Udhhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या सभेदरम्यान ठाण्यात तुफान राडा, काय घडलं?

विक्रांत चौहान

ADVERTISEMENT

udhhav thackeray thane rally eknath shinde worker and raj thackeray mns worker maharashtra politics
ठाण्यात उद्धव ठाकरेंची आज सभा पार पडणार आहे.
social share
google news

बातम्या हायलाइट

point

उद्धव ठाकरेंच्या सभेआधी ठाण्यात राडा

point

ठाकरेंच्या ताफ्यावर नारळ, बांगड्या फेकल्या

point

मनसे, शिंदेंच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात

Uddhav Thackeray Thane Sabha : ठाण्याच्या गडकरी रंगायतन सभागृहात आज उद्धव ठाकरेंची सभा पार पडणार आहे. या सभेआधी ठाण्यात तुफान राडा झाल्याची घटना घडली आहे. मनसैनिक आणि शिंदेंच्या कार्यकर्त्यांनी सभास्थळी तुफान घोषणाबाजी करून गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला आहे. या घटनेनंतर पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घ्यायला सुरूवात केली आहे. (udhhav thackeray thane rally eknath shinde worker and raj thackeray mns worker maharashtra politics) 

ADVERTISEMENT

सभेसाठी उद्धव ठाकरे यांचा ताफा येत असताना नारळ आणि बांगड्या फेकल्याची घटना घडली आहे. याचसोबत मनसे आणि शिंदेंच्या सेनेकडून ठाकरेंविरोधात घोषणाबाजी करण्यात आल्या आहेत. तसेच उद्धव ठाकरे ज्या सभागृहात सभा घेणार आहेत. त्या सभागृहाबाहेर मनसे कार्यकर्त्यांनी निदर्शने केली आहेत. त्यानंतर मनसेच्या अनेक महिला व पुरुष कार्यकर्त्यांना ठाणे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तसेच पोलीस आणि यूबीटी सेनेला मनसेचे कार्यकर्तेही आत असण्याची शक्यता आहे, त्यामुळे सभागृहातही गोंधळ उडाला आहे.

हे ही वाचा : Parambeer Singh : ''ठाकरे पवारांच्या घरी बैठका, फडणवीसांसह 'या' नेत्यांना अटक करण्याचा होता प्लॅन''

ठाकरेंच्या सभास्थळी आज दोन्ही गटाचे लोकं एकमेकांसमोर आले आहेत. पोलिसांकडून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न सुरु आहे. कालच राज ठाकरे यांच्या गाडीवर सुपारी फेकून उद्धव ठाकरे गटाच्या नेत्यांकडून आणि कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी करण्यात आली होती. त्यामुळेच आज उद्धव ठाकरे यांच्या मेळाव्याआधी मनसेचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

दरम्यान राडा करणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ठाण्यात सकाळपासून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सकाळपासूनच अशा प्रकारे काही तरी गोंधळ घातला जाऊ शकतो असा पोलिसांना संशय होता. त्यामुळे मुंबईपासून ठाण्यापर्यंत सगळीकडे मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

हे ही वाचा : Raj Thackeray : राज ठाकरेंकडून अजित पवारांचं कौतुक, नेमकं काय म्हणाले?

    follow whatsapp

    ADVERTISEMENT