Sharad Pawar : मराठा समाजाला 'ओबीसी'तून आरक्षण द्यायला हवं का? पवार म्हणाले...

मुंबई तक

Sharad Pawar on Maratha Reservation : मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी होत आहे. याबद्दल शरद पवारांची भूमिका काय? असा प्रश्न मनोज जरांगे आणि सत्ताधारी पक्षांकडून विचारला जात आहे.

ADVERTISEMENT

मराठा आरक्षणाबद्दल शरद पवारांची भूमिका काय आहे?
शरद पवार यांनी मराठा आरक्षणाबद्दल त्यांची भूमिका मांडली.
social share
google news

बातम्या हायलाइट

point

मराठा आरक्षणाबद्दल शरद पवार काय बोलले?

point

राष्ट्रवादी काँग्रेसची मराठा आरक्षणाबद्दल भूमिका काय?

point

मराठा आरक्षण-ओबीसी आरक्षणाबद्दल पवारांचे मत काय?

Sharad Pawar on Reservation : (इसरार चिश्ती, छत्रपती संभाजीनगर) मराठा समाज हा मूळचा कुणबी आहे, असा दावा करत मनोज जरांगे यांच्याकडून ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी होत आहे. त्याला ओबीसी प्रवर्गातील समाजाकडून विरोध होत आहे. हा पेच राजकीय पक्षांसाठीही डोकेदुखी ठरताना दिसत असून, गेल्या काही दिवसांपासून शरद पवार यांना याबद्दल तुमची भूमिका काय? असा प्रश्न सत्ताधारी आणि मनोज जरांगे यांच्याकडूनही विचारला जात आहे. त्यावर अखेर शरद पवारांनी मौन सोडले. (Sharad Pawar commented on the issue of giving reservation to Maratha community from OBC category)

शरद पवारांनी शनिवारी (27 जुलै) छत्रपती संभाजीनगर येथे माध्यमांशी संवाद साधला. 

मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण द्यावं की न द्यावं. याबद्दल तुमची आणि तुमच्या पक्षाची भूमिका काय आहे? हे स्पष्ट करा असे जरांगेंनी म्हटले आहे. हा मुद्दा पत्रकारांनी शरद पवार यांच्यासमोर उपस्थित केला. 

मराठा आरक्षण पेच, पवारांची भूमिका काय?

या प्रश्नाला उत्तर देताना शरद पवार म्हणाले की, "त्यांनी हेही सांगितलं की, नाही केली, तर माझा आग्रह राहणार नाही. त्यांनी दोन्ही गोष्टी मांडल्या आहेत. हा प्रश्न सुटावा यासंबंधी आमचा आग्रह आहे."

"त्यासाठी जे जे घटक, ज्या घटकांना यातून मार्ग निघावा असं वाटत असेल, त्या घटकांच्या प्रतिनिधींना विश्वासात घेऊन, सुसंवाद साधून यातून मार्ग काढावा. माझ्या पक्षाची भूमिका सुसंवादाची, डायलॉगची, जो काही मार्ग असेल, त्याला अनुकूलतेची आहे."

ओबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण द्यावं का? पवार म्हणाले...

या प्रश्नाला उत्तर देताना शरद पवार म्हणाले, "जरांगेंनी एक चांगलं स्टेटमेंट केलं होतं, माझ्या वाचण्यात आलं. ते असं म्हणाले होते की, मराठा आरक्षणच्या बरोबर लिंगायत, धनगर आणि मुस्लीम यांना सुद्धा आरक्षण द्यावं. यातून अंतर होण्याची स्थिती होती, पण योग्य रस्त्यावर जाण्याची सुरुवात झालेली आहे. तुम्ही जसा प्रश्न विचारला... तर लिंगायत, धनगर, मुस्लीम हेही त्या प्रक्रियेत आले, तर कटुता राहण्याची स्थिती राहणार नाही", असे शरद पवार म्हणाले.

हे वाचलं का?

    follow whatsapp