Uddhav Thackeray : ''मी ढेकणांना...'', ठाकरेंनी फडणवीसांना पुन्हा डिवचलं
Uddhav thackeray News : पुण्यात शिवसेना युबीटीचा शिवसंकल्प मेळावा पार पडला. या मेळाव्यातून ठाकरेंनी पंतप्रधान मोदी,अमित शाह यांच्यासह फडणवीसांवर चौफेर टीका केली आहे.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
तू बर्बादी करणारा आहेस
तुला घालवण्यासाठीच मी मैदानात उतरलो
ठाकरेंचा फडणवीसांना इशारा
Uddhav Thackeray Criticize Devendra Fadnavis : ओंकार वाबळे, पुणे : राज्यात उद्धव ठाकरे आणि उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात वाकयुद्ध रंगल आहे. या वाकयुद्धात आता पुन्हा एका उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांना छेडलं आहे. मी ढेकणांना आव्हान देत नसतो, ढेकणे अंगठ्याला चिरडायची असतात. तुझ्या नादाला लागण्याच्या कुवतीचा तू नाहीच आहेस, अशा शब्दात ठाकरेंनी नाव न घेता फडणवीसांवर टीका केली आहे. (uddhav thackeray criticize devendra fadnavis pune shiv sankalp melava maharashtra politics)
ADVERTISEMENT
पुण्यात शिवसेना युबीटीचा शिवसंकल्प मेळावा पार पडला. या मेळाव्यातून ठाकरेंनी पंतप्रधान मोदी,अमित शाह यांच्यासह फडणवीसांवर चौफेर टीका केली आहे. एक तू राहशील की मी राहीन या ओळीचा ठाकरेंनी पुन्हा पुनरूच्चार करत 'तू बर्बादी करणारा आहेस, तू तर राहूच शकत नाही. तुला घालवण्यासाठीच मी मैदानात उतरलो आहे, असा इशारा ठाकरेंनी फडणवीसांना दिला आहे.
हे ही वाचा : Anil Deshmukh : "वाझेला हाताशी धरून फडणवीस...", हायकोर्टाचा निकाल दाखवत देशमुखांचा गंभीर आरोप
मी परवा शिवसैनिकांसमोर बोललो. एक तर तू राहशील किंवा मी राहील. त्यानंतर माझ्या पायाशी कलिंगड ठेवले गेले. काही जणांना वाटले मी त्यांना आव्हान दिले. पण मी ढेकणाला आव्हान देत नाही. ढेकणे अंगठ्याला चिरडायची असतात. तुझ्या नादाला लागण्याच्या कुवतीचा तू नाहीच आहेस, असा हल्ला देखील ठाकरेंनी फडणवीसांवर चढवला.
हे वाचलं का?
मुख्यमंत्री असताना आजवर मी पुण्याच्या कामात दाखल नाही दिली. कारण बसला होता इथला सुभेदार! पण जेव्हा सत्ताबदल झाला तेव्हा गोष्टी समोर आल्या, अशा शब्दात नाव न घेता ठाकरेंनी अजित पवारांना देखील टोला हाणला.
तिकडे राम मंदिर गळतंय, आता संसद भवन ही गळतंय. संसद भवन उघडून 1 वर्ष झालंय. आता तुम्ही 12 महिन्यात बांधलेल्या संसद भवनाचा हिशोब द्या आणि मग काँग्रेसकडे 70 वर्षाचा हिशोब मांगा, असे ठाकरेंनी पंतप्रधान मोदींना सांगितले आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : Bigg Boss OTT 3 Winner : सना मकबूलने पटकावली ट्रॉफी; किती मिळणार पैसे?
काही दिवसांपूर्वी पुण्यात भाजपाचा एक कार्यक्रम झाला. इतिहासात आपण डोकावलं, तर शाहिस्तेखान जरा तरी हुशार होता, असं म्हणावं लागेल. त्याचं बोटावर निभावलं. तीन बोटं कापली गेल्यानंतर पुन्हा महाराष्ट्रात नाही आला. त्यातनं काही शहाणपण यांनी घेतले असते तर परत महाराष्ट्रात आले नसते, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी नाव न घेता केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर टीका केली.
ADVERTISEMENT
''पण ते (अमित शाह) परत का आले? तर महाराष्ट्राच्या जनतेने दिलेल्या फटक्यांचे वळ कुणाकुणाच्या अंगावर उमटले. हे पाहण्यासाठी ते आले. अहमदशाह अब्दालीचा राजकीय वंशज हा पुण्यात आला होता. तो अहमद शाह होता आणि हे अमित शाह आहेत. अहमद शाहचा राजकीय वशंच इथे वळवळायला आला होता. नवाज शरीफचा केक खाणाऱ्यांकडून आता आम्ही हिंदुत्व शिकायचं का? शिवसेनेने हिंदुत्व सोडल्याचे हे म्हणाले. आम्ही हिंदुत्व सोडलेलं नाही. शंकराचार्यांनी म्हटल्याप्रमाणे विश्वासघातकी लोक हिंदू असू शकत नाही. तुम्ही आमच्याशी विश्वासघात केला'', असे टीकास्र उद्धव ठाकरेंनी सोडलं.
मुनगंटीवार यांनी वाघनखे आणली.. पण अहो मुनगंटीवार... त्या नखाच्या मागे वाघ पाहिजे मग त्या वाघनखला अर्थ आहे... या नखांच्या मागे मुनगंटीवार आहे. पेलवतय का? तुम्हाला हे? मुनगंटीवार म्हणतात की शिवाजी महाराजांची वाघनखे आणली... त्या वाघनखांनी अफझलखानाचा कोथळा बाहेर काढला होता की नाही माहीत नाही पण त्या वाघनखांना छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा होता. ही वाघनखे मुनगंटीवारांनी आणलीत. वाघनखं आणि मुनगंटीवार हे कुठं जुळतय का... असा टोला देखील ठाकरेंनी लगावला.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT