Mumbai Tak Chavdi : "धनंजय मुंडे पंकजा मुंडेंची फाईल घेऊन माझ्या घरी...", अंजली दमानीयांचं खळबळजनक विधान
Anjali Damania Mumbai Tak Chavdi Interview : बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणामुळं संपूर्ण राज्यात खळबळ उडालीय. याप्रकरणी धनजंय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानीया यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर नुकतच ठिय्या आंदोलन केलं होतं.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

धनंजय मुंडेंबाबत अंजली दमानीयांनी सांगितला 'तो' किस्ता

"धनंजय मुंडे पंकजा मुंडेंची फाईल घेऊन थेट घरी आले आणि..."

अंजली दमानीया मुंबई तकच्या चावडीत नेमकं काय म्हणाल्या?
Anjali Damania Mumbai Tak Chavdi Interview : बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणामुळं संपूर्ण राज्यात खळबळ उडालीय. याप्रकरणी धनजंय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानीया यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर नुकतच ठिय्या आंदोलन केलं होतं. अशातच मुंबई तक च्या चावडीत अंजली दमानीया यांनी 2015 मध्ये झालेला मोठा किस्सा सांगितलं. धनंजय मुंडे पंकजा मुंडे यांची फाईल घेऊन थेट माझ्या घरी आले होते, असं दमानीया म्हणाल्या.
मुंबई तकच्या चावडीत अंजली दमानीया काय म्हणाल्या?
अनेक जण ज्यांना गोष्टी बाहेर काढायचा असतात, ते अंजली दमानीया यांना संपर्क करतात, यावर प्रतिक्रिया देताना दमानीया यांनी मुंबई तकच्या चावडीत मोठं विधान केलं. अनेक जण माझ्याकडे येतात. त्यात धनंजय मुंडे सुद्धा होते. धनंजय मुंडे पंकजा मुंडे यांची फाईल घेऊन माझ्या घरी आले. तेजस ठक्कर नावाच्या व्यक्तीने मेसेज करुन याबाबत सांगितलं होतं. ते म्हणाले तुम्ही बाहेर भेटू शकता का? यावर मी म्हणाले, मी कुणाला बाहेर भेटत नाही. तुम्ही घरी या. धनंजय मुंडे आणि तेजस ठक्कर माझ्या घरी आले आणि मला म्हणाले या सर्व फाईल्स आहेत, त्या तुम्ही ठेवा. मी त्यांना म्हणाले, मी आजतागायत कधीही दुसऱ्यांनी दिलेल्या फाईलवर काम केलं नाही. कधीही बोलले नाही.
हे ही वाचा >> Walmik Karad गोत्यात, विष्णू चाटेची मोठी कबुली.. CID ची रिमांड कॉपी मुंबई Tak च्या हाती
मला जे योग्य वाटतं. जे मुद्दे मनापासून लढावासे वाटतात, तेव्हढेच मुद्दे मी लढते. मी त्यांच्या फाईल्स घेतल्या आणि ठेऊन दिल्या.पंकजा मुंडे यांनाही माहिती नाही की, धनंजय मुंडे माझ्या घरी येऊन गेले. लढायला सुरुवात केली की, तुमच्यावर वाटेल ते आरोप होतात. सिंचनात जेव्हा मी काम करायला सुरुवात केली, तेव्हा मी कोकणातील 13 धरणांची माहिती काढली. तेरा धरणं एकाच कॉन्ट्रॅक्टरला मिळाली आहेत, हे जेव्हा मला कळलं. तेव्हा मी आरटीआय टाकून ही सगळी माहिती काढली. त्यानंतर पृथ्वीराज चव्हाण यांनी आम्हाला बोलावलं आणि आमच्याकडे असलेल्या सिंचनाच्या फाईलबाबत विचारलं. सिंचनाच्या फाईल बघून ते म्हणाले की ही तर लूट आहे, असंही दमानीया म्हणाल्या.