Team India Victory Parade : ''शिंदे सरकार गुजरातधार्जिणे'', बसवरून राजकारण तापलं! सत्ताधारी विरोधकांमध्ये घमासान

मुंबई तक

ADVERTISEMENT

team india victory parade nariman point wankhede stadium gujarat bus aditya thackeray rohit pawar maharashtra politics
बसवरून महाराष्ट्राच राजकारण चांगलच तापलं होतं.
social share
google news

Team India Victory Parade Nariman Point to Wankhede Stadium : टीम इंडियाने आयसीसी टी20 वर्ल्ड कपवर नाव कोरल्यानंतर आज मुंबईत विजयी मिरवणूक काढण्यात आली होती. या मिरवणूकीसाठी गुजरातवरून आणलेल्या बसचा वापर करण्यात आला होता. या बसवरून महाराष्ट्राच राजकारण चांगलच तापलं होतं. विरोधकांनी या बसवरून सरकारवर जोरदार ताषेरे ओढले आहेत. मिरवणुकीच्या या बसवरून कोण काय म्हणाले आहेत? हे जाणून घेऊयात.  (team india victory parade nariman point wankhede stadium gujarat bus aditya thackeray rohit pawar maharashtra politics) 

ADVERTISEMENT

टीम इंडियाच्या विजयाची मिरवणूक काढण्यासाठी गुजरातवरून बस मागविण्यात आली आहे. यावरून आता विरोधकांकडून टीका केली जात आहे. मुंबईत होणाऱ्या मिरवणुकीसाठी गुजरातची बस आणून महाराष्ट्राचा अपमान करण्यात आला आहे,. महाराष्ट्र सरकार गुजरातधार्जिणे आहे, अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली होती.

हे ही वाचा : Mazi Ladki Bahin Yojana App: माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज थेट App वरून करा!

हे मिंधे सरकार स्वत:चं सरकारही हलवेल. कारण गुजरात समोर लोटांगण घातलेले सरकार आहे. क्रिकेटपटूंच आम्ही स्वागत करतो आणि त्यांचं अभिनंदनही करतो. तरीही मुख्य मुद्दा हा आहे की गुजरातच्या बस आपल्या महाराष्ट्रात का?  असा सवाल आदित्य ठाकरेंनी उपस्थित केला आहे. 

हे वाचलं का?

शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी आदित्य ठाकरेंवर पलटवार केला आहे. आदित्य ठाकरेला प्रत्येक गोष्टीला विरोध केल्याशिवाय काय येतं. गुजरातहुन बस आणली तर गैर काय? गुजरात काय पाकिस्तानमध्ये येतं का? असा सवाल संजय शिरसाट यांनी केला आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आमदार रोहित पवार यांनीही गुजरातमधून बस आणण्याबाबत नाराजी व्यक्त केली. मुंबईत भारतीय संघ येत आहे आणि जर का मिरवणूक काढली जात असेल तर मुंबईची बेस्ट बस यासाठी वापरायला हवी होती. बेस्ट बस आणि मुंबई अशी एक वेगळी ओळख आहे. त्यामुळे बेस्टची बस वापरली गेली असती, तर आम्हाला आणखी आनंद झाला असता. बीसीसीआयने गुजरातहून बस आणलीच आहे, पण त्यांनी बेस्टच्या बसची निवड करायला हवी होती, असेही रोहित पवार म्हणाले.

ADVERTISEMENT

हे ही वाचा : मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणींची लूट, कागदपत्रांसाठी पैसै घेतल्याचा व्हिडिओ व्हायरल

दरम्यान टीम इंडिया आज सकाळी मायदेशी परतली होती. सकाळी 6 वाजता टीम इंडियाच विशेष विमान दिल्लीत दाखल झालं होतं. त्यानंतर या खेळाडूंनी पंतप्रधान मोदींची भेट घेतली  होती. या भेटीनंतर नरिमन पॉइंट ते वानखेडे स्टेडिअमपर्यंत विजयी मिरवणूक काढण्यात आली होती. या मिरवणुकीला मुंबईकरांनी मोठी गर्दी केली होती. 

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT