वाल्मिक कराड आला शरण.. CID अधिकारी म्हणाले आम्ही तर...
Walmik Karad CID: खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड हा पोलिसांना शरण आला. ज्यानंतर पुणे सीआयडी पोलीस अधिकाऱ्यांनी याबाबतची काही माहिती दिली.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

अखेर वाल्मिक कराड पोलिसांना आला शरण

पुणे CID च्या कार्यालयात जाऊन केलं आत्मसमर्पण

पुणे सीआयडी वाल्मिक कराडला करणार बीड सीआयडीच्या हवाली
Santosh Deshmukh Murder Case: पुणे: बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी संपूर्ण जिल्ह्यातील वातावरण तापलं आहे. या प्रकरणी मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय असलेल्या वाल्मिक कराड याला अटक करण्यात यावी अशी मागणी मागील काही दिवसांपासून सुरू होती. या प्रकरणाचा सगळा मुद्दा हा विधानसभेत देखील गाजला. त्यानंतर वाल्मिक कराड विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. अखेर 22 दिवसांपासून फरार असलेला वाल्मिक कराड हा अखेर आज (31 डिसेंबर) पोलिसांना शरण आला. (walmik karad surrendered did you see the first reaction of cid officers)
पुण्यातील सीआयडी मुख्यालयात तो स्वत:हून हजर झाला. त्यानंतर त्याला ताब्यात घेऊन पोलिसांनी आता त्याची रवानगी ही थेट बीडला करण्यात आली आहे.
हे ही वाचा>> Manoj Jarange : "आरोपींना पाठबळ देणारे मुख्यमंत्र्यांसोबत चहा पितायत...", कराड शरण, धनंजय देशमुख, जरांगे काय म्हणाले?
दरम्यान, त्याआधी पुणे सीआयडीच्या अधिकाऱ्यांनी याबाबत त्यांची प्रतिक्रिया दिली आहे.
पाहा CID अधिकारी वाल्मिक कराडबाबत नेमकं काय म्हणाले..
'आज 12.30 वाजेच्या दरम्यान बीड जिल्ह्यातील केज पोलीस स्टेशन त्यातील सीआर नंबर 638/2024 च्या गुन्ह्यामधील फरार आरोपी वाल्मिक कराड हा स्वत:हून सीआयडी मुख्यालयात हजर झालेला आहे. त्याला सीआयडी पुणे यांनी ताब्यात घेतलं आहे. जुजबी चौकशी करून नंतर त्याला आम्ही आमच्या टीमसह तपासी अंमलदार जे आहेत आमचे बीड सीआयडी पथकाचे अनिल गुजर यांच्या ताब्यात देण्याकरिता रवाना करण्यात आलं आहे.'
हे ही वाचा>> Walmik Karad Surrender : "...तर न्यायालय देईल ती शिक्षा मला मान्य", वाल्मिक कराड पुणे पोलिसांना शरण
'सीआयडीचे जे DYSP आहेत जे या गुन्ह्याचा तपास करत आहेत. त्यांच्या ताब्यात संबंधित फरार आरोपीला देण्यात येईल.' अशी माहिती सीआयडीच्या अधिकाऱ्यांनी यावेळी दिली.
पोलिसांना शरण जाण्यापूर्वी वाल्मिक कराड नेमकं काय म्हणाला?
दरम्यान, वाल्मिक कराड याने पोलिसांना शरण जाण्यापूर्वी व्हीडिओच्या माध्यमातून त्याची भूमिका मांडण्याचा प्रयत्न केला. यावेळी व्हीडिओमध्ये तो म्हणाला की, "मी वाल्मिक कराड, केज पोलीस स्टेशनमध्ये माझ्याविरोधात खोटा खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मला अटकपूर्वचा अधिकार असतानाही मी CID पुणे कार्यालयात शरण जाणार आहे. संतोषभैय्या देशमुखांचे जे मारेकरी असतील, त्यांना अटक करावी आणि फाशीची शिक्षा द्यावी. राजकीय द्वेषापोटी माझं नाव जोडलं जातं आहे. मी जर पोलीस चौकशीत दोषी दिसलो तर त्यामध्ये मला न्यायायल देईल ती शिक्षा मान्य असेल" असं वाल्मिक कराड म्हणाला.