Uddhav Thackeray : राहुल गांधीसमोर ठाकरे झुकले? व्हायरल फोटोमागचे सत्य आलं समोर

प्रशांत गोमाणे

Uddhav Thackeray News : भाजपच्या एका कार्यकर्त्यांने उद्धव ठाकरे आणि राहुल गांधी यांचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत राहुल गांधी यांच्या हाती पुष्पगुच्छ आहे. तर उद्धव ठाकरे राहुल गांधी यांना झुकून नमस्कार करताना दिसत आहेत. या फोटोवरून आता भाजपने उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र डागायला सुरुवात केली आहे.

ADVERTISEMENT

उद्धव ठाकरे आणि राहुल गांधी यांचा एक फोटो व्हायरल होत आहे.
udhhav thackeray bowing down in front of rahul gadhi viral photo fact check maharashtra politics
social share
google news

बातम्या हायलाइट

point

उद्धव ठाकरे आणि राहुल गांधी यांचा एक फोटो व्हायरल

point

भाजपने ठाकरेंना टार्गेट करायला सुरूवात केली

point

फोटोमागचं खर सत्य आता आलं समोर

Uddhav Thackeray Rahul gandhi Viral Photo : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी तयारी सुरु केली आहे. नेत्यांच्या भेटीगाठी देखील सुरु झाल्या आहेत. नुकताच शिवसेना युबीटी प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी दिल्ली दौरा केला होता. या दौऱ्यात उद्धव ठाकरे यांनी राहुल गांधी (Rahul gandhi) आणि सोनिया गांधी (Sonia Gandhi) या दोन नेत्यांची भेट घेतली होती. या भेटीगाठीनंतर आता उद्धव ठाकरे आणि राहुल गांधी यांचा एक फोटो व्हायरल होत आहे. या फोटोवरून आता भाजपने ठाकरेंना टार्गेट करायला सुरूवात केली आहे. पण या व्हायरल फोटोमागचं सत्य काय आहे? हे जाणून घेऊयात. (udhhav thackeray bowing down in front of rahul gadhi viral photo fact check maharashtra politics) 

भाजपच्या एका कार्यकर्त्यांने उद्धव ठाकरे आणि राहुल गांधी यांचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत राहुल गांधी यांच्या हाती पुष्पगुच्छ आहे. तर उद्धव ठाकरे राहुल गांधी यांना झुकून नमस्कार करताना दिसत आहेत. या फोटोवरून आता भाजपने उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र डागायला सुरुवात केली आहे.  

हे ही वाचा : Majhi Ladki Bahin Yojana : अर्ज न भरलेल्यांसाठी गुड न्यूज! अदिती तटकरे म्हणाल्या, 'आता...'

जितेंद्र प्रताप सिंह या भाजप कार्यकर्त्याने त्याच्या एक्स अकाऊंटवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत ठाकरे राहुल गांधींसमोर झुकल्याचे दिसत आहे. या फोटोवरून भाजपने ठाकरेंवर टीका करायला सुरूवात केली आहे. उद्धव ठाकरे राहुल गांधींपेक्षा 15 वर्षांनी लहान आहेत. पण सत्तेच्या खुर्चीची लालसा आणि सत्तेचा लोभ माणसांकडून काय काय करवून घेतो? अशा शब्दात भाजपकडून ठाकरेंना डिवचण्यात आले होते.बाळासाहेब ठाकरे बोलायचे मी कधी दिल्लीसमोर झुकणार नाही. ज्यावेळेस बाळासाहेब ठाकरेंकडून मतदानाचा अधिकार काढून घेण्यात आला होता, त्यावेळेस ते हे वाक्य बोलले होते. त्यावेळेस एका पत्रकाराने विचारले की तुम्ही माफी मागून प्रकरण संपवाल का? तर बाळासाहेब ठाकरे म्हणाले की, काँग्रेसच्या दिल्ली दरबारात षंढ वाकतात. एकूणच या फोटोच्या माध्यमातून भाजपने ठाकरेंना घेरण्यास सुरुवात केली होती. 

शिवसेनेने केला फोटोचा पर्दाफाश 

दरम्यान या व्हायरल फोटोनंतर ठाकरेंच्या शिवसेनेकडून यांचा पर्दाफाश करण्यात आहे. तसेच भाजपने शेअर केलेला फोटो हा मॉर्फ असल्याचेही स्पष्ट केले आहे. शिवसेनेने दोन फोटो ट्विट केले आहे. भापजने शेअर केलेल्या पहिल्या फोटोला त्यांनी फेक ट्विट म्हटले आहे. तर दुसऱ्या फोटोत शिवसेनेने दोन्ही खरे फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये पहिल्या फोटोत ठाकरे एका वृद्ध दाम्पत्यासमोर झुकले आहेत.तर दुसऱ्या फोटोत ते राहुल गांधीसोर उभे आहेत. त्यामुळे हे दोन्ही फोटो शेअर करून फोटो मॉर्फ केल्याचे उघड केले आहे. 

हे ही वाचा : Ladki Bahin Yojana : 'त्या' 27 लाख अर्जदार महिलांना बसणार धक्का, 3000 रूपये जमा होणार की नाही?

या फोटोसोबत ठाकरेंच्या शिवसेनेने भाजपवर टीका देखील केली आहे. ''खोटं बोला आणि रेटून बोला'' ही भाजपची नीती सामान्य माणसाच्या लक्षात आलेली आहे. खोटं बोलूनच ह्यांनी विश्वासार्हता गमावलेली आहे आणि त्याचा परिणाम लोकसभेत दिसला आहे तोच परिणाम ह्या विधानसभेलादेखील दिसणार आहे, असे ट्विट करत ठाकरेंच्या शिवसेनेने भाजपवर टीका केली आहे.
 

हे वाचलं का?

    follow whatsapp