिशाभूल करण्याचा जो प्रयत्न झाला त्याविरोधात 'राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी- शरदचंद्र पवार' पक्षाच्या लढ्याला यश. आता दिशाभूल करणारं नाही तर महाराष्ट्राला दिशा देणारं 'तुतारी वाजवणारा माणूस' हेच चिन्ह फक्त मतदान यंत्रावर दिसणार !

हे ही वाचा : Vishalgad Fort violence: विशाळगड प्रकरणी हायकोर्टाने दिला 'तो' मोठा आदेश, शिंदे सरकारला झटका

    follow whatsapp

    ADVERTISEMENT