Uddhav Thackeray CJI : "सरन्यायाधीशांनी याचिकाकर्त्याच्या जागी बसून बघावं"

मुंबई तक

Uddhav Thackeray On Supreme Court : सर्वोच्च न्यायालयात आमदार अपात्रता प्रकरणावरील सुनावणी दरम्यान सरन्यायाधीशांनी उद्धव ठाकरेंच्या वकिलांना सुनावले. त्यावर आता ठाकरे बोलले आहेत. 

ADVERTISEMENT

उद्धव ठाकरे आणि सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड.
सरन्यायाधीशांच्या टिप्पणी उद्धव ठाकरे यांची टिका.
social share
google news

बातम्या हायलाइट

point

सरन्यायाधीशांनी वकिलाला झापले

point

उद्धव ठाकरे कोर्टातील सुनावणीवर काय बोलले?

point

सरन्यायाधीशांच्या टिप्पणीवर ठाकरेंची प्रतिक्रिया

Uddhav Thackeray CJI chandrachud : शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणाची 6 ऑगस्ट रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. या सुनावणी दरम्यान, सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड यांनी न्यायालयाला आदेश देऊ नका, असे म्हणत उद्धव ठाकरे गटाच्या वकिलांना सुनावले. त्यावर आता उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

दिल्लीत माध्यमांशी उद्धव ठाकरेंनी संवाद साधला. यावेळी सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांनी केलेल्या टिप्पणीबद्दल विचारण्यात आले. 

सरन्यायाधीशांच्या टिप्पणीवर ठाकरे काय म्हणाले?

"माझं म्हणणं असं आहे की, मी पूर्णपणे सरन्यायाधीशांचा मान राखून, ते जसं काल बोलले की तुम्ही माझ्या जागी बसून बघा. तसं सरन्यायाधीशांनी सुद्धा समोरच्या याचिकाकर्त्यांच्या जागी बसून बघावं की, काय आम्हाला झेलावं लागतं", असे उद्धव ठाकरे म्हणाले.

हेही वाचा >> पॅरिस ऑलम्पिकमध्ये विनेश फोगाट अपात्र कशी ठरली?   

याच मुद्द्यावर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, "मी अनेकदा सांगितलं आहे की, आमची शेवटची आशा न्यायालय आहे. कारण न्यायालयामध्येच आम्हाला न्याय मिळणार, आमची आशा आहे. मी हे सरळ बोललोय आणि त्यामध्ये कुणाचा अपमान करण्याचा माझा अजिबात हेतू नाहीये."

हेही वाचा >> विधानसभेसाठी राज ठाकरेंचे तीन शिलेदार ठरले

"कोरोना काळ आपण बघितला आहे. योग्य काळात ईलाज झाला तर रुग्ण वाचू शकतो. तो मेल्यानंतर औषध घेऊन किंवा ऑक्सिजन घेऊन आला, तर त्याचा काही उपयोग होत नाही. त्यामुळे तुम्ही रुग्णाच्या अवस्थेत जाऊन बघा की त्याला औषधाची किती गरज आहे. एवढंच माझं म्हणणं आहे. वेळेत औषध द्या तर लोकशाही जगेल", असे भाष्य उद्धव ठाकरे यांनी केले. 

सरन्यायाधीश चंद्रचूड काय म्हणालेले?

सरन्यायाधीशांच्या अध्यक्षतेखालील खंठपिठाने अजित पवार गटाला वेळ वाढवून दिली. यावेळी ठाकरे गटाच्या वकिलांनी जवळची तारीख देण्याची विनंती केली. विधानसभेच्या निवडणुका जवळ आल्या आहेत. या प्रकरणाची लवकर सुनावणी करावी, असे वकील म्हणाले. 

त्यावर सरन्यायाधीश म्हणाले की, "न्यायालयाला आदेश देऊ नका. तुम्ही एका दिवसासाठी इथे येऊन का बसत नाही आणि कोणती तारीख तुम्हाला हवी आहे, हे कोर्ट मास्तरांना सांगत नाही. न्यायालयावर कामाचा किती ताण आहे, हे तुम्ही पाहू शकता", अशा शब्दात सरन्यायाधीशांनी सुनावले होते. 

हे वाचलं का?

    follow whatsapp