Uddhav Thackeray : "ज्यांनी बाळासाहेबांचे विचार सोडले, त्यांना...", उद्धव ठाकरे कडाडले, बाळासाहेबांच्या स्मारकाचा पहिला टप्पा पूर्ण
Uddhav Thackeray Press Conference: पुढच्या 23 जानेवारीपासून शिवसेनाप्रमुखांच्या शताब्दीचं वर्ष सुरु होईल. आम्ही पुढील 2026 च्या 23 नेवारी आधी हे स्मारक लोकांच्या चरणी आणि पुढच्या पिढीसाठी प्रेरणा देणारं स्मारक होईल.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

स्मारकाच्या माध्यमातून शिवसेनाप्रमुखांचा जीवनपट अनुभवता येणार

"शिवसेनाप्रमुखांनी कधी आत्मचरित्र लिहिलं नाही, त्यांना..."

उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले?
Uddhav Thackeray Press Conference: पुढच्या 23 जानेवारीपासून शिवसेनाप्रमुखांच्या शताब्दीचं वर्ष सुरु होईल. आम्ही पुढील 2026 च्या 23 नेवारी आधी हे स्मारक लोकांच्या चरणी आणि पुढच्या पिढीसाठी प्रेरणा देणारं स्मारक होईल. आयुष्यभर शिवसेनाप्रमुखांनी जे जनतेला दिलं, तेच या स्मारकाच्या माध्यमातून देण्याचा आमचा प्रयत्न आहे. या स्मारकाच्या माध्यमातून शिवसेनाप्रमुखांचा जीवनपट अनुभवता येईल. या स्मारकाच्या श्रेयाबाबत कोणाच्यातही मतभेद होता कामा नये. ज्यांनी बाळासाहेबांचे विचार सोडले आहेत, ते याचा भाग होऊ शकत नाहीत. या स्मारकाचं काम सरकारच करत आहे. पण स्मारक कसं झालं पाहिजे, हे आम्ही पाहत आहोत. श्रेयवादाच्या लढाईत मला पडायचं नाही, अशी मोठी प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत दिली. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाच्या पहिल्या टप्प्याचं काम पूर्ण झाल्यानंतर ठाकरेंनी पत्रकारांशी संवाद साधला.
उद्धव ठाकरे म्हणाले,"हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचं स्वागत करताना मला मनापासून आनंद होत आहे. गेले काही वर्ष या स्मारकाचं काम चालू आहे आणि चर्चापण सुरु आहे. हे काम आता खूप छान वाटतंय पण करणं फार जिकरीचं होतं. आणखी एक योगायोग म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकरांचं स्मारकही बाजूलाच आहे. पण या जागेतलं आव्हान म्हणजे महापौर बंगला. शिवसेनाप्रमुखांच्या अनेक बैठका इथे झाल्या आहेत. युतीच्या बैठका इथे झालेल्या आहेत. हा महापौर बंगला हेरिटेज वास्तू आहे. या वास्तूला कुठेही धक्का न लावता काम करणं हे फार महत्त्वाचं आणि खूप कठीण होतं. त्या वास्तूचं वैभव जपून काम करणं खूप कठीण होतं".
हे ही वाचा >> Pune Crime : तुरूंगातून सुटलेल्या गुंडांची जिथं मिरवणूक निघाली, पोलिसांनी तिथेच धींड काढली
चार भिंती किंवा नुसता पुतळा म्हणजे स्मारक होत नाही. टप्पा 2 च्या कामाला आता सुरुवात होईल. शिवसेनाप्रमुखांनी कधी आत्मचरित्र लिहिलं नाही. त्यांना अनेकदा विचारलं जायचं की, तुम्ही आत्मचरित्र का लिहित नाहीत, यावर त्याचं उत्तर असायचं, मी कपाटातला माणूस नाही. मी मैदानावरचा माणूस आहे. त्यांचं आयुष्य उघडं पुस्तक होतं. पण हे नुसतं मांडणं म्हणजे स्मारक नाही. मी असा विचार केला, शिवसेनाप्रमुखांचं स्मारक असं झालं पाहिजे की, जे शिवसेनाप्रमुखांनी देशातील हिंदूंना दिलं, तेच काम त्यांच्या स्मारकानेसुद्धा पुढील अनेक वर्ष केले पाहिजे. त्या दृष्टीने या स्मारकाचा आराखडा टप्पा २ चा सुद्धा केलेला आहे, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.