Walmik Karad Beed : वाल्मिक कराडने रात्री जेवण केलं नाही, सकाळी नाश्ताही टाळला? संध्याकाळी जेवायला काय मागितलं?
वाल्मिक कराड हा बीड सीआयडीच्या ताब्यात आल्यानुसार सगळ्यात आधी त्याची वैद्यकीय चाचणी करण्यात आली. त्यानंतर त्याला केज सत्र न्यायालयात रात्री उशिरा हजर करण्यात आलं होतं. कोर्टाने त्याला 15 दिवसांची कस्टडी सुनावली.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

वाल्मिक कराड उपाशी? नेमकं कारण काय?

वाल्मिक कराडने जेवण आणि नाश्ता का टाळला?
Walmik Karad Custody : वाल्मिक कराड यांने रात्रीपासून जेवण घेतलं नाही अशी माहिती समोर आली आहे. तसंच सकाळी नाश्ताही केला नाही. वाल्मिक कराडला शुगर आणि बी.पी.चा त्रास सुरू झाला असून, ऑक्सीजन लावून झोप घेतल्याची माहिती समोर आली आहे. वाल्मिक कराड त्यानंतर सकाळी साडेआठ वाजता उठले. त्याने चहा आणि नाश्ताही घेतला नाही. वाल्मिक कराडला शुगर असून, आग्रह केल्यानंतर सरकारी सकाळी 11.30 वाजता जेवण केलं. यावेळी त्याने फक्त अर्धी चपाती खाल्ली. तर संध्याकाळी भात आणि खिचडी मागितली अशी माहिती समोर आली आहे. तर आज संध्याकाळी चार वाजता भात किंवा खिचडी द्या अशी मागणी वाल्मिकने केल्याची माहिती सुत्रांकडून समोर आली आहे.
काल नेमकं काय घडलं कोर्टात?
वाल्मिक कराड हा बीड सीआयडीच्या ताब्यात आल्यानुसार सगळ्यात आधी त्याची वैद्यकीय चाचणी करण्यात आली. त्यानंतर त्याला केज सत्र न्यायालयात रात्री उशिरा हजर करण्यात आलं. खंडणी प्रकरणात चौकशीसाठी वाल्मिकीचा ताबा मिळावा यासाठी रात्री उशिरा सुनावणी पार पडली. यावेळी सरकारी वकील जे. बी. शिंदे यांनी वाल्मिक कराडला 15 दिवसांची सीआयडी कोठडी मिळावी यासाठी जोरदार युक्तिवाद केला.
तर वाल्मिक कराड सीआयडीला शरण आले आहेत असून त्यांना जामीन मिळायला हवा, असा युक्तिवाद करत वाल्मिकीचे वकील अशोक कवडे यांनी त्याच्या बचावाचा प्रयत्न केला. मात्र, कोर्टाने वाल्मिक कराडच्या वकिलांची मागणी फेटाळून लावत वाल्मिकीला 14 दिवसांची सीआयडी कोठडी सुनावली आहे. त्यामुळे आता संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि खंडणी या सगळ्याची सीआयडीला चौकशी करता येणार आहे.