Sushma Andhare: "किरीट सोमय्याचे एचडी व्हिडीओ दिसत होते, तेव्हा लोकं घरात...", सुषमा अंधारे हे काय बोलून गेल्या

मुंबई तक

Sushma Andhare Slams Medha Somaiya : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी 100 कोटींच्या टॉयलेट घोटाळ्याप्रकरणी किरीट सोमय्या आणि त्यांची पत्नी मेधा सोमय्या यांच्यावर गंभीर आरोप केले होते.

ADVERTISEMENT

Sushma Andhare On Medha Somaiya
Sushma Andhare Press Conference
social share
google news

बातम्या हायलाइट

point

सुषमा अंधारेंनी किरीट सोमय्या आणि त्यांच्या पत्नी मेधा सोमय्यांवर हल्लाबोल केलाय

point

किरीट सोमय्यांच्या व्हिडीओ लीक प्रकरणी सुषमा अंधारेंचं मोठं विधान

point

सुषमा अंधारे नेमकं काय म्हणाल्या?

Sushma Andhare Slams Medha Somaiya : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी 100 कोटींच्या टॉयलेट घोटाळ्याप्रकरणी किरीट सोमय्या आणि त्यांची पत्नी मेधा सोमय्या यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्यानंतर मेधा सोमय्या यांनी राऊतांविरोधात अब्रुनुकसानीचा खटला दाखल केला होता. माझगाव न्यायालयात गुरुवारी या प्रकरणाची सुनावणी पार पडली. न्यायालयाने संजय राऊत यांना १५ दिवसांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. त्यानंतर राजकीय वातावरण तापलं असून ठाकरे गटाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे. ज्या वेळी नवरा किरीट सोमय्याचे एचडी व्हिडीओ दिसत होते, लोकं घरात दीड तास व्हिडीओ बघत होते, तेव्हा नवऱ्याची किती अब्रू गेली असेल", असं म्हणत सुषमा अंधारे यांनी मेधा सोमय्या यांच्यावर घणाघता केला.

सुषमा अंधारे काय म्हणाल्या?

"संजय राऊत यांच्यावर अब्रुनुकसानीची केस झाली. किरीट सोमय्या यांच्याबद्दल मला काही वाटत नाही. पण त्यांच्या पत्नीबद्दल दया करावी असं वाटतं. ज्या वेळी नवरा किरीट सोमय्याचे एचडी व्हिडीओ दिसत होते, लोकं घरात दीड तास व्हिडीओ बघत होते, तेव्हा नवऱ्याची किती अब्रू गेली असेल", असं म्हणत सुषमा अंधारे यांनी सोमय्यांवर सडकून टीका केली आहे.

"संजय राऊत यांना 15 दिवसांची शिक्षा झाली. शिक्षा झाली महत्त्वाचे, तर अमित शहांनादेखील तडीपारीची शिक्षा झाली होती. भाजप चे किरीट सोमय्या, निल सोमय्या,देवेंद्र फडणवीस, सुधीर मुनगंटीवार,आशिष शेलार, प्रवीण दरेकर यांनी बोललं पाहिजे. जर तुम्हाला शिक्षा झाली भारी वाटत असेल, तर अमित शहा तडीपार म्हटल्यावर खरंच तडीपार झाला ना, मग आम्ही पण नाव घेताना तडीपार अमित शहा नाव घेऊ..सौ सोनार की एक लोहार की..", असंही अंधारे म्हणाल्या.

हे ही वाचा >> Devendra Fadnavis: 'धर्मवीर-3 ची पटकथा मी लिहीन', फडणवीसांच्या 'या' विधानाचा नेमका काय अर्थ?

लाडकी बहीण योजनेवरून सुषमा अंधारे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केली आहे. अंधारे म्हणाल्या, लाडकी बहीण योजना अजित दादांनी जाहीर केली. त्यामुळे सर्व नेत्यांना बहिणीबद्दल प्रेम व्यक्त करण्याची फार मोठी संधी आहे. सर्व नेत्यांना बहिणीबद्दल किती प्रेम आहे, किती त्याग करू शकतो हे दाखवण्याची संधी या निमित्ताने निर्माण झाली आहे. त्यामुळे नामदार धनंजय मुंडे आपल्या बहिणीवर प्रचंड प्रेम करतात. त्या प्रेमापोटी ते प्रीतम ताईंसाठी परळीची जागा सहज  सोडून देतील. अजितदादांनी बारामतीत बहिणीबद्दल ती संधी गमावली. त्यांनी चुकून उमेदवार उभा केला होता. पण त्यांना चूक सुधारण्याची संधी आहे, असं म्हणत ठाकरे गटाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

सुषमा अंधारे लाडकी बहीण योजनेबाबत पुढे म्हणाल्या, टॅक्सचे पैसे गोळा करून त्यांनी हे पैसे दिलेत. बॅनर असे लावले की यांनी स्वतःची घर दार विकून पैसे दिलेत. आपल्याकडे परंपरा आहे, बहिणीचे लग्न करायचे, शिक्षण करायचे, काहींनी बहिणीच्या लग्नासाठी वावर गहाण ठेवली तर विकली सुध्दा...भाऊ बहिणीला चोरून मदत करतो तुमच्या सारखे बॅनर लावत नाही. ज्यांनी योजनेचे बॅनर लावले ते मतासाठी टपलेले संधीसाधू.

हे ही वाचा >>  ठाकरेंचा दणका! भाजप खासदाराच्या 'लाडक्या बहिणी'चा निवडणुकीत पराभव

हे वाचलं का?

    follow whatsapp