India Alliance: ‘…तर राजकारणातही अस्पृश्य म्हणूनच’, प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेस-राष्ट्रवादीवर तोफ डागली
Prakash Ambedkar : प्रकाश आंबेडकर यांनी ट्विट करत काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर अस्पृश्यतेचा गंभीर आरोप केला आहे. त्यांनी एकाच वेळी राजकीय पक्षावर टीका करत त्यांनी इंडिया आघाडीवरही टीका केली आहे.
ADVERTISEMENT
Prakash Ambedkar : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपच्या विरोधात देशातील विरोधी गटातील पक्षांनी एकत्र येत इंडिया आघाडीच्या माध्यमातून आवाज उठवला आहे. देशातील अनेक नेते या आघाडीत सामील आहेत. त्यामधीलच काँग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादी (National Congress Party) हे दोन पक्षही त्यामध्ये सहभागी आहेत. मुंबईतील बैठकीनंतर इंडिया आघाडीची जोरदार चर्चा सुरु झाली. त्या बैठकीनंतर वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी अस्पश्यतेवरून काँग्रेस आणि राष्ट्रवादीने गंभीर आरोप केले आहे. त्याबाबतचे ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी ट्विट करत इंडिया आघाडीवर जोरदार निशाणा साधला आहे. या दोन्ही पक्षावर त्यांनी आरोप करताना अस्पश्यतेचा मुद्दा उपस्थित केला आहे. त्यामुळे राज्यातील राजकारण आता आणखी तापणार असल्याचे दिसून येत आहे.
ADVERTISEMENT
आम्हाला फक्त समाजातच अस्पृश्य…
प्रकाश आंबेडकर यांनी एकाच वेळी इंडिया आघाडीवर आणि काँग्रेस-राष्ट्रवादीवर जोरदार टीका केली आहे. यावेळी त्यांनी अस्पृश्यतेचा मुद्दा उपस्थित केला आहे. आम्हाला फक्त समाजातच अस्पृश्य म्हणून वागवलं जात नाही तर राजकारणातही अस्पृश्य म्हणूनच वागवलं जाते अशा शब्दात त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीचा समाचार घेतला आहे. अस्पृश्यता ही काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून मानली जात असल्याचा गंभीर आरोपही या दोन्ही पक्षावर केला आहे.
हे ही वाचा >> Uddhav Thackeray : चिमुकल्याने दिली उद्धव ठाकरेंना शिदोरी, म्हणाले माझ्याकडे शब्द नाहीत
सनातन धर्म मानणारे
प्रकाश आंबेडकर यांनी इंडिया आघाडीची बैठकीवर जोरदार टीका करत त्यांनी राज्यातील विरोधी गटात असणाऱ्या पक्षावर गंभीर आरोप केले आहेत. राज्यात आणि देशात भाजप आणि आरएसएसच्या विचारसरणीचे सरकार आले. त्यानंतर त्यांचे प्रचारक म्हणून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच काम करतात असा गंभीर आरोपही त्यांनी केला आहे.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
आम्हाला फक्तं समाजातच अस्पृश्य म्हणून वागवलं जात नाही, तर राजकारणातही अस्पृश्य म्हणूनच वागवलं जातं.
भाजप-आरएसएसचा उगम होताच सनातन धर्म मानणारे आणि त्याचे प्रचारक असणारे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस दोघेही राजकारणात अस्पृश्यता पाळायला लागले आहेत.#IndiaAlliance मध्ये… pic.twitter.com/fEYsNuPZf8
— Prakash Ambedkar (@Prksh_Ambedkar) September 8, 2023
ADVERTISEMENT
काँग्रेस-राष्ट्रवादीकडून अस्पृश्यता
इंडिया आघाडीवर त्यांनी टीका करताना काँग्रेस-राष्ट्रवादीला लक्ष्य केले आहे. यावेळी त्यानी अस्पृश्यतेचा आरोप करत समाजामध्ये ज्या प्रकाराची अस्पृश्यता आहे. त्याच प्रमाणे या दोन्ही पक्षाकडूनही ती पाळली जाते. त्यामुळेच त्यांनी इंडिया आघाडीच्या निमंत्रणावरुन त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून लक्ष्य केले आहे.
ADVERTISEMENT
इतर पक्षांना निमंत्रण का
इंडिया आघाडीच्या मुद्यावरून त्यांनी राजकीय विरोधकांवरही त्यांनी आपले मत व्यक्त केले. प्रकाश आंबेडकरांच्या सहभागाबद्दलही अनेक प्रश्न उपस्थित केले जात होते. इंडिया आघाडीकडून काही दिवसांपूर्वी स्पष्ट करण्यात आले होते की, इंडिया आघाडीमध्ये सहभागी होण्यासाठी निमंत्रणाची गरज नव्हती, मग इतर पक्षांना हे इंडिया आघाडीवाले निमंत्रण वाटत का फिरतात असा सवालही त्यांनी केला आहे.
हे ही वाचा >>
शूद्रांमधले मोठे समाजवादी नेते
प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी लालू प्रसाद यादव आणि स्टॅलिन यांच्यावरही बोचरी टीका केली आहे. त्यांच्यावर टीका करताना त्यांनी म्हटले आहे की, लालू प्रसाद यादव आणि स्टॅलिन या शूद्रांमधल्या मोठ्या समाजवादी नेत्यांशिवाय तुमच्या आघाडीची गाडी अडली नसती, तर त्यांना तुम्ही निमंत्रण दिले असते का याबद्दल मला शंकाच आहे असा खोचक सवाल त्यांनी ट्विटरवरून केला आहे.
ADVERTISEMENT