Supriya sule : "दमदाटी केली तर गाठ सुप्रिया सुळेशी आहे", नेमका कुणाला इशारा?

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

supriya sule indirect critism on ajit pawar bjp harshwardhan patil threat ncp ncp political crisis
''दमदाटी करायची नाही. हा बारामती लोकसभा मतदारसंघ आहे. मी इथली खासदार आहे',
social share
google news

Supriya sule criticise Ajit Pawar : भाजप नेते आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी काहीच दिवसांपूर्वीच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून धमक्या येत असल्याचा आरोप केला होता. हर्षवर्धन पाटलांच्या या आरोपावर सुप्रिया सुळे यांनी भाष्य केले आहे. ''दमदाटी करायची नाही. हा बारामती लोकसभा मतदारसंघ आहे. मी इथली खासदार आहे', असा दमच सुप्रिया सुळेंनी (Supriya Sule) अजित पवारांच (Ajit Pawar) नाव न घेता भरला आहे. (supriya sule indirect critism on ajit pawar bjp harshwardhan patil threat ncp ncp political crisis) 

ADVERTISEMENT

भोरमधील महाविकास आघाडीच्या सभेत सुप्रिया सुळे बोलत होत्या. "आमच्याकडे बघा परवा काय झालं... इंदापूरला हर्षवर्धन पाटील, भारतीय जनता पक्षाचेच नेते आहेत. आमचे भाऊ आहेत. मी कधी विसरणार नाही की, भाऊंनी मला कधी मदत केलीये. हर्षवर्धन पाटलांवर शिवीगाळ केली. मी प्रत्येकाला इथे सांगतेय...दमदाटी करायची नाही. हा बारामती लोकसभा मतदारसंघ आहे. मी इथली खासदार आहे. कुणीही कुणालाही दमदाटी केली ना, तर ढाल म्हणून पहिली सुप्रिया सुळेंशी गाठ आहे, असा इशाराचा सुप्रिया सुळे यांनी नाव न घेता अजित पवारांना दिला. तसेच तुम्ही दमदाटीला बिलकुल घाबरू नका, असा सल्ला देखील त्यांनी यावेळी दिला. 

हे ही वाचा : Opinion Poll 2024 : सुप्रिया सुळेंची जागा धोक्यात, 'या' पोलने वाढवलं टेन्शन!

देवेंद्र फडणवीस आमच्या घराच्या बाहेर येऊन देवेंद्र फडणवीस बोलले होते. आम्हाला एक संधी द्या, पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगर समाजाला आरक्षण देऊ. मराठा समाजाच्या आरक्षणाबाबतही तेच केलं.फसवणूक नाही झाली. ही सगळी जी फसवाफसवी चाललीय, अशी टीका सुप्रिया सुळे यांनी देवेंद्र फडणवीसांवर केली. 

हे वाचलं का?

पालकमंत्रीपद दिलं नाही की दिल्लीला जातात, जागा कमी दिल्या म्हणून रडत दिल्लीला जातात. कधी तुमच्या कांद्याच्या भावासाठी दिल्लीला गेले आहेत का?तुमच्या दुधाला पैसै मिळावे म्हणून कोणी दिल्लीला गेले आहे का? हे फक्त स्वता:च्या स्वार्थासाठी झालेलं सरकार आहे, अशी टीका सुप्रिया सुळे यांनी महायुती सरकारवर केली. 

हे ही वाचा : Ramdas Kadam : 'कोण रविंद्र चव्हाण? दापोलीत येऊन...',

माझी लढाई कुठल्याही व्यक्तीशी नाही. माझी लढाई ही दिल्लीच्या तख्ताच्या अदृष्य शक्तीच्या विरोधात आहे. ज्याने महाराष्ट्राविरोधात रान उठवले आहे. महाराष्ट्राचा द्वेश आणि विरोध करण्यासाठी केंद्र सरकार आपल्या मागे लागले आहे, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.

ADVERTISEMENT

धार आली आहे माझ्या भाषणाला, याचं कारण माझ्याकडे दोन मार्ग होते. एका बाजूला सत्ता होती आणि अदृश्य शक्ती होती आणि दुसऱ्या बाजूला विचार, संघर्ष आणि वडील..! सत्ता कि संघर्ष ? सुप्रिया सुळे कधीही संघर्ष पत्करेल, कारण मी एक स्वाभिमानी मुलगी आहे, असे सुप्रिया सुळे यांनी ठणकावून सांगितलं. 

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT