Uddhav Thackeray : 'गुलाबी जॅकेट'वरून पवारांना पहिल्यांदाच ठाकरेंनी छेडलं, ''भाजपच्या झाडावरची...''
Uddhav Thackeray On Ajit Pawar : दसरा मेळाव्यातून उद्धव ठाकरे सरसंघचालक मोहन भागवतांपासून पंतप्रधान मोदी, अमित शहा, फडवणीस आणि शिंदे पवारांवर जोरदार हल्ला चढवला आहे. या टीकाटीपण्णीत पहिल्यांदाच ठाकरेंनी गुलाबी जॅकेटवरून अजित पवारांवर टीका केली. भाजपच्या झाडाला लागलेली ही गुलाबी अळी आहे, अशी टीका ठाकरेंनी अजित पवारांवर केली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

भाजपच्या झाडाला दाढीवाला खोडकिडा लागलाय

बोंडावरती गुलाबी जॅकेट वाली अळी पडलीय

शिंदे, पवारांवर ठाकरेंची टीका
Uddhav Thackeray On Ajit Pawar, Dasara Melava : दसरा मेळाव्यातून उद्धव ठाकरे सरसंघचालक मोहन भागवतांपासून पंतप्रधान मोदी, अमित शहा, फडवणीस आणि शिंदे पवारांवर जोरदार हल्ला चढवला आहे. या टीकाटीपण्णीत पहिल्यांदाच ठाकरेंनी गुलाबी जॅकेटवरून अजित पवारांवर टीका केली. भाजपच्या झाडाला लागलेली ही गुलाबी अळी आहे, अशी टीका ठाकरेंनी अजित पवारांवर केली आहे. या टीकेला आता अजित पवार गट काय उत्तर देते. हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. (udhhav thackeray criticize on ajit pawar gulabi jacket pr eknath shinde devendra fadnavis maharashtra politics dasara melava)
दसरा मेळाव्यातून बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, अमित शाह तुमच्या भाजपच्या झाडाला दाढीवाला खोडकिडा लागलाय आणि तुमच्या बोंडावरती गुलाबी जॅकेट वाली अळी पडलीय, अशी टीका ठाकरेंनी शिंदे आणि अजित पवारांवर केली आहे. पण आम्हाला वाईट वाटतंय आमचा एकेकाळचा मित्र कुरतडला जातोय, पोखरला जातोय. पण यांना त्यांच काही सोयरसुतक नाही. पण यांना सत्ता पाहिजे. याला म्हणतात सत्ता जिहाद, अशी टीका ठाकरेंनी भाजपवर केला आहे.