Amit Shah: "फक्त मार्केटिंग करून नेता बनू नका, त्यासाठी जमिनीवर...", सहकार परिषदेत अमित शाहांचा शरद पवारांवर निशाणा
Amit Shah On Sharad Pawar : केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांनी शरद पवार यांच्यावर टीका करतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदींवर स्तुतीसुमने उधळली. ते मालेगाव येथे सहकार परिषदेत बोलत होते.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी सहकार परिषदेत शरद पवारांवर केला हल्लाबोल

"पवार साहेब साखर उद्योगासाठी तुम्ही..."

अमित शाहा पवारांवर टीका करत नेमकं काय म्हणाले?
Amit Shah On Sharad Pawar : "महाराष्ट्राच्या कोऑपरेटिव्ह आंदोलनासाठी पवार साहेब तुम्ही काय केलं आहे? साखर कारखान्यांसाठी काय केलं आहे, शेतकऱ्यांसाठी काय केलं आहे? कोऑपरेटिव्हसाठी काय केलंय? फक्त मार्केटिंग करून नेता बनणं योग्य नसतं, जमिनीवर काम करावं लागतं पवार साहेब..नरेंद्र मोदींनी सहकार मंत्रालय गठीत केलं. साखर कारखान्यांसाठी इथेनॉलची योजना सुरु केली. इनकम टॅक्सची समस्या सोडवली", असं म्हणत केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांनी शरद पवार यांच्यावर टीका करतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदींवर स्तुतीसुमने उधळली. ते मालेगाव येथे सहकार परिषदेत बोलत होते.
अमित शाहा पुढे म्हणाले,पॅक्सचं कम्प्युटरायजेशन मोदींनी केलं. पण मी आज इथे राजकारण करायला आलो नाही. आमचे साथीदार शिवाजीराव आणि विकासजी यांचा सन्मान करण्यासाठी आलो आहे. अनेक लोकांचा विश्वास कोऑपरेटिव्हशी जोडलेला असतो. संयमाने चाललं पाहिजे. नियमानुसार चाललं पाहिजे. शेतकऱ्यांच्या हिसासाठी काम केलं पाहिजे. मला विश्वास आहे, या तिन्ही गोष्टी तुमही कराल.
हे ही वाचा >> Maharashtra Bandhara Blast : भंडाऱ्यात ऑर्डनन्स फॅक्ट्रीमध्ये भीषण स्फोट, दूरपर्पयंतचा परिसरा हादरला...
""मोदीजी जेव्हा प्रधानमंत्री झाले, तेव्हा त्यांनी जय जवान जय किसान आणि त्याचसोबत जय विज्ञान जोडण्याचं काम केलं. वर्षानुवर्षे एक चर्चा होती, शेतकरी जे शेतीचं काम करत आहेत, तो नफा देणार नाही. पण माझा आजही दृढ विश्वास आहे, सहकार आंदोलन आणि विज्ञान या दोन्हीला जोडलं तर आजही शेती नफ्याचाच उद्योग आहे. याबाबत कोणालाही शंका उपस्थित करण्याची गरज नाही", असंही शाहा म्हणाले.
जेव्हा शेतकरी शेती करतो, तेव्हा त्याला माहित नसतं की त्याच्या शेतात काय काय आहे, कोणती गोष्ट कमी आहे? कोणती गोष्ट जास्त आहे? तो परंपरागत ट्रेंडनुसारच शेती करत आहे. पण जेव्हा मोदींनी मातीच्या चाचणीबाबत सांगितलं, तेव्हा माहित झालं की जे बियाणं टाकण्याची गरज नव्हती, ते शेतकी टाकत होते. जे बियाणं न्यूट्रिशन्स टाकण्याची गरज होती, ते शेतात टाकत नव्हते. शेती हा नेहमीच फायदेशीर व्यवसाय आहे, असं मोठं विधान शाहांनी यावेळी केलं.
हे ही वाचा >> Jitendra Awhad : आव्हाडांनी काढलं नवं प्रकरण, महादेव गित्तेचा दवाखान्यातील व्हिडीओ, निशाण्यावर कोण?
तुमच्या पाण्याची पीएच मात्रा किती आहे, सल्फर टाकायचं की नाही? डीएपी किती टाकायला पाहिजे? कोणती शेती केल्याने जास्त फायदा होऊ शकतो, या सर्व गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे. आम्ही बेळगावात वेंकेटेश्वरा काजू फॅक्टरीचं उद्घाटन केलं. या माध्यमातून दररोज 24 टन काजूचं प्रोडक्शन होईल आणि 18 हजार शेतकऱ्यांना काजूचा भाव मिळेल अशी व्यवस्था केली आहे, असंही शाहांनी सहकार परिषेदत म्हटलं.