अजित पवारांना सोलापूरात मोठा धक्का! लोकसभेसाठी भाजपने नेत्याला दिले स्पष्ट संकेत

मुंबई तक

ADVERTISEMENT

Ajit Pawar Uttam Jankar Solapur NCP BJP
Ajit Pawar Uttam Jankar Solapur NCP BJP
social share
google news

बातम्या हायलाइट

point

सोलापूरात अजित पवारांना धक्का, नेता भाजपमध्ये

point

लोकसभेसाठी अजितदादांची जानकरांनी साथ सोडली

NCP : लोकसभा निवडणुकीसाठी आता सर्वच पक्ष जय्यत तयारी लागली आहे. त्यासाठी राजकीय पक्षाकडून वेगवेगळ्या पातळीवर चाचपणीही सुरु आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीसाठी (Lok sabha election 2024) उमेदवारांसह राजकीय पक्षांनीही आता कंबर कसली आहे. त्यामुळेच सोलापूर (Solapur) जिल्ह्यातीलही राजकारण ढवळून निघाले आहे. सोलापूर लोकसभेची निवडणूक यावेळी प्रचंड चुरशीची होणार आहे. एकतर भाजपने एकीकडे विद्यमान खासदार जय सिद्धेश्वर महास्वामी (MP Jai Siddheshwar Mahaswamy) यांचा पत्ता कट केला आहे तर दुसरीकडे अजित पवार (Ajit Pawar) गटाचे नेते उत्तम जानकरांनी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर आता भाजपमध्ये पुनरागमन करण्याच्या तयारीत आहेत. 

ADVERTISEMENT

अजित पवारांची साथ सोडून ते भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतल्याने माळशिरस तालुक्यातील पूर्वाश्रमीचे कट्टर भाजप समर्थक असलेले आणि आता अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असलेले उत्तर जानकर यांनीही आता लोकसभेसाठी कंबर कसायला सुरुवात केली आहे. 

हे ही वाचा >>Narendra Modi : PM मोदींचा शरद पवारांवर मोठा आरोप?

माळशिरसमधील राष्ट्रवादीचे नेते उत्तम जानकर हे लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देण्याच्या तयारीत आहेत. या संदर्भात स्वतः उत्तम जानकर यांनीही तसे स्पष्ट संकेत दिले आहेत. त्यामुळे माढ्यात अजित पवार गटाला मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

हे वाचलं का?

अजित पवार गटातून भाजपमध्ये जाण्याच्या निर्णयावर बोलताना त्यांनी सांगितले की, 'मी जन्मजातच भाजपमध्ये आहे. मध्यल्या काळात काही राजकीय तडजोडीमुळे राष्ट्रवादीमध्ये गेलो असलो तरी मी भाजपच्या विचारधारेशी एकनिष्ठ असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे त्यांच्या या  विधानानंतर लवकरच अजित पवारांना सोडून भाजपमध्ये प्रवेश करतील अशी आता जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
 
उत्तम जानकर हे सोलापूर लोकसभा मतदार संघातून भाजपकडून निवडणूक लढविण्यासाठी इच्छूक आहेत. त्यासाठी उत्तम जानकर यांनी तशी तशी चाचपणीही सुरू केली आहे. मात्र उत्तम जानकर यांच्या उमेदवारीला मात्र स्थानिक भाजप पदाधिकाऱ्यांकडून विरोध असल्याने त्यांच्या उमेदवारी नेमकं काय होणार याकडे आता साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

हे ही वाचा >> प्रीतम मुंडेंचा पत्ता कट, पंकजा मुंडेंना उतरवणार मैदानात?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT