Sunil Shelke : 'मी संपूर्ण महाराष्ट्राला सांगेन पवारांनी केले खोटे आरोप', NCP च्या आमदाराचा इशारा
Sunil Shelke Reply Sharad Pawar : मी साहेबांना जाऊन भेटणार आहे, मी कुणाच्या वाट्याला गेलो. माझी काय चुक झाली, हे त्यांनी सांगाव. तुम्हाला ज्यांनी कुणी ही माहिती दिली ती खऱी होती की खोटी होती ही सुद्धा आपण जानुन घ्यायला हवी होती, असे सुनील शेळकेंनी म्हटले आहे.
ADVERTISEMENT
Sunil Shelke Reply Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी अजित पवार गटाचे आमदार सुनील शेळके यांना भरसभेतून इशारा दिला आहे. लोणावळ्यातील मेळाव्याला येऊ नये म्हणून पदाधिकारी, कार्यकर्त्यांना दमदाटी केल्याचा आरोप सुनील शेळकेंवर करण्यात आला होता. या आरोपानंतर शरद पवारांनी भरसभेतून सुनील शेळके (Sunil Shelke) यांना दम दिला होता. या आरोपानंतर आता सुनील शेळके यांनी शरद पवारांना (Sharad Pawar) प्रत्युत्तर दिले आहे. (sunil shelke reply sharad pawar allgation on lonavala rally maharashtra politics)
ADVERTISEMENT
लोणावळ्यातील मेळाव्याला कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी येऊ नये यासाठी सुनील शेळकेंनी दमदाटी केल्याची माहिती साहेबांना चुकीच्या पद्धतीने दिली गेल्याचे सुनील शेळके यांनी सांगितले. साहेबांनी (शरद पवारांनी) वक्तव्याची शहानिशा करणे गरजेचे होते. पण माझ्या बाबतीत शरद पवारांनी का वक्तव्य केलं, याबाबत मला आश्चर्य वाटतं, असे सुनील शेळके म्हणाले आहेत.
हे ही वाचा : 'BJP ने आमचा केसाने गळा..', रामदास कदमांचा उघडउघड हल्ला
तसेच मी साहेबांना जाऊन भेटणार आहे, मी कुणाच्या वाट्याला गेलो. माझी काय चुक झाली, हे त्यांनी सांगाव. तुम्हाला ज्यांनी कुणी ही माहिती दिली ती खऱी होती की खोटी होती ही सुद्धा आपण जानुन घ्यायला हवी होती, असे सुनील शेळकेंनी म्हटले आहे.
हे वाचलं का?
साहेबांच्या या वक्तव्याची मी नक्कीच दखल घेणार आहे. आणि पुढील 8 दिवसात मी कुणाला फोन केला? कुणाला धमकी दिली? कुणाला दमदाटी केली? असा एकतरी व्यक्ती आपण उभा करावा आणि मला पुराव्यानीशी माहिती द्यावी, असे आव्हान शेळकेंनी शरद पवारांना दिले. तसेच साहेबांनी माझ्याबद्दल जे वक्तव्य केलं ते खोटं केल हे देखील त्यानी सांगाव, नाहीतर मी संपूर्ण महाराष्ट्रात सांगणार साहेबांनी माझ्यावर खोटे आरोप केले,असे सुनील शेळके यांनी म्हटले आहे.
हे ही वाचा : Mahayuti : अमित शाहांकडून शिंदे-पवारांचा करेक्ट कार्यक्रम, जागावाटपात काय ठरलं?
शरद पवार लोणावळ्यात काय म्हणाले?
'एकदा दमदाटी केली ते बास.. पुन्हा असं काही केलंत तर शरद पवार म्हणतात त्यांना.. तुम्ही त्याची काळजी करू नका.. मी त्या रस्त्याने कधी जात नाही.. पण या रस्त्याने जाण्याची स्थिती कोणी निर्माण केली तर सोडतही नाही...' असं म्हणत शरद पवार यांनी अजित पवार गटातील आमदाराला थेट इशाराच दिला आहे. मात्र, हा इशारा केवळ आमदारालाच नाही तर अप्रत्यक्षपणे अजित पवार यांनाही असल्याची चर्चा आता सुरू झाली आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT