दसरा मेळाव्याआधीच राडा! ठाकरे-शिंदेंचे कार्यकर्ते आमने सामने; कल्याणमध्ये काय घडलं?

मिथिलेश गुप्ता

Uddav Thackeray vs Eknath Shinde Dasara Melava : मुंबईत आज शिवसेना युबीटी प्रमुख उद्धव ठाकरे यांचा शिवाजी पार्क मैदानावर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आझाद मैदानावर दसरा मेळावा पार पडणार आहे. या दसरा मेळाव्याआधीच ठाकरे आणि शिंदेंचे कार्यकर्ते आमने सामने आले आहेत. कल्याण रेल्वेस्टेशनवर ही घटना घडली आहे.

ADVERTISEMENT

 ठाकरे-शिंदेंचे कार्यकर्ते आमने सामने
udhhav thackeray vs eknath shinde dasara melava thackeray and shinde worker face each other kalyan railway station
social share
google news

Uddav Thackeray vs Eknath Shinde Dasara Melava : मुंबईत आज शिवसेना युबीटी प्रमुख उद्धव ठाकरे यांचा शिवाजी पार्क मैदानावर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आझाद मैदानावर दसरा मेळावा पार पडणार आहे. या दसरा मेळाव्याआधीच ठाकरे आणि शिंदेंचे कार्यकर्ते आमने सामने आले आहेत. कल्याण रेल्वेस्टेशनवर ही घटना घडली आहे. या घटनेमुळे रेल्वे स्थानकात तुफान राडा झाला होता. (udhhav thackeray vs eknath shinde dasara melava thackeray and shinde worker face each other kalyan railway station) 

मुंबईत उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे दसरा मेळावे पार पडणार आहेत. या मेळाव्यासाठी मुंबईच्या कानाकोपऱ्यातून नागरीक पोहोचत आहे. त्याचप्रमाणे आज कल्याणमधील शिंदे आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते मेळाव्यासाठी निघाले होते. यावेळी कल्याण रेल्वे स्थानकावर शिंदे आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते आमने-सामने आले होते. त्यावेळी दोन्ही गटाकडून रेल्वे स्थानकात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. त्यानंतर आधी ठाकरे गटाचे कार्यकर्ते निघून गेले त्यानंतर शिंदे गटाचे कार्यकर्ते गेले आहेत. 

हे ही वाचा: Ratnagiri News: शाळेत गरबा खेळताना विद्यार्थिनीचा जागीच मृत्यू! नेमकं घडलं काय?

दसरा मेळाव्यावर पावसाचे सावट 

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आजही राज्याच्या विविध भागात पावसाची शक्यता आहे. मुंबईत देखील आज जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मध्य मुंबईत ढगाळ वातावरण आहे. त्यात आज उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा दसरा मेळावा पार पडणार आहे. मात्र या दोन्ही दसरा मेळाव्यावर पावसाचे सावट आहे. 

मुंबईत आज काही ठिकाणी ढगांच्या कडकडाटांसह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. आज वाऱ्याचा वेग हा 30-40 किमी प्रती तास असण्याचाही अंदाज आहे. तसेच मुंबईला आज यलो अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे दसरा मेळाव्यात मुसळधार पाऊस पडण्याचा शक्यता आहे. 

हे ही वाचा: Mumbai Rain : ठाकरे-शिंदेंना पाऊस देणार गुलीगत धोका, दसरा मेळाव्यावर पावसाचं सावट!

हे वाचलं का?

    follow whatsapp