राष्ट्रवादीच्या बैठकीचं आमंत्रण नव्हतं? जयंत पाटलांनी चर्चाच थांबवली

मुंबई तक

ADVERTISEMENT

supreme court verdict jayant patil criticize shinde fadnavis government
supreme court verdict jayant patil criticize shinde fadnavis government
social share
google news

NCP meeting jayant Patil Reaction : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. या राजीनाम्याची माहिती पवार कुटुंब वगळता पक्षाच्या इतर बड्या नेत्यांना नव्हती. त्यामुळे जयंत पाटील, जितेंद्र आव्हाडांसारखे बडे नेते नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सूरू आहे. या नाराजीच्या चर्चांवर आता राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. (Was there no invitation to the ncp meeting? jayant patil stopped the discussion)

ADVERTISEMENT

शरद पवार यांच्या राजीनाम्यावर तुमचं मत काय असा सवाल पत्रकाराने जयंत पाटील यांना विचारला होता. यावर जयंत पाटील यांनी पुन्हा प्रतिक्रिया देणे टाळत, माझ मत मी कालचं सांगितल्याचे त्यांनी म्हटले. राष्ट्रवादीतील राजीनामा सत्रावर बोलताना जयंत पाटील म्हणाले की, बऱ्याच जिल्हाधिकाऱ्यांनी माझ्याकडे व्हाटस्अॅपवर राजीनामे पाठवले आहेत.जितेंद्र आव्हाडांचा राजीनामा मी अजून पाहिलेला नाही. ठाणे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांचा राजीनामा माझ्याकडे आला असल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच हे सर्व राष्ट्रीय स्तरावरचे प्रश्न आहेत, राष्ट्रीय स्तरावरचे आमचे जे कोणी नेते असतील, ते बसून या राजीनाम्यांवर निर्णय घेतील, असे देखील जयंत पाटील म्हणाले आहेत.

हे ही वाचा >> पवारांच्या मनधरणीचे प्रयत्न, वायबी सेंटरला काय सुरूये?

शरद पवार राजीनामा देणार होते, हे इतर कोणाला माहिती असेल की नाही, हे मला माहित नाही. पण माझ्याशी काही चर्चा झाली नव्हती,अशी माहिती जयंत पाटील यांनी पत्रकारांना दिली. या पक्षात पवार साहेबांचे नेतृत्व बघून आलो आहे. पक्षात साहेबांनी आम्हाला प्रेम दिले. काम करण्याची संधी दिली. महाराष्ट्रातला प्रत्येक कार्यकर्ता पवार साहेबांना बघून राजकारणात आला आहे, तो सगळा नाराज असल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

जयंत पाटील राष्ट्रवादीतून साईडलाईन?

राष्ट्रवादीच्या प्रातांध्यक्षांच्या बैठकीत जयंत पाटील अनुपस्थित होते. ही राष्ट्रीय स्तरावरची बैठक होती. त्यांना मला बोलवण्याची आवश्यकता वाटली नसेल, सगळीकडे आपण असले पाहिजे असा आग्रह धरू नये, अशी प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी दिली. तसेच जयंत पाटील यांनी त्यांच्या राजीनाम्याची चर्चा देखील नाकारली आहे. जयंत पाटील राष्ट्रवादीतून साईडलाईन झाले असल्याचाही प्रश्न त्यांना पत्रकारांनी विचारला होता, यावर या प्रश्नाचे उत्तर देणे आवश्यक वाटत नसल्याची प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी दिली.

हे ही वाचा >> राष्ट्रवादीला आणखी एक मोठा धक्का, जितेंद्र आव्हाडांनीही दिला राजीनामा!

    follow whatsapp

    ADVERTISEMENT