Sharad Pawar ‘आपण सत्तेत नसलो तरी सगळीकडे..’ शरद पवारांची नवी गुगली

मुंबई तक

ADVERTISEMENT

though we are not in power we are everywhere sharad pawar new political ploy
though we are not in power we are everywhere sharad pawar new political ploy
social share
google news

Sharad Pawar Politics: मुंबई: ‘सध्या मी कुठंच नाही, आपण सत्तेत नसलो तरी सगळीकडे.. पण तुम्ही काळजी करु नका… मी सगळीकडे आहे.’ असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष शरद पवार यांनी एक नवीच गुगली टाकली आहे. शरद पवारांच्या याच गुगलीमुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. (though we are not in power we are everywhere sharad pawar new political ploy)

ADVERTISEMENT

शेतकऱ्यांनी मांडलेले प्रश्न हे राज्य आणि केंद्र सरकारकडील आहेत. सध्या मी कुठेच सत्तेत नाही. पण तुम्ही काळजी करु नका, मी कुठेही बसलो तरी सगळीकडे आहे. असं बुचकळ्यात टाकणारं विधान शरद पवार यांनी केलं आहे. ज्यामुळे पुन्हा एकदा नव्या चर्चांना उधाण आलं आहे.

हे ही वाचा>> Raj Thackeray: ‘जरांगेंच्या मागे इतर कोणी तरी, आरक्षण कधीही..’; राज ठाकरेंचं खळबळजनक विधान

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर अजित पवार आणि शरद पवार यांच्या सुरुवातीला काहीसे आरोप-प्रत्यारोप सुरू झाले होते. पण आता मात्र, गेल्या काही दिवसांपासून काका-पुतण्यातील भेटी वाढल्या आहेत. त्यामुळे काँग्रेस आणि शिवसेना (UBT) संभ्रमात पडली. असं असताना आज (16 नोव्हेंबर) कापसेवाडीत शेतकरी मेळाव्यात शरद पवार म्हणाले की, आपण सत्तेत नसलो तरी सगळीकडे आहोत.

हे वाचलं का?

त्यांच्या याच विधानाचे आता अनेक अर्थ लावले जात आहे. तसेच राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना सुरुवात देखील झाली आहे.

दोन्ही पवारांच्या भेटीवर चंद्रकांत पाटलांचं मोठं विधान

दुसरीकडे भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पवारांबाबत केलेल्या विधानामुळे आणखी चर्चेला उधाण आलं आहे. चंद्रकांत पाटील म्हणाले की, ‘कितीही मतभेद झाले तरी सणासुदीला एकत्र येणे हेच पवार कुटुंबाचे वैशिष्ट्य आहे. मतभेदानंतर पवार कुटुंब वेगळे होते. पण अशा कार्यक्रमाला नक्की एकत्र येतात. पवार कुटुंब एकत्रित आले म्हणून मागचे मतभेद विसरले असे नाही. मतभेद अजूनही तसेच आहेत. अजित पवार गोविंद बागेत जातातच. दोन मोठे पवार जे आहेत.. म्हणजे अजित पवार आणि शरद पवार त्यांच्या डोक्यात काय सुरू आहे, हे घटना घडल्याशिवाय कळत नाही.’ असे विधान चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.

ADVERTISEMENT

हे ही वाचा>> मोठी बातमी: बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळासमोर तुफान राडा, हमरीतुमरी अन्…

चंद्रकांतदादांना शरद पवारांचं मिश्किल उत्तर

दरम्यान, चंद्रकांत पाटील यांच्या विधानवर शरद पवार यांनी देखील मिश्किल उत्तर दिलं आहे. जेव्हा चंद्रकांत पाटलांनी केलेल्या विधानावर पत्रकारांनी पवारांना त्यांची प्रतिक्रिया विचारली तेव्हा ते म्हणाले की, ‘कळेल ना त्यांना.. नक्कीच कळेल.. निवडणुकीचा निकाल लागल्यावरच कळेल.’

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT