Ladki Bahin Yojana: '...तर लाडकी बहीण योजनेची रक्कम दुप्पट होईल', शिवसेनेच्या 'या' आमदाराचं मोठं विधान
Mla Vishwanath Bhoir On Ladki Bahin Yojana : राज्य सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरु केल्यापासून पात्र महिलांच्या खात्यावर पहिल्या आणि दुसऱ्या हफ्त्याचे पैसे जमा झाले आहेत.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबाबत 'त्या' आमदाराचं मोठं विधान
शिवसेनेच्या आमदारांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर केला घणाघात
शिंदे गटाच्या आमदारांनी मंत्री सुनील केदारांचा घेतला समाचार
Mla Vishwanath Bhoir On Ladki Bahin Yojana : राज्य सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरु केल्यापासून पात्र महिलांच्या खात्यावर पहिल्या आणि दुसऱ्या हफ्त्याचे पैसे जमा झाले आहेत. तिसऱ्या हफ्त्याचे पैसेही जमा होण्यास सुरुवात झाल्याचं सरकारकडून सांगण्यात येत आहे. अशातच शिवसेना शिंदे गटाचे कल्याण पश्चिमेचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी लाडकी बहीण योजनेबाबत मोठं विधान करतानाच महाविकास आघाडीचा समाचारही घेतला आहे. कोट्यवधींचे घोटाळे करणाऱ्यांना दिड हजारांचे मोल कसे कळणार? असा सवाल उपस्थित करत भोईर यांनी महाविकास आघाडीवर हल्लाबोल केला आहे. (Shiv Sena Shinde Group Kalyan West MLA Vishwanath Bhoir has Criticised Mahavikas Aghadi And Gives Big Statement On Ladki Bahin Yojana)
ADVERTISEMENT
"मजुरी करून आपल्या कुटुंबाचे पोट भरणाऱ्या राज्यातील माझ्या भगिनींसाठी दीड हजार रुपये ही खूप मोठी रक्कम आहे. कोट्यवधींचे घोटाळे करणाऱ्या लोकांना दिड हजार रुपयांचे मोल कसे कळणार? असा प्रश्न उपस्थित करत आमदार विश्वनाथ भोईर यांनी आमदार सुनील केदारे यांच्यावर टीका केलीय. तसेच भोईर यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला विरोध करणाऱ्या महाविकास आघाडीच्या नेत्यांवरही निशाणा साधला. भोईर कल्याण पश्चिमच्या शिवसेनेकडून आयोजित लाडकी बहीण संपर्क अभियानाच्या कार्यक्रमात बोलत होते. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील शेकडो लाभार्थी महिलांनी मोठी गर्दी केली होती.
हे ही वाचा >> Jayant Patil: 'दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना खुर्ची लाडकी...', लाडकी बहीण योजनेबाबत जयंत पाटील नेमकं काय म्हणाले?
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आल्यापासून महाविकास आघाडीतील नेत्यांनी विरोध केला आहे. काहींनी तर आमचे महाविकास आघाडीचे सरकार आल्यावर आम्ही ही योजना बंद करू अशी जाहीर घोषणाही केली आहे. परंतु,आतापर्यंत ज्या लोकांनी राज्यामध्ये कोट्यवधींचे आर्थिक घोटाळे केले आहेत. अशा व्यक्तींना हे दीड हजार रुपये म्हणजे शुल्लक वाटत आहेत. मात्र राज्याच्या ग्रामीण भागामध्ये राहणाऱ्या माझ्या लाडक्या बहिणीसाठी या दीड हजारांचे मोल खूप जास्त असल्याचे मत आमदार विश्वनाथ भोईर यांनी यावेळी व्यक्त केले.
हे वाचलं का?
तसेच येणाऱ्या निवडणुकीत तुम्ही एकनाथ शिंदे यांना पुन्हा मुख्यमंत्रीपदी विराजमान केल्यास ही योजना अव्याहतपणे सुरू राहील. इतकेच नाही तर त्यामध्ये दुप्पट वाढ करण्याचे ठोस आश्वासनही मुख्यमंत्री शिंदे यांनी दिल्याचं भोईर म्हणाले. आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून देण्याचे आवाहनही त्यांनी केले. दरम्यान,मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरील "अनाथांचा नाथ एकनाथ " या गाण्यावर उपस्थित लाडक्या बहिणींनी उत्स्फूर्तपणे ठेका धरत या योजनेप्रती आपला आनंद व्यक्त केला.
हे ही वाचा >> Today Gold Rate: आता काय खरं नाय! नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशीही मुंबईसह 'या' शहरांमध्ये कडाडले सोन्याचे दर, कारण...
भोईर यांनी मंत्री सुनील केदार यांच्यावर केली सडकून टीका
आमदार सुनील केदारे यांनी माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात केलेल्या विधानावर कल्याण पश्चिमचे आमदार विश्वनाथ भोईर म्हणाले, सुनील केदारे हा अब्जाधीश माणूस आहे, बँकेचा घोटाळा करून अब्जो रुपये कमवले आहेत, त्याला दीड हजारांची व्हॅल्यू कळणार नाही. दीड हजारची व्हॅल्यू कोणाला कळते, ज्या महिलांच्या पदरामध्ये शंभर, दोनशे रुपये पन्नास रुपये नसतात,त्या महिलांना पंधराशे रुपये फार होतात. वीस रुपये,तीस रुपये चाळीस रुपयाचे भाजी आणायची आहे, एकाची छोटीशी वस्तू आणायची आहे,ती पटकन त्याच्या वापर करते, महिलेला आर्थिक बळदिल्यामुळे तिचा कॉन्फिडन्स वाढला आहे. त्यामुळे महिला आता खुश आहेत. महिलांमध्ये खूप उत्साह आहे. त्यामुळे सुनील केदारेला त्या गोष्टी कळणार नाही, असं म्हणत भोईर यांनी केदारे यांच्यावर एकेरी शब्दात उल्लेख केला.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT