Sanjay Raut: "काही काळ थांबावं लागेल...", राज ठाकरेंच्या भूमिकेचं स्वागत करत संजय राऊत नेमकं काय म्हणाले?

मुंबई तक

Sanjay Raut On Raj Thackeray: "राजकारणात जर कोणी चांगल्या पद्धतीनं भूमिका मांडत असेल, मग ते राजकीय विरोधक जरी असतील, तर त्या भूमिकेवर आपण सकारात्मक दृष्टीकोनातून पाहिलं पाहिजे", संजय राऊत म्हणाले...

ADVERTISEMENT

Sanjay Raut On MNS Chief Raj Thackeray
Sanjay Raut On MNS Chief Raj Thackeray
social share
google news

बातम्या हायलाइट

point

संजय राऊतांनी राज ठाकरेंच्या त्या भूमिकेचं केलं स्वागत

point

"राज ठाकरे सुद्धा ही भूमिका मांडतात..."

point

संजय राऊत नेमकं काय म्हणाले?

Sanjay Raut On Raj Thackeray: "राजकारणात जर कोणी चांगल्या पद्धतीनं भूमिका मांडत असेल, मग ते राजकीय विरोधक जरी असतील, तर त्या भूमिकेवर आपण सकारात्मक दृष्टीकोनातून पाहिलं पाहिजे. या देशात अनेक लोक ईव्हीएमवर भूमिका मांडत आहेत. महाराष्ट्रात सुद्धा आम्ही मांडतोय. पण भारतीय जनता पक्षाबरोबर किंवा एकनाथ शिंदे यांच्या गटासोबत सख्य असलेले राज ठाकरे सुद्धा ही भूमिका मांडतात की, झालेलं मतदान कुठं गेलं? हा संशय आहे. मतदान गायब झालं. त्यांनी एक उदाहरण दिलं की, राजू पाटील यांच्या गावात 1400 मतं आहेत. ते विद्यमान आमदार होते. 1400 मतांच्या गावात त्यांना एकही मत पडू नये हे संशयास्पद आहे. अशा तक्रारी गावागावातून आल्या आहेत. पण महाराष्ट्रातल्या असंख्य शेकडो गावातून ज्या गावावर त्या त्या नेत्याचा प्रभाव आहे, त्यांना एकही मत पडू नये. यासारखं रहस्य कोणतं असू शकेल", असं म्हणत संजय राऊत यांनी राज ठाकरेंच्या भूमिकेला पाठिंबा दिला आहे. 

संजय राऊत पत्रकार परिषदेत पुढे म्हणाले, "नरेंद्र मोदी रहस्यमयी जादूगार आहेत. जादू कशी झाली, ते अमित शाहांनी सांगायला पाहिजे. फडणवीसांनी सांगायला पाहिजे. 1400 मतांचं राजू पाटलांचं आमदारांचं गाव आहे.तिकडे त्यांना आतापर्यंत भरघोस मतदान झालेलं असताना, त्यांना एकही मत मिळू नये, हा प्रश्न जर राज ठाकरेंनी उपस्थित केला आहे, तर त्या प्रश्नाचं उत्तर कोणी द्यायचं? हे उत्तर देवेंद्र फडणवीसांनी दिलं पाहिजे. निवडणूक आयोगाने दिलं पाहिजे. त्यांनी जे भाषण केलं आहे, ते ईव्हीएम संदर्भात केलं आहे आणि ईव्हीएम संदर्भातील त्या मुद्द्यांना आमचा कायम पाठिंबा राहिला आहे. त्यांनी भाषण केलं म्हणून राजकीय दिशा बदलते का? काही काळ थांबावं लागेल. आम्ही वारंवार सांगतोय की, राज ठाकरे यांची भूमिका ही भाजपधर्जीण, एकनाथ शिंदे गटाच्या धार्जिणी असल्याने यात दोन्ही पक्ष हे महाराष्ट्राचे शत्रू आहेत, असं आम्ही जाहीर केलेलं आहे. अशावेळेला राज ठाकरे त्यांच्यासोबत जात आहेत, हे महाराष्ट्राच्या हिताचं नाही, असं आमचं म्हणणं होतं. आम्ही त्यांच्या पुढील वाटचालीकडे लक्ष ठेऊ". 

हे ही वाचा >> Dhananjay Munde : "भगवानगडाच्या पाठिंब्यामुळे मोठी ताकद मिळाली, आत्मविश्वास वाढला"

उद्धव ठाकरे आणि चंद्रकांतदादा पाटील यांची एका लग्नसोहळ्यात भेट झाली होती. यावर मुख्यमंत्री फडणवीस असं म्हणाले, युतीची चर्चा लग्न किंवा सोहळ्यांमध्ये होत नसते. याबाबत प्रतिक्रिया देताना संजय राऊत म्हणाले, ते चुकीचं काहीही बोलले नाहीत. आम्ही असं कुठे म्हणतोय की, लग्न, मुंजी, बारसं, वाढदिवस या सोहळ्यात चर्चा होतात. जेव्हा नेते आणि राजकीय कार्यकर्ते भेटतात आणि ते आपल्या भावना व्यक्त करतात. हे त्यांचं मन असतं. हे मनं प्रत्येकाला असतं. चंद्रकांत पाटील बोलले, उद्धव ठाकरेंनी ऐकलं. उद्धवजी बोलले, दादांनी ऐकलं. आपापला विचार मांडून निघून गेले. जर फडणवीसांना मन असेल तर त्यांनी मन समजून घेतलं पाहिजे, असंही संजय राऊत म्हणाले. 

हे ही वाचा >> Manoj Jarange : "वारकरी संप्रदाय काय गुंड चालवतात का?" नामदेव शास्त्रींच्या वक्तव्यावर मनोज जरांगेंचा सवाल

हे वाचलं का?

    follow whatsapp