Suresh Dhas : "मुख्यमंत्री किंवा दोन्ही उपमुख्यमंत्र्यांपैकी कुणीही बीडचं पालकमंत्रिपद...."; सुरेश धस यांचा मुंडेंना थेट विरोध?
यापूर्वी झालेल्या पालकमंत्र्यांनी पालकमंत्रिपदच भाड्याने दिलं होतं. लीझ अॅग्रीमेंट करण्यात आलं होतं असं म्हणत सुरेश धस यांनी नाव न घेतला सुरेश धस यांनी टोला लगावला.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

कोण होणार बीडचा पालकमंत्री?

सुरेश धस यांनी काय मागणी केली?
Suresh Dhas Beed : एका दिवसात एसपींना हलवलं, 15 दिवसांची पोलीस कोठडी आरोपींना झाली. मुख्यमंत्र्यांनी सभागृहात निवेदन दिल्यानंतर लगेचच कारवाई करण्यात आली असं म्हणत सुरेश धस यांनी कारवाईवर समाधान व्यक्त केलं. एसआयटी गठीत झालेली असून, आता कारवाई होईल असं सुरेश धस म्हणाले आहेत. बीड जिल्ह्याला कडक अधिकाऱ्याची आवश्यकता होती, त्यामुळे आताचे एसपी तसं काम करतील असं धस म्हणाले. मात्र, यावेळी बीडच्या पालकमंत्रिपदाबद्दल बोलत असता सुरेश धस यांनी मुंडेंना विरोध केल्याचं दिसतंय.
हे ही वाचा >> फडणवीसांच्या मंत्र्यांना मिळाले बंगले, पाहा कोण कुठे राहणार.. संपूर्ण यादी
सुरेश धस यांनी याप्रकरणावर बोलताना बीडच्या पालकमंत्रिपदाबद्दलही आपली भूमिका स्पष्ट केली. मुख्यमंत्री फडणवीस किंवा दोन्ही उपमुख्यमंत्र्यांपैकी कुणीही पालकमंत्रीपद स्वीकारलं तर आम्हाला चालेल. यापूर्वी झालेल्या पालकमंत्र्यांनी पालकमंत्रिपदच भाड्याने दिलं होतं. लीझ अॅग्रीमेंट करण्यात आलं होतं असं म्हणत सुरेश धस यांनी नाव न घेतला सुरेश धस यांनी टोला लगावला.
हे ही वाचा >> Vinod Kambli Admitted in Thane Hospital: विनोद कांबळी यांची प्रकृती चिंताजनक, रुग्णालयात दाखल
गेल्या काही दिवसांपासून बीडमध्ये होत असलेल्या सर्व घडामोडी पाहता बीडमध्ये कायवा व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर असल्याचं वेगवेगळ्या नेत्यांनी केलेल्या आरोपातून समोर आलं आहे. भाजपचे आमदार सुरेश धस यांनी तर संतोष देशमुख प्रकरणाचा स्वत: पाठपुरावा केला आहे. त्यामुळे आता या प्रकरणात पालकमंत्रिपदाचा मुद्दाही महत्वाचा झाला आहे. धनंजय मुंडे हे यापूर्वी पालकमंत्री होते. पण सध्या त्यांच्या विरोधात वातावरण असल्याचं दिसतंय. सुषमा अंधारे यांनी देशमुख कुटुंबाची भेट घेतलयानंतर देवेंद्र फडणवीस यांनी बीडचं पालकमंत्रिपद घ्यावं असं म्हटलं होतं.
एकूणच ही सर्व पार्श्वभूमी पाहता, बीडच्या पालकमंत्रिपदाचा तिढा आणखी वाढल्याचं दिसतंय. त्यामुळे आता अखेर कुणाला ही जबाबदारी मिळणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे.