Badlapur News: 'तुझा रेप झालाय का?', असा आरोप असलेल्या वामन म्हात्रेंचं 'ते' CCTV फुटेज समोर

मिथिलेश गुप्ता

ADVERTISEMENT

Waman Mhatre Latest News
Waman Mhatre Latest News
social share
google news

बातम्या हायलाइट

point

सीसीटीव्ही फुटेज पाहिल्यानंतर वामन म्हात्रे काय म्हणाले?

point

वामन म्हात्रे आणि मोहिनी जाधव यांच्यात काय संभाषण झालं?

point

बदलापूरच्या त्या प्रकरणावर वामन म्हात्रेंचं मोठं विधान

Waman Mhatre Latest News: बदलापूरच्या अत्याचाराच्या घटनेनंतर पत्रकार मोहिनी जाधव यांनी बदलापूरचे शिवसेनेचे शहरप्रमुख वामन म्हात्रे यांच्याविरोधात बदलापूर पोलीस ठाण्यात विनयभंग आणि अट्रोसिटिचा गुन्हा दाखल केला. त्यानंतर वामन म्हात्रे यांनी याप्रकरणी पाठपुरावा केला. त्या दिवशी काय घडलं होतं, हे समोर आणण्यासाठी त्यांनी सीसीटीव्ही फुटेज शोधून काढले. त्यानंतर त्यांनी प्रतिक्रिया देत म्हटलं, "त्याठिकाणी बरेच लोकं होते, माझ्यावर केलेल्या आरोप खोटा आहे तसेच सीसीटीव्ही फुटेजमुळे दूध का दूध पानी का पानी होईल."

सीसीटीव्ही फुटेज पाहिल्यानंतर वामन म्हात्रे काय म्हणाले?

वामन म्हात्रे यांनी प्रतिक्रिया देत म्हटलंय की, "आता सीसीटीव्ही फुटेज बाहेर आला आहे, त्यामुळे दूध का दूध पानी का पानी करायची आता वेळ आलेली आहे. त्या ठिकाणी बरेचसे लोक, बरेचसे पोलीस व महिला पोलीस देखील त्या ठिकाणी होत्या. सीसीटीव्ही मध्ये दिसणाऱ्या सर्व लोकांना बोलवून त्यांची चौकशी करावी. मला खात्री आहे की, मी कुठल्याही प्रकारचं वाक्य तिच्या विरोधात वापरलं नाही. त्यावेळेला काय घडलं ते शंभर टक्के या सीसीटीव्ही च्या माध्यमातून समोर येईल. या बाबीचा पोलीस तपास करतील आणि खरं खोटं समोर येईल.

हे ही वाचा >> शिवाजी महाराजांच्या 'त्या' पुतळ्यासाठी शिंदे सरकारने किती कोटी दिलेले?

 मला देखील नोटीस आली, तर मी सुद्धा माझी बाजू मांडणार तर तिची सुद्धा बाजू मांडायला तिला संधी देतील. शाळेच्या मोर्चाची सांगता करत त्या ठिकाणचे जे नागरिक तोडफोड करण्यासाठी गेले, जो उद्रेक झाला होता यानंतर त्या ठिकाणी आम्ही येत होतो. त्यावेळेला मोहिनी जाधव आमच्या समोरून जात होती.. ती माझ्या गावची पत्रकार आणि माझ्या संबंधित आहे म्हणून मी तिला विचारलं, की तुम्ही दोन-तीन दिवसापासून हे कव्हरेज करता लोकांना पटवून सांगितलं पाहिजे खरं खोटं काय आहे, त्या ठिकाणाहून तुम्ही निघून गेले आणि त्याच्यानंतर बाहेर थांबले लोकांना काही माहिती नव्हती.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हे ही वाचा >> Mazi Ladki Bahin Yojana: काय म्हणता.. लाडकी बहीणमुळे महिला होणार कोट्याधीश? फक्त 'ते' पैसे...

सगळ्या लोकांना त्यावेळेला कव्हरेज करण्यासाठी व समजून सांगण्यासाठी तुम्ही त्या ठिकाणी थांबले पाहिजे होते. प्रामुख्याने तुमच्यामुळे त्या ठिकाणी गुन्हे केलेले आहेत आणि तुमच्यावरती गुन्हे दाखल झाले, असं मी म्हणलो होतो. मी शंभर टक्के वामन म्हात्रे आहे बापाला बाप बोलणार शिवसैनिक आहे मी महिलांना अपशब्द किंवा महिलांचा अपमान होईल असं कधी वागलो नाही आणि वागणार नाही, शंभर टक्के हा राजकीय हेतूने गुन्हा दाखल केला आहे आणि यामधून भरपूर काय बाहेर पडणार, मोहिनी जाधव हिने एकदा खोटी बोलली आणि माझ्या विरोधात साबित करण्यासाठी हजार वेळा खोटं बोलावं लागणार आहे..तरीच सुद्धा तिच्या पदरात काही पडणार नाही हे मी ठामपणे सांगतो."

    follow whatsapp

    ADVERTISEMENT