Uddhav Thackeray : "आयएएस ऑफिसर म्हणताहेत, साहेब लवकर या", ठाकरे मेळाव्यात काय बोलले?

ऋत्विक भालेकर

ADVERTISEMENT

उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे आणि महायुती सरकारवर टीका केली.
शिवसेना (UBT) पक्षाचे नेते उद्धव ठाकरे.
social share
google news

बातम्या हायलाइट

point

उद्धव ठाकरे यांचे मेळाव्यात भाषण

point

शिंदे, मोदींवर ठाकरेंचे टीकास्त्र

point

महाविकास आघाडीने फुंगले प्रचाराचे रणशिंग

Uddhav Thackeray Maha Vikas Aghadi: विधानसभा निवडणुकीवर लक्ष्य केंद्रीत केलेल्या महाविकास आघाडीचा पहिला मेळावा मुंबईत पार पडला. मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात झालेल्या कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांनी महायुती सरकारवर टीका करताना आयएएस अधिकाऱ्यांबद्दलचाही एक किस्सा सांगितला. (Uddhav Thackeray said, IAS officers are telling me to come back to the Maharashtra Government)

मुंबईमध्ये महाविकास आघाडीचा पहिला मेळावा पार पडला. या मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी महायुती सरकारमध्ये समन्वय नसल्याचा दावा केला. त्याचबरोबर योजनांची घोषणा केली, पण सरकारकडे पैसे नसल्याचेही ठाकरे म्हणाले. 

न्यायालयाने यांना फटकारतंय, ठाकरेंची महायुतीवर टीका

उद्धव ठाकरे म्हणाले, आता तर अशी माहिती मिळतेय की, घोषणा तर केल्या. लाडकी बहीण... पैसे कुठून आणायचे? न्यायालय त्यांना फटकारतंय की, इकडे नुकसान भरपाई द्यायला पैसे नाहीत, लाडक्या बहिणीची योजना थांबवू का?", असे म्हणत ठाकरेंनी महायुती सरकार लक्ष्य केले.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हेही वाचा >> ठाण्यातून लढणार की वरळीतून? आदित्य ठाकरेंचा निर्णय झाला 

आयएएस अधिकाऱ्यांबद्दल ठाकरे काय बोलले?

"सगळेच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री... कुणाचं काय, कुणाचा पायपूस कुणामध्ये नाही. चिडचिड चाललीये. अनेक जे आयएएस ऑफिसर आहेत, ते मला सांगत आहेत की, साहेब लवकर या तुम्ही. लवकर या", असे उद्धव ठाकरे निर्धार मेळाव्यात म्हणाले.

हेही वाचा >> महाराष्ट्रातील 'राज'कारण पडद्यावर झळकणार? राज ठाकरेंचा बायोपिक येणार?  

"यांची जी दडपशाही चालली आहे. दमदाटी चालली आहे. आपले हे मिंधे सांगताहेत की, मी चांगलं सांगतोय तोपर्यंत ऐका नाही, तर दुसरं रुप दाखवावं लागेल. अरे तुमचं रुप दुसरं काय आहे, हे सुद्धा लोकांमध्ये पोहोचवण्याचे काम तुमचं (मविआ कार्यकर्ते) आहे", असे टीकास्त्र ठाकरेंनी शिंदेंवर डागले.   

ADVERTISEMENT

15 लाखांचे 1500 रुपये का झाले? ठाकरेंचा सवाल

"याचं खरं रुप आहे गद्दार. सरकार पाडायला ५० खोके, लाडक्या बहिणीला १५०० रुपये. मोदींनी म्हटलं होतं, १५ लाख तुमच्या अकाऊंटमध्ये येतील. १५ लाखांचे १५०० का झाले?", असा चिमटाही ठाकरेंनी मोदी आणि शिंदेंना काढला. 

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT