Shivaji Maharaj Statue: शिंदे सरकारचं डॅमेज कंट्रोल सुरू, 'वर्षा'वरच्या 'त्या' बैठकीतील Inside स्टोरी
CM Eknath Shinde: शिवाजी महाराजांचा पुतळा प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी काल (28 ऑगस्ट) रात्री उशिरा एक तातडीची बैठक बोलावली होती. ज्याद्वारे आता त्यांनी सरकारच्या वतीने डॅमेज कंट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा कोसळण्याची कारणे शोधण्यासाठी नौदल-राज्य शासनाची संयुक्त तांत्रिक समिती
नवीन भव्य पुतळ्यासाठी तज्ञांचा समावेश असलेली समिती
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून डॅमेज कंट्रोल सुरू
CM Varsha Bungalow Meeting Inside Story: मुंबई: सिंधुदुर्ग येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर राज्यभरातील शिवभक्तांमध्ये शिंदे सरकारविरोधात संतापाचं वातावरण पाहायला मिळत आहे. त्यातच काल (28 ऑगस्ट) राजकोट किल्ल्यावरच ठाकरे आणि राणे समर्थकांमध्ये तुफान राडा झाला. ज्याचा सगळा परिणाम हा शिंदे सरकारच्या इमेजवर होत असल्याचं जाणवताच काल रात्री उशिरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 'वर्षा'वर एक अत्यंत महत्त्वाची बैठक बोलावली होती. या बैठकीत नौदलाचे अधिकारी देखील हजर झाले. (sindhudurga shivaji maharaj statue shinde government damage control starts
inside story from high level meeting held at varsha bungalow)
ADVERTISEMENT
दरम्यान, या सरकारच्या इमेजवर होणारा परिणाम लक्षात घेता आता शिंदे सरकार हे डॅमेज कंट्रोल करत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. काल रात्री झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री शिंदेंनी पुतळ्याचं संपूर्ण प्रकरण काय आहे हे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून समजून घेतलं. ज्यानंतर त्यांनी काही महत्त्वाचे आदेशही दिले.
हे ही वाचा>> Shivaji Maharaj: जयदीप आपटेने मुंबई Tak सांगितलेलं 'मालवणला निघालोय', कुठे आणि कसा झाला फरार?
सरकार आणि नौदलाची संयुक्त समिती नेमणार...
मालवण तालुक्यातील राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळण्यामागची कारणे शोधणे व एकूणच या दुर्दैवी घटनेसंदर्भात विस्तृत कारणमीमांसा करण्यासाठी स्थापत्य अभियंते, तज्ज्ञ, आयआयटी तसेच नौदलाच्या अधिकाऱ्यांचा समावेश असलेली एक तांत्रिक संयुक्त समिती नेमण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला. ही समिती जबाबदारी निश्चित करेल.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य आणि अत्युत्कृष्ट पुतळा उभारण्याचे मुख्यमंत्री शिंदेंने दिले निर्देश
छत्रपती शिवाजी महाराजांचा त्यांच्या कर्तुत्वाला साजेसा भव्य आणि अत्युत्कृष्ट पुतळा उभारण्याच्या दृष्टीने देशातील उत्तम शिल्पकार, स्थापत्य अभियंते, तज्ज्ञ, नौदलाचे अधिकारी यांची एक समितीही नेमण्याचे निर्देश मुख्यमंत्री शिंदेंनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले आहेत.
हे ही वाचा>> Jaydeep Apte ने शिवाजी महाराजांच्या मूर्तीमध्ये का दाखवलेला 'तो' घाव?, ती पोस्ट अन्...
छत्रपतींच्या पुतळ्याला नव्याने भव्य स्वरुपात तयार करणे आणि उभारणे यासाठी जेजे स्कूल ऑफ आर्टस, आयआयटी, स्थापत्य अभियंते, महाराष्ट्रातील नामांकित शिल्पकार, तसेच नौदलाचे तांत्रिक अधिकारी यांची एक समिती देखील नेमण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
ADVERTISEMENT
'उभारण्यात येणारा शिवरायांचा पुतळा त्यांच्या लौकिकाला साजेसा हवा'
मुख्यमंत्री यावेळी म्हणाले की, 'झालेली घटना दुर्दैवी असून शिवभक्तांच्या भावना तीव्र आहेत. नौदलाने हा पुतळा राजकोट येथे नौदल दिन साजरा करण्याच्या निमित्ताने एका चांगल्या भावनेने उभारला होता. भविष्यात आपल्याला अशी दुर्घटना परत कधीच घडू नये यासाठी अतिशय काळजी घेतली पाहिजे. उभारण्यात येणारा शिवरायांचा पुतळा त्यांच्या लौकिकाला साजेसा हवा. यासाठी कुठेही निधी कमी पडू दिला जाणार नाही.'
ADVERTISEMENT
'वर्षा'वरील बैठकीला कोण-कोण होतं हजर?
या घटनेसंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 'वर्षा' येथे संबंधितांची बैठक बोलावली होती. बैठकीस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि पालकमंत्री रवींद्र चव्हाण, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, मुख्य सचिव सुजाता सौनिक, अतिरिक्त मुख्य सचिव गृह इक्बाल सिंग चहल, अतिरिक्त मुख्य सचिव सार्वजनिक बांधकाम मनिषा म्हैसकर, अतिरिक्त मुख्य सचिव नगर विकास असीम गुप्ता, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव ब्रिजेश सिंह, पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, व्हाईस ऍडमिरल अजय कोचर, रियर ऍडमिरल मनीष चढ्ढा, शिल्पकार राम सुतार, विनय वाघ, शशिकांत वडके उपस्थित होते.
ADVERTISEMENT